Affiliate Marketing in Marathi|अफिलिएट मार्केटिंग

आपण Affiliate Marketing in marathi  हे आपण पाहूया.मित्रानो सध्या चे जग हे इंटरनेट चे जग आहे. सध्या च्या जगात इंटरनेट शिवाय जगणे अवघड झाले आहे. इंटरनेट सोबत अनेक नवीन गोष्टीचा उदय झाला आहे. त्यामधील एक आहे अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटिंग हे एक सध्या मार्केटिंग चे एक माध्यम आहे. चला आपण सविस्तर पाहूया

Affiliate Marketing

Contents

what is Affiliate marketing|अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही विक्रेता आणि ग्राहक यांना जोडायचे काम करायचे असते. तुम्हाला कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सेवा विकण्यासाठी मदत करायची असते. पण तुम्हाला कुठे फिरायचे नाही इंटरनेट वर हे करायचे असते. आता सगळेजण इंटरनेट वर खरेदी करत असतात. पण सगळ्या वस्तू विषयी आपल्याला माहिती नसते  त्यामुळे आपण त्या गोष्टी विषयी माहिती इंटरनेट वर शोधत असतो. तर जे अफिलिएट मार्केटिंग करतात ते अशा वस्तू विषयी आपल्याला माहिती देत असतात. त्या माहिती सोबत तिथे लिंक असतात जिथून आपण त्या वस्तू विकत घेऊ शकतो. ह्या लिंक वरून जर कोणी खरेदी केले तर तुम्हाला कमिशन मिळते. वेगवेगळ्या वस्तू साठी वेगळे कमिशन असते.

how can we do affiliate marketing|अफिलिएट मार्केटिंग कुठून करायचे

सर्वात महत्वाचे तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग साठी ब्लॉग,वेबसाईट किंवा youtube चॅनेल असणे आवश्यक आहे. कारण आपल्याला त्या कंपनीचे अफिलिएट मार्केटिंग साठी त्यांचे परवानगी मिळायला लागते. नवीन जर तुम्ही असाल तर लगेच अँप्रोवल मिळत नाही. तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक असणे महत्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला seo वरून ट्रॅफिक मिळवावे लागेल किंवा social मीडिया वरून ट्रॅफिक आणावे लागेल. एकदा तुम्हाला approval मिळाले कि मग तुम्ही त्या लिंक वरून पैसे कमवू शकता. आपण त्या लिंक social  मीडिया वर टाकू शकतो.

Types of Affiliate marketing|अफिलिएट मार्केटिंग चे प्रकार

अनेक प्रकारचे अफिलिएट मार्केटिंग असतात जसे तुम्ही अमॅझॉन, फ्लिपकार्ट सारख्या इ कॉमर्स कंपन्या वरून वस्तू विकून करू शकता. तसेच तुम्ही डिजिटल प्रॉडक्ट्स म्हणजे सॉफ्टवेअर, इ  बुक, ऑनलाईन कोर्सेस असे डिजिटल प्रॉडक्ट्स विकून अफिलिएट मधून मस्त पैसे कमवू शकतो. डिजिटल प्रॉडक्ट्स वर जास्त कमिशन मिळते. पण सर्वात महत्वाचे आहे कि तुमचे ऑडियन्स चा तुमच्या वर विश्वास असणे महत्वाचे आहे. कारण जेव्हा तुम्ही खरी आणि योग्य माहिती द्याल तेव्हा लोक तुमच्या लिंक वरून प्रॉडक्ट घेतील. तुम्हाला त्या प्रॉडक्ट विषयी माहिती असणे महत्वाचे आहे आणि तुम्ही जर ते वापरले असतील तर अजूनच चांगले

आता आपण पाहूया अमॅझॉन, फ्लिपकार्ट(amazon,Flipkart) सारखे अफिलिएट मार्केटिंग कसे काम करते
१. जर समजा सध्या बरेच जण १०००० चे आतील मोबाईल सर्च करत असतील
२. आपण १ पोस्ट टाकायची आपल्या ब्लॉग वर टॉप १० मोबाईल १०००० च्या आतील
३. त्या पोस्ट मध्ये आपण सर्व माहिती व्यवस्तीत आणि खरी लिहायची आणि सोबत लिंक पण द्यायच्या
४.जर कोणी त्या लिंक वरून ठराविक वेळात तो प्रॉडक्ट किंवा दुसरा प्रॉडक्ट जरी घेतला तरी तुम्हाला कमिशन मिळते
५ जेवढे जण घेतील तेवढे प्रॉडक्ट चे कमिशन तुम्हाला मिळेल

आता आपण पाहूया डिजिटल माध्यम द्वारे अफिलिएट मार्केटिंग कशी करतात

  • आता सगळ्यात जास्त सर्च होतो तो म्हणजे डिजिटल मार्केटिंग(Digital marketing) त्याच्या विषयी पाहू या
  • आपण डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती द्यायची योग्य आणि खरी
  • जेव्हा त्यांना डिजिटल मार्केटिंग(Digital Marketing) विषयी अजून सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तिथे आपण डिजिटल मार्केटिंग ची इ बुक ची माहिती देऊ शकतो
  • जेव्हा कोणी आपल्या लिंक द्वारे इ बुक खरेदी करेल तेव्हा आपल्याला कमिशन मिळेल
  • डिजिटल प्रॉडक्ट्स चे कमिशन जास्त असते

Affiliate Marketing in marathi आम्ही आपल्या मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: