Site icon My Marathi Status

Best 15 Akbar Birbal Story in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Best 15 Akbar Birbal Story in Marathi (१५ अकबर बिरबल च्या मजेदार गोष्टी) सांगणार आहे तर चला बघुयात. Best 15 Akbar Birbal Story in Marathi आणखी वाचा – छान छान मराठी गोष्टी

१. अखेर बादशहा हसला. | Akbar Birbal Story in Marathi

एकदा बादशहा म्हणाला, “जो कुणी मला हसवील त्याला मी मोठं इनाम देईन” ते ऐकून बऱ्याचजणांनी चांगले चांगले चुटके सांगून बादशहाला हसविण्याची पराकाष्ठा केली. पण ती व्यर्थ गेली.

अखेर बिरबल बादशहाच्या जवळ गेला व आपले तोंड त्याच्या कानाशी नेऊन म्हणाला, “खाविंद, आता तुम्ही जर मोठ्याने हसला नाहीत, तर मी तुमची सर्व गुप्त कुलंगडी या दरबारात उघड करीन, मग माझे काहीही होवो. आणि बिरबलाने इनाम मिळविले.

२. सुकी सर्दी ! | Akbar Birbal Story in Marathi

बादशहाच्या राजवाड्यात एके दिवशी सर्वांची धावपळ सुरू झाली, कारण बेगमची प्रकृती एकाएकी बिघडली. वैद्य आले, हकीम आले; पण सर्वांनी हात टेकले. बेगमला काय झालं आहे याचं कुणालाच निदान होईना!

योगायोगान त्याच दिवशी बिरबलाकडे बाहेरगावाहून एक दूरचा गरीब नातेवाईक आला होता व त्याच्यापाशी तो भरघोस मदतीसाठी याचना करीत होता.

त्याचे ते रडगाणे ऐकून बिरबल त्याला म्हणाला, “खुशालचंदकाका, माझ्याकडे माणसांची येजा बरीच असल्याने, शिल्लक काहीच रहात नाही, पण मी सांगतो तसे वागलात तर तुम्हाला भरपूर पैसा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.”

आलेल्या पाहुण्याने होकार देताच बिरबल म्हणाला, “बादशहांची बेगम आजारी आहे, तेव्हा तिची नाडी तपासायची आणि तिला औषधे देऊन बरी करायची.” पाहुणा म्हणाला, “पण मला तर औषधांची औषधालाही माहिती नाही.”

यावर बिरबर म्हणाला, “मग बेगमसुध्दा मुळीच आजारी नाही. सर्वांनी आपल्यासाठी धावपळ करावी व बेगम म्हणून आपलं महत्त्व किती आहे, ही गोष्ट सर्वांना कळावी म्हणून तिने आजारपणाचं खोटंच सोंग घेतलं आहे.”

याप्रमाणे बोलून बिरबलाने त्या पाहुण्याला राजवाड्यावर गेल्यावर बेगमेची नाडी तपासून काय सांगायचे व काय बोलायचे आणि करायचे त्याची माहिती दिली. एवढे झाल्यावर पोटभर जेवून बिरबल त्या पाहुण्यासह राजवाड्यावर गेला.

बिरबिलाला पहाताच बादशहा रागानं म्हणाला. “इकडे बेगमसाहेबांची प्रकृती एकदम नादुरूस्त झाली असता, तू घरी आरामात जेवत होतास वाटतं?” बिरबल म्हणाला, “खाविंद, बेगमसाहेबांची तब्येत गंभीर असताना मला जेवण कसं जाईल?

मी एका नामवंत वैद्याला आणायला गेलो होतो. हे पहा, ते वैद्यराज माझ्यासंगे आले आहे.” “वाः ! छान केलेस !” असे म्हणून बादशहा वैद्याला घेऊन बेगमकडे गेला.

‘वैद्यानं’ बेगमेची नाडी तपासून तिला विचारलं, “बेगमसाहेबा, गेल्या दोनतीन दिवसांत आपण कुठे वाड्याबाहेर गेला होता का?” ‘आऽईऽग!” असं विव्हळत बेगम म्हणाली, “कालच संध्याकाळी माझ्या हत्तीवरील अंबारीत बसून मी माझी बहीण झेबानिसा हिच्या मुलाच्या बारशाला बाजारपेठेतील रस्त्याने गेले होते.”

क्षणभर विचार करून वैद्य वादशहाला म्हणाला, “खुदावंत, बेगमसाहेबांना ‘सुकी सर्दी झाली आहे या दुखण्यावर वेळीच इलाज न केल्यास काहीही घडू शकते. अर्थात आता मी आलो असल्याने काळजीचे कारण नाही.

फक्त मला तातडीने अर्थ पोतं भरूने लवंगा देण्याची व्यवस्था करावी.” बादशहाने एका सेवकाकरवी त्या वैद्याला लवंगांनी भरलेले अर्धे पोते दिले.

ते पोते त्या वैद्याने राजवाड्याच्या पुढल्या फरसबंदी अंगणात नेले व एका सेवकाला त्या लवंगा सर्वत्र विखरून टाकण्यास सांगितले. सेवकाने त्याप्रमाणे करताच तो वैद्य पुन्हा भेटून म्हणला, “बेगमसाहेबा, आपण हत्तीवरील अंबारीत बसून मी.

‘पुरे’ म्हणेपर्यंत अंगणात रपेट करावी, म्हणजे आपली ‘सुकी सर्दी बहुतांशी नाहीशी होईल.” वैद्याच्या सूचनेनुसार बेगमेने हत्तीवरील अंबारीत बसून अंगणातल्या अंगणात थोडा वेळ रपेट केली.

एवढे झाल्यावर वैद्य तिला म्हणाला, “बेगमसाहेबा, आता आपण शयनगृहात जाऊन अगदी पूर्ण एकांतात तासभर पलंगावर पडून रहा. तासाभरात आपली सुकी सर्दी नाहीशी होऊन, आपल्याला पूर्ण बरे वाटेल.

परंतु तरीही यदाकदाचित जर नाहीच बरं वाटलं, तर मात्र मध्ये एक जिवंत पाल ओवलेली पाचपंचवीस झुरळांची माळ मी आपल्याला गळ्यात घालण्याकरिता देईन.

ती माळ गळ्यात घालून आपण आजचा दिवस अन्नपाणी न घेता जर केवळ आराम घेतलात, तर आता झालेली सुकी सर्दी तर पार नाहीशी होईलच, परंतु यापुढे आयुष्यात ती कधीही आपल्याला होणार नाही.

पाल व झुरळांची माळ गळ्यात घालण्याचा उपाय कानी पडताच बेगमेच्या अंगावर काठा उभा राहिला. ती लगेच म्हणाली, “वैद्यराज, तुम्ही खरोखरच जादूगार आहात, अहो, मी आत्ताच पूर्ण बरी झाले आहे.”

वैद्याने केलेल्या या रामबाण उपायामुळे थक्क झालेल्या बादशहाने त्याला विचारले, “काय हो वैद्यराज, तुम्ही बेगमसाहेबांना हत्तीवरील अंबारीत बसायला सांगून, लवंगा विखुरलेल्या अंगणात रपेट करायला लावले आणि लगेच त्यांचे सुक्या सर्दीचे दुखणे नाहीसे कसे काय झाले?”

वैद्य म्हणाला, “खाविंद, काल बेगमसाहेबा हत्तीवरील अंबारीत बसून बाजारपेठेच्या रस्त्याने चालल्या असता त्यांच्या हत्तीचा एकपाय रस्त्यावर पडलेल्या वेलचीवर पडला.

वेलची ही प्रकृतीला ‘थंड’ असल्याने तिचा थंडपणा हत्तीच्या पायातून त्याच्या शरीरात, शरीरातून त्याच्या पाठीवरच्या अंबारीत आणि अंबारीतून बेगमसाहेबांच्या अंगात शिरला त्यांच्याकडून काही माहिती मिळताच मी हे हेरलं व म्हणूनच त्यांना लवंगा विखुरलेल्या अंगणात हत्तीवरील अंबारीत बसून रपेट करायला सांगितलं.

त्यामुळे झालं काय, हत्तीचा पाय लवंगावर पडला. आमच्या आयुर्वेदाप्रमाणे लवंगा या ‘उष्ण’ असल्याने त्या लवंगांची उष्णता हत्तीच्या पायांतून त्याच्या शरीरात, त्याच्या शरीरातून पाठीवरच्या अंबारीत आणि अंबारीतून बेगमसाहेबांच्या शरीरात शिरली व त्या उष्णतेने, त्यांना झालेली सुकी सर्दी पिटाळून लावली.”

वैद्याच्या या कौशल्यापूर्ण औषधयोजनेमुळे बेगम खणखणीत बरी झाल्याचे पाहून बादशहाने त्या वैद्याला भरपूर पैसे तर दिलेच, पण असा नामवंत वैद्य आणल्याबद्दल बिरबलालाही एक सोन्याचे कंकण बहाल केले.

३. माझ्या वाट्याला ती आली. | Akbar Birbal Story in Marathi

बिरबलाची प्रकृती अगदीच सामान्य होती. बरं रूप म्हणावं, तर तेही त्याला नव्हतं. परिस्थितीही यथातथाच होती आणि गाण्याच्या कलेतही त्याला विशेष समजत नसे.

या गोष्टी लक्षात ऊन एकदा बादशहाने भर दरबारात त्याला खिजवलं, “बिरबल, तुझ्या कडे दणकट प्रकृती, रूप, वैभव किंवा गाण्याची कला, यांपैकी एकही गोष्ट कशी काय नाही?”

बिरबल म्हणाला, “खाविंद, आपलं म्हणणं आरोग्य, रूप, श्रीमंती व गाण्याची कला यांच्या राशी अगदी पुढे ठेवल्या होत्या, परंतु बुध्दिमत्तेची रास मात्र बरीच मागे ठेवली होती.

पृथ्वीवर पाठवताना ब्रह्मदेवाने ‘या राशीपैकी ज्याला जे जेवढं हवं असेल, तेवढं त्याने घ्यावं,’ असं सांगितलं. त्या वेळी तुम्ही व तुमच्या बहुतेक दरबारी मंडळींनी रूप, आरोग्य, श्रीमंती व गाण्याची कला यांच्या पुढे असलेल्या राशीच पूर्णपणे लुटून नाहीशा केल्या.

मी तिथे थोडा तुमच्या मागून आल्याने, माझ्या हाती त्या राशीपैकी काहीच लागले नाही. मात्र मागे असलेल्या बुधिदमत्तेच्या राशीला तुमच्यापैकी कुणीच हात लावलेला नसल्याने, ती तेवढी सर्वच्या सर्व रास माझ्या एकट्याच्या वाट्याला आली.” बिरबलाचे हे उत्तर ऐकून, बादशहासह सर्वांचे चेहरे अगदी बघणीय झाले.

४. तारे मोजून घ्या. | Akbar Birbal Story in Marathi

एका रात्री राजवाड्याच्या गच्चीवर बसून बिरबलासंगे गप्पा मारीत असता बादशहाने विचारलं, “बिरबल, आकाशात एकूण किती तारे असतील?”

यावर दूर उभ्या असलेल्या एक सेवकाला बिरबलाने एक परातभर मोहऱ्या आणण्याचा हुकूम फर्मावला व तो स्वतः आकाशाकडे बघून तारे मोडण्याचा आविर्भाव करू लागला.

थोड्या वेळात मोहऱ्यांनी भरलेली परात घेऊन सेवक बिरबलापुढे उभा राहिला. मग ताऱ्यांची गणती बंद करून, बिरबलाने ती परात बादशहापुढे ठेवली व तो म्हणाला, “खाविंद, या परातीत जेवढ्या मोहऱ्या आहेत, बरोबर तेवढेच तारे त्या आकाशात आहेत.

नेमकी संख्या जाणून घ्यायची असल्यास एकेक, याप्रमाणे या परातीतल्या सर्व मोहऱ्या तुम्ही मोजा.” बादशहा म्हणाला, “त्याची जरूरी नाही. कारण माझं उरलेलं आयुष्य मला केवळ या परातीतल्या मोहचा मोजण्यात वाया घालवायचं नाही.”

५. खटाची अट | Akbar Birbal Story in Marathi

बाहेरगावच्या एका मुलीचं दिल्लीतल्या एका मुलाशी लग्न ठरलं. लग्नासाठी नवऱ्यामुलीकडलं वहाड दिल्लीस आलं. पण खट असलेल्या वरपित्याने आयत्या वेळी वधूपित्याला अट घातली, “या लग्नाच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला आमच्या वाड्याच्या परसदारी असलेली विहीर भरून तूप द्या, तरच हे लग्न होईल.”

वरपित्याच्या या अटीमुळे वधूकडील सर्वांचे धावे दणाणले. पण त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा सुगावा, ते ज्या गृहस्थांच्या वाड्यात जानवशाला उतरले होते त्याला लागला व त्याने वधूपित्याने बिरबलाची भेट घेतली व आपल्यावर ओढवलेल्या संकटाची त्याला कल्पना दिली.

बिरबलाने त्याला या संकटातून बाहेर पडण्याची युक्ती सांगितली. बिरबलाने सांगितल्यानुसार वधूपिता वरपित्याकडे गेला व चढ्या स्वरात त्याला म्हणाला, “जमलेलं लग्न मोडण्यासाठी तुम्ही.

आमच्यावर भलतीच अट लादू पहाता काय? पण आम्हीही काही साधेसुधे नाही. तुमची विहीर भरून तूप देण्याची आमची ऐपत आहे व म्हणून तुमची अट आम्हाला मान्य आहे.

पण अगोदर पाण्यानं अर्ध्याअधिक भरलेल्या तुमच्या विहिरीतलं सर्व पाणी उपसून, तुम्ही तिला कोरडी ठणठणीत करा. त्या विहिरीत पाण्याचा एकही थेंब रहाता कामा नये किंवा झऱ्याचे पाणीही येता कामा नये, कारण पाण्यात तूप मिसळणे हे आम्ही अशुभ समजतो.

चला, लवकर कामाला लागा, म्हणजे आम्ही ती विहीर तुपानं भरून काढतो.” वधूपित्याने याप्रमाणे दटावून सांगताच वरपिता एकदम ढेपळला आणि केल्या अपराधाबद्दल वधूपित्याची क्षमा मागू लागला. याप्रमाणे वधूपक्षावर आलेले संकट बिरबलाच्या चातुर्यामुळे दूर झाले आणि मग ते लग्न अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले.

६. खोजा, तुला नाही भेजा ! | Akbar Birbal Story in Marathi

बादशहाच्या राजवाड्यात एक ‘खोजा’ म्हणजे हिजडा. तो राजवाड्यातल्या स्त्रियांना निरोप पोहोचविण्याचे किंवा त्यांचे निरोप इतरांना सांगण्याचे काम करीत असे. तो बिरबलावर आतून फार जळत असे.

एकदा कुठले तरी काम मोठ्या हिकमतीने पार पाडल्याबद्दल बादशहा बिरबलाची तोंड भरून स्तुती करू लागला असता, जवळच उभा असलेला खोजा मध्येच नाक खुपसून म्हणाला.

“खुदावंत, आपले बिरबलजी जर खरोखरच चतुर असतील, तर माझ्या दोन प्रश्नांची त्यांना उत्तरे द्यावी.” मग बादशहाने ते प्रश्न विचारण्याची मुभा देताच, त्या खोजाने बिरबलाला प्रश्न विचारायला सुरूवात केली.

खोजा – पृथ्वीचा मध्य कुठे आहे? बिरबल – तुझ्या पायाखाली. वाटल्यास तू पृथ्वीचे मोजमाप करून पहा. खोजा – बरं ते जाऊ द्या, पण पृथ्वीवर एकूण स्त्रिया किती व एकूण पुरूष किती, यांचे नेमके आकडे तरी तुम्ही मला सांगू शकाल का?

बिरबल – या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. मग बिरबलजी, तुम्ही हरलात ना? बिरबल – हरेन कसा? या पृथ्वीवर एकूण स्त्रिया किती व पुरूष किती हे सांगणं तसे कठीण नाही,

पण तुझी अवस्था ‘घड पुरूष नाही आणि घड स्त्री नाही’ अशी असल्याने, तुझी गणना मी पुरूषांत करू, की स्त्रियांत करू, हे तेवढं सांग, म्हणजे मी तुला हवे असलेले आकडे देतो.

बिरबलाचे हे ज्वलज्जहाल उत्तर ऐकून मटकन् खाली बसला. त्याबरोबर बादशहा त्याला म्हणाला, ” अरे खोजा, तुला नाही भेजा, तेव्हा तू आपला बिब्याबेगमांची कामे करायला इथून निघून जा.

७. थट्टा अंगाशी आली ! | Akbar Birbal Story in Marathi

अरबस्तानातल्या एका बादशहाच्या कानी बिरबलाच्या चातुर्याची कीर्ती गेल्याने, त्याने अकबराच्या संमतीने त्याला काही दिवसांसाठी आपल्याकड़े बोलावले.

बिरबल तिकडे जाताच त्या बादशहाने त्याचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले व त्याला रहाण्यासाठी आपल्या वाड्यातलेच एक मोठे दालन केले. नंतर बादशहाच्या वजिराने बिरबलाला राजवाडा दाखवत दाखवत संडासही दाखवला.

त्या विस्तीर्ण फरसबंदी शौचकूपात बिरबलाने नजर टाकली असता, त्याला त्या शौचकूपातील भिंतीवर अकबर बादशहाचे चित्र लावले असल्याचे आढळून आले.

ही गोष्ट मुद्दाम आपल्याला चिडवण्यासाठीच केली आहे, हे बिरबलाने ओळखले. ” “संडास कसा काय वाटला?” असा प्रश्न वजिराने केला असता बिरबल म्हणाला, “वा! संडास तर चांगला आहेच, पण तुम्ही त्यात आमच्या अकबर बादशहांचे चे चित्र लावले आहे, ते फार चांगले केले आहे.’

“ते कसं काय?” असा प्रश्न वजिराने आश्चर्याने केला असता बिरबल म्हणाला “कारण तुमचे बादशहा शौच कूपात गेले आणि त्यांच्या दृष्टीस आमच्या खाविंदाचे चित्र पडले रे पडले की, चित्र पडले रे पडले, की भीतीमुळे तुमच्या खाविंदांना शौचाला एकदम साफ होत असेल.”

तिथल्या बिरबलाच्या मुक्कामात त्याने अशीच चातुर्याची अनेक वेळा चुणूक दाखविली. त्यामुळे त्याच्यावर प्रसन्न झालेल्या त्या बादशहाने त्याला तिथून निघतेवेळी अनेक मौल्यवान भेटी तर दिल्याच, पण पत्राने अकबर बादशहाला कळवले, “शहेनशहा, आपल्यासारखे राजसम्राट या पृथ्वीवर अनेक असतील, पण बिरबलजींसारखा ‘चातुर्यसम्राट’ पृथ्वीवर सध्यातरी दुसरा नाही.”

८. दूधभाई | Akbar Birbal Story in Marathi

एखाद्या लेकुरवाळ्या बाईच्या अंगावर पुरेसे दूध येत नसले, तर तिच्या मुलाला स्त्रीचे पचायला हलके असलेले दूध पाजण्यासाठी एखाद्या निकोप प्रकृतीच्या लेकुरवाळ्या बाईला पगार देऊन ‘ ठेवले जाई.

असा दाईचे दूध पिणारा मुलगा व प्रत्यक्ष त्या दाईचा स्वतःचा मुलगा यांना एकमेकांचे ‘दूधभाई’ म्हटले जाई. राजघराण्यात ही पध्दत सर्रास चालू होती.

तेव्हा एकदा गप्पांच्या ओघात बादशहाने विचारले, “बिरबल, मला ज्याप्रमाणे एक ‘दूधभाई’ आहे त्याचप्रमाणे तुलाही एखादा ‘दूधभाई’ आहे का ?” बिरबलाने ‘आहे की !’ असे उत्तर देताच, बादशहा म्हणाला, “तर मग उद्या त्याला दरबारात आण ना!”

बिरबल म्हणाला, “खाविंद, माझा ‘शरीरानं धिप्पाड असला, तरी बुध्दीनं अगदीच बेताचा आहे. तेव्हा त्याला दरबारात घेऊन आले तर चालेल ना?” बादशहा बोलला, “बिरबल, अरे हे काय विचारणं झालं? अरे, मी तुला माझा भाई समजतो ना?

मग तुझ्या ‘दूधभाई’लाही मी माझाच ‘दूधभाई’ मानून, त्याला प्रेमाने वागवीन. दरवाज्यावरच्या द्वारपालांनी हरकत घेतलीच, तर त्यांना सांग की त्याला मी बोलावलं आहे. अवश्य आण बरं का?”

दुसऱ्याच दिवशी बिरबल एका धिप्पाड बैलासह आला. दरवाज्यावरील पहारेकऱ्यांना “या बैलाला खाविंदांनी दरबारात आणायला सांगितलंय,” असं सांगून दरबारात गेला.

सर्व दरबार स्तिमित होऊन, त्या दोघांकडे बघत राहिला. बादशहाने विचारले, “बिरबल, अरे हे काय? तू या बैलाला घेऊन दरबारात का आलास?” बिरबल म्हणाला, “खाविंद, कमाल आहे तुमची !

कालच तुम्ही मला तुझ्या ‘दूधभाई’ ला घेऊन दरबारात ये, असं सांगितलंत ना? म्हणून मी याला घेऊन आलो आहे. माझ्या लहानपणी माझ्या आईचं दूध मला पुरेसं मिळत नसल्यामुळे ज्या गाईचं दूध मला पाजलं जाई, तिचा हा धाकटा मुलगा.

मग हा माझा “दूधभाई’ नव्हे का ? याला मागलीपुढलीही बहीणभावंडं आहेत. तुम्ही सांगितलंत, तर त्या सर्वांनाही एक दिवशी दरबारात घेऊन येईन.” बिरबलाच्या या खुलाशाने बादशहासह सर्व मंडळी अगदी पोट दुखेपर्यंत हसली.

९. जिवंतपणी प्रेतयात्रा ! | Akbar Birbal Story in Marathi

दिल्ली शहरात भडकचंद या नावाचा एक भलताच रागीट आणि बोलल्याप्रमाणे वागणारा सावकार होता. एकदा जेवायला अन्नात बायकोचा केस आला म्हणून तो ताडकन् पानावरून उठला व बायकोला म्हणाला, “यापुढे अन्नात जर तुझा केस आला, तर न्हाव्याला बोलवीन आणि तुझ्या डोक्यावरचे सर्व केस उतरवून, तुझा चमनगोटा करून घेईन.”

नवऱ्याने दिलेली तंबी, तो खरी केल्याशिवाय रहाणार नाही, या भीतीने ती बाई हादरून गेली व घराच्या परसदारी जाऊन वेणी घालू लागली. तरीही एके दिवशी जेवताना भाजीत तिचा केस आला आणि त्याने गड्याला हुकूम सोडला, “दगडू, असाच नरकू न्हाव्याकडे धाव घे आणि मालकिणीचे केस उतरवायचे असल्याचे सांगूण त्याला ताबडतोब घेऊ ये.”

मालकापुढे बोलण्याची सोय नसल्यामुळे तो गडी घरून निघाला आणि सरळ मालकिणीच्या भावाकडे जाऊन त्याने घडत असलेल्या विपरीत प्रकाराचा त्याला घाईघाईने गोषवारा सांगितला.

इकडे त्या सावकाराची बायको घरातल्याच एका खोलीत गेली आणि खोलीचे दार बंद करून घेऊन, तिने आतून कड़ी लावून घेतली. त्या सावकाऱ्याच्या बायकोला चार भाऊ होते आणि ते चौघेही दिल्लीतच रहात होते.

आपल्या बहिणीवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती कळताच ते धावतपळत बिरबलाकडे गेले व त्यांनी त्याला आपल्या बहिणीवर कोणते संकट ओढवले आहे, ते सांगितले.

बिरबल त्यांना म्हणाला, “तुम्ही चिंता करू नका आणि माझ्याकडे नसती चौकशी करण्यात वेळ घालवून नका, तुम्ही असेच इथून निघा आणि तातडीने अंत्ययात्रेचं सामान घेऊन, तुमच्या बहिणीच्या वाड्यासमोरील अंगणात या.

मी पाच-पंचवीस माणसे व इतर आवश्यक अशा गोष्टी घेऊन तुमच्या पाठोपाठ येतो.” योगायोग असा की, दोन मडकी, बांबू, गोवऱ्या, सुंभ, सफेद कापड इत्यादी अंत्ययात्रेच्या सामानासह ते चार भाऊ त्या सावकाराच्या घराच्या पुढल्या वेशीतून अंगणात शिरत असतानाच, त्यांच्यापाठोपाठ उघड्याबोडक्या अशा पंचवीस-तीस माणसांसह बिरबलानेही त्या अंगणात प्रवेश केला.

“अगं ए, दार उघड. न्हावी यायची वेळ झाली आहे.” असं बायकोला उद्देशून मोठमोठ्याने केकाटत तो सावकार ती आत असलेल्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारू लागला असता, बिरबल अंगणातून मोठ्याने ओरडला,

“अहो भडकचंद ! अगोदर बाहेर या आणि मी खास तुमच्यासाठी आणलेलं वीष खा.” बाहेर येऊन, त्या उघड्याबोडक्या माणसांची गर्दी व अंत्ययात्रेचे सामान पाहून घाबरलेल्या सावकारानं विचारलं,

“बिरबलजी, मी वीष का म्हणून खाऊ?” हातातली विषाची पुडी त्या सावकाराला दाखवून बिरबल शांतपमे म्हणाला, “हे पहा भडकचंद, आपल्या हिंदू धर्मियांमध्ये बाईचे केशवपन करण्याची जी रूढी आहे, ती अतिशय क्रूरपणाची व रानटी असली,

तरी ती तुम्हाला मान्य असल्यामुळे तुम्ही तुमच्या वायकोचे केशवपन करायचे ठरविले आहे. परंतु पती मेल्याशिवाय त्याच्या बायकोचे केशवपन केले जात नाही.

तेव्हा मी आणलेले हे वीष खाऊन मरण्याचे काम प्रथम तुम्ही करा, मग केशवपनाचे काम न्हावी करील आणि तुम्हाला स्मशानात नेऊन जाळण्याचे काम हे तुमचे चारही मेव्हणे करतील.”

बिरबलाचे हे वाक्य ऐकूण त्या सावकाराने त्याच्या चरणी लोटांगण घातले आणि रागाच्या भरात आपण भलतेच काहीतरी करू पहात होतो, हे सपशेल मान्य केले.

१०. वाटल्यास तुम्ही तसे म्हणा. | Akbar Birbal Story in Marathi

अकबर बादशहाचा एक पोपट होता. पिंजऱ्यात बसल्या बसल्या तो कुराणातले सुरे – सुवचने – अगदी स्पष्ट बोलत असल्याने, बादशहाचा तो अत्यंत आवडता होता.

त्या पोपटाच्या दिमतीला ठेवलेल्या सेवकाला बादशहाने तंबी दिली होती, “हा पोपट मेल्याची जो मला प्रथम बातमी देईल, त्याचा मी शिरच्छेद करीन.”

आणि एके दिवशी सकाळी तो सेवक पिंजऱ्यापाशी गेला असता, त्याला पोपट मेला असल्याचे आढळले. ‘आता ही बातमी तर बादशहाला सांगावीच लागणार आणि ती सांगितली की बादशहा आपली मान उडवणार,’ या कल्पनेने तो सेवक भयभीत झाला व बिरबलाचा सल्ला घेण्यासाठी त्याच्याकडे गेला.

पोपट मेल्याचे वृत्त बादशहाला सांगण्याची जबाबदारी बिरबलाने स्वत:वर घेतली. मग बादशहाची भेट घेऊन बिरबल त्याला म्हणाला, “खाविंद, आपण सोन्याच्या पिंजऱ्यात पाळलेला तो पोपट नुसताच बुध्दिवान नाही बरं का ! तो महान योगीही आहे.

आकाशाककडे नजर लावून, चोच वासून, अगदी जराही हालचाल न करता तो सकाळपासून समाधी लावून उताणा पडला आहे.” पोपट बहुधा मेला असावा, अशा संशयाने बादशहा बिरबलासह त्या पिजऱ्याकडे गेला व पोपटाला पाहून बिरबलाला म्हणाला, “अरे, हा तर मेला आहे !

तुला एवढी साधी गोष्ट कळू नये?” बिरबल म्हणाला, “मला कळतं हो, पण जन्माला आलेला प्रत्येक प्राणी केव्हातरी मरणारच, ही साधी गोष्ट तुम्हांलाच कळत नाही.

म्हणून तर हा पोपट मेल्याची पहिल्याप्रथम बातमी देणाऱ्याचा तुम्ही शिरच्छेद करण्याचे ठरविले आहे, तेव्हा ‘हा पोपट मेला आहे’ असं वाटल्यास तुम्ही म्हणा; मी म्हणणार नाही.’ बिरबलाचं हे उत्तर ऐकून पोपट मेल्यामुळे वास्तविक दुःख झाले असतानाही – बादशहा गदगदून हसू लागला.

११. म्हणून मी रडतोय ! | Akbar Birbal Story in Marathi

बिरबलाला घाबरवून सोडण्याच्या हेतूने बादशहाने एकदा भयंकर भडकल्याचा खोटाच आव आणला व तो बिरबलाला वाट्टेल तसे बोलू लागला.

पण आपल्या बोलण्याने घाबरून जाण्याऐवजी बिरबल मोठ्यामोठ्याने रडू लागल्याचे पाहून आश्चर्यचकित झालेल्या बादशहाने त्याला विचारले, “बिरबल, मी एवढा रागावलो असता तू भीतीने लटलट कापशील असी माझी कल्पना होती, पण त्याऐवजी तू असा हेल काढून रडू का लागलास?”

बादशहाचा हा प्रश्न ऐकून बिरबलं त्याला एका बाजूला घेऊन गेला व म्हणाला, “खाविंद, माझा कोणताही अपराध नसता ज्या अर्थी तुम्ही माझ्यावर एवडे भडकला, त्या अर्थी तुमच्या डोक्यात काहीतरी बिघाड झाला आहे असा माझा समज झाला.

साहजिकच ‘आता या तुमच्या राज्याचे व प्रजेचे काय होणार?” या चिंतेने मला अनावर शोक झाला.” बिरबलाच्या या उत्तराने बादशहा पार शरमिंदा झाला.

१२. तुमच्यापेक्षा तो दगड बरा ! | Akbar Birbal Story in Marathi

अकबराचा एक सरदार शत्रूशी झालेल्या एका लढाईत मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोवर व मुलांवर उपाशी राहण्याची पाळी आली.

त्यामुळे एके दिवशी त्याची बायको बिरबलाकडे गेली व तिने त्याला आपली करूण कहाणी सांगून बादशहाकडून आपल्याला पोटापुरती मदत मिळावी, यासाठी बादशहाकडे शब्द खर्च करायची विनंती केली.

बिरबलाने तिला तसे आश्वासन दिले आणि दुसऱ्या दिवशी दरबारात कसे यायचे व कसे वागायचे, याबद्दल तिला मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी ती बाई दरबारात गेली आणि बादशहाला वंदन व त्याच्या हाती एक तरवार देऊन त्याला म्हणाली,

“खाविंद, माझे पती विजयसिंह यांनी आपल्या शत्रूशी झालेल्या अनेक लढायांत भीमपराक्रम केले व आपल्याला विजय मिळवून देण्यात सहाय्य केले.

पण गेल्या वर्षी झालेल्या एका लढाईत शत्रूने पाठीमागून केलेल्या हल्यात तरवारीचा जबरदस्त घाव लागून ते कामी आले. त्यांच्या पश्चात घरात कमावते कुणीच नसल्याने, माझी व माझ्या लेकरांची उपासमार होत आहे.

तेव्हा माझ्या पराक्रमी पतीची तरवार आपण घ्यावी व तिची योग्य ती किंमत मला द्यावी.” बादशहाने तिला शंभर सुवर्णमोहरा दिल्या आणि ती तरवारही तिला परत केली.

ते पाहून बिरबल त्याला म्हणाला, “खाविंद, वास्तविक परीस हाएक प्रकारचा दगडच. परंतु त्याचा जरी स्पर्श झाला असता, तरी त्या सर्वच्या सर्व तरवारीचे सोने झाले असते, आणि ते सोने थोडेथोडे विकून, त्यावर त्या वीरपत्नीला आपली व आपल्या मुलाबाळांची गुजराण करणे शक्य झाले असते.

पण या बाईच्या हाती फक्त शंभर सुवर्णमोहोरांचीच मामुली रक्कम पडावी हे नवल नाही का ? म्हणजे एका परीनं तुमच्यापेक्षा तो दगड असलेला लढाईत स्वतःचे प्राण कुर्बान केले,

त्याची मुलं निदान कमावती होईपर्यंत तरी त्याच्या कुटुंबाला जगता येईल याची काळजी घेणं बादशहा या नात्यानं आपलं कर्तव्य नाही का?”

बिरबलाने केलेल्या या कानउघाडणीमुळं बादशहाला आपली चूक समजून आली आणि त्याने काही सुपीक शेतजमीन या बाईला – तिच्या व तिच्या पोराबाळांच्या – उदनिर्वाहासाठी इनाम दिली.

१३. डोके माझे, पण मेंदू बिरबलजींचा | Akbar Birbal Story in Marathi

एकदा आपल्या एका नव्या नोकराच्या बुध्दीची परीक्षा घेण्यासाठी बादशहा झोपेतून उठता उठताच त्याच्याकडे पाहून ओरडला, “जल्दी बुलाव!” जल्दी बुलाव, म्हणजे ‘तातडीने बोलावून आण’ एवढं त्या नोकराला कळलं, पण ‘कुणाला बोलवायचं ? ‘

असा प्रश्न त्या नोकरापूढे पडला. बरं हा प्रश्न बादशहाला विचारण्याची सोयच नव्हती. तेव्हा तो नोकर धावत धावत बिरबलाकडे गेला व त्याने त्याला बादशहाच्या आज्ञेचा अर्थ विचरला.

बिरबलाने त्या सेवकाला विचारले, “काय रे कासीम, तुला ‘जल्दी बुलाव, ‘ असं जेव्हा खाविदांनी सांगितलं, तेव्हा ते बसले होते की उभे होते? शिवाय त्यांच्या हातांची हालचाल कशा प्रकारची होती?” सेवक म्हणाला, ”

तो हुकूम त्यांनी मला केला, तेव्हा ते बसले होते व आपला उजवा हात ते त्याच्या गालावर वाढलेल्या दाढीच्या खुंटांवरून व मिशीवरून फिरवीत होते. बिरबल म्हणाला, “ होय ना? मग तू निःशंकपणे व तातडीने न्हाव्याला त्यांच्याकडे पाठवून दे.

दाढी करून व मिशी करून त्यांना तातडीने कुठंतरी बाहेर जायचे गेला असता बादशहा त्याला म्हणाला, ” तू नेमका कासीम, मी तुला नुसतं ‘जल्दी बुलाव’ असं सांगितले असता, हजामाला कसा काय घेऊन आलास? हे डोके तुझेच का?”

यावर तो सेवक म्हणाला, ” जहाँपन्हा, खरं सांगयचं, तर हे डोके माझेच, पण त्याला अकलेचा पुरवठा करणारा मेंदू बिरबलजींचा.”

१४. तिचे वजन कायम रहावे. | Akbar Birbal Story in Marathi

एकदा बादशहा व बिरबल यांच्यात कशावरून तरी शाब्दिक खटका उडाला आणि बिरबल कुठल्यातरी गावी जाऊन, साधूच्या वेषात एका गावपाटलाकडे राहू लागला. बिरबल निघून गेला, पण त्याच्याशिवाय बादशहाला चैन पडेना.

अखेर त्याला शोधून काढण्यासाठी बादशहाने एक युक्ती योजली. त्याने आपल्या राज्यातल्या प्रत्येक गावपाटलाला बोलावून त्याच्या स्वाधीन एकेक शेळी केली आणि सांगितले,

“हे पहा, बरोबर एक महिन्याने तुमच्यापैकी प्रत्येकान आपापली शेळी मला सध्या असलेल्या वजनासह परत करायची. तिच्या वजनात जराही वाढ वा घट होता कामा नये.”

बादशहाने याप्रमाणे सांगितल्यावर त्याच्या अधिकाऱ्यांनी शेळ्यांचे वजन केले, त्यांना कुठल्या पाटलाच्या स्वाधीन केले ते एका वहीत नोंदवले आणि मगच त्या त्या पाटलाला त्याच्या त्याच्या शेळीसह त्याच्या गावी जाऊ दिले.

महिन्यानंतर ठरलेल्या दिवशी प्रत्येक पाटील आपापली शेळी घेऊन दिल्लीस आला. पण अधिकाऱ्यांनी त्यांची वजने केली असता, कुठल्या शेळीच्या वजनात वाढ, तर कुठल्या शेळीच्या वजनात घट झालेली आढळून आली.

फक्त एकाच शेळीचे वजन कायम राहिले असल्याचे आढळून आले. बादशहाने त्या पाटलाला विचारले, “तुझ्याकडल्या शेळीचे वजन कायम कसे राहिले?” यावर तो पाटील म्हणाला, “मी या शेळीला दिवसा पोटभर खायला घाली,

पण रात्री मात्र एका बंदिस्त वाघापासून थोड्या अंतरावर तिला बांधून ठेवी. त्यामुळे तिने खाल्लेले अन्न तिच्या अंगी लागत नसे आणि तिच्या वजनात घट वा वाढ होत नसे.” बादशहा म्हणाला, “अरे वा! युक्ती तर मोठी नामी शोधून काढलीस!”

यावर पाटील बोलून गेला, “हुजूर, एवढी नामी युक्ती मला कुठली सुचायला ? पण गेला महिना दीड महिना माझ्याकडे एक साधूमहाराज मुक्कामाला आले आहेत, त्यांनी मला ही युक्ती सुचवली.”

एवढं डोकं चालवणारा साधू हा बिरबलच असावा अशी खात्री वाटल्याने बादशहाने त्या गावी हेर पाठवून त्या साधूची माहिती काढली.

मग तो बिरबलच असल्याचे कळून येताच, बादशहा स्वतःत्या गावी गेला आणि बिरबलाची समजून घालून, त्याला तो आपल्यासंगे परत दिल्लीस घेऊन आला.

१५. पंडित पाया पडला | Akbar Birbal Story in Marathi

अकबर बादशहाच्या दरबरात आलेल्या एका पंडिताने एकूण पाच प्रश्न विचाले.

दरबरातील इतर कुणालाही त्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक रीतीने देता येईनात, म्हणून बादशहाच्या सांगण्यावरून त्याने ते प्रश्न बिरबलाला विचारले. पंडित – शेजारी शेजारी राहूनही एकमेकांना जन्मात न भेटणारे कोण?

बिरबल-दोन डोळे पंडित – सुखी होण्याचा मार्ग कोणता? बिरबल समाधान मानणे. पंडित – जिला मरण नाही, अशी गोष्ट कोणती? बिरबर – कीर्ती. पंडित – कुठलेही काम मनपसंत केव्हा होते?

बिरबल- जेव्हा ते आपण स्वतः करतो. पंडित – सर्वांत महत्वाचे पान कोणेत? बिरबल – विड्याचे, कारण ते खाणाऱ्याचे ओठ रंगवते व त्याच्या चेहेऱ्याचे सौंदर्य खुलवते. आपण विचारलेल्या प्रश्नांना बिरबलाने दिलेली चातुर्यपूर्ण उत्तरे एकूण तो पंडित थक्क झाला व त्याच्या पाया पडला.

काय शिकलात?

आज आपण Best 15 Akbar Birbal Story in Marathi (१५ अकबर बिरबल च्या मजेदार गोष्टी) पाहिल्या आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version