अबोली फुलाबद्दल माहिती मराठीत – Aboli Flower Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला अबोली फुलाबद्दल माहिती मराठीत – Aboli Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – स्वस्तिक (तगर)

अबोली – Aboli Flower Information in Marathi

१] मराठी नाव – अबोली
२] इंग्रजी नाव – Crossandra Infundibuliformis

अबोलीची ही फुले फारच नाजूक असतात. ही फुले सर्वांना आवडतात. रंग : या फुलांचे गडद अबोली, फिकट अबोली आणि फिकट हिरवा रंग असे रंग असतात.

वर्णन : या फुलांची झाडे फारशी उंच नसतात. प्रत्येक फांदीला एका आड एक पान असते. फांद्या लहान असताना हिरव्या असतात. झाड मोठे झाले की या राखाडी रंगाच्या दिसतात.

अबोली या झाडाची पाने हिरवीगार असतात. या पानांचा आकार लांबट व उभट असतो. पानांना कडेने नक्षी असते. फुलांचा रंग फिकट व गडद केसरी असतो.

फुलांना ४-५ पाकळ्या असतात. ही फुले फारच नाजूक असतात. पण हिरव्या पानात यांचा रंग फार खुलून दिसतो उपयोग : या फुलांचा उपयोग जाई, मोगरा, जुई यांसारख्या पांढऱ्या फुलांबरोबर गजरा करताना वापरतात.

नुसत्या अबोलीच्या फुलांचा गजरा करतात. तसेच हारात पण ही फुले वापरली जातात. वैशिष्ट्य : अबोलीची फुले दिसायला सुंदर असतात, पण त्या फुलांना वास नसतो.

अबोली फुलांच्या बिया या शंकूच्या आकाराच्या व लहान असतात. झाडावरील तयार बिया वाळल्या की खाली पडतात. त्यावर पाणी पडून त्याची रोपे तयार होतात.

अबोलीची फुलझाडे पुष्कळ लोक अंगणात लावतात. या झाडांना फुले लवकर येतात. एका ठिकाणी एकच फूल येते.

काय शिकलात?

आज आपण अबोली फुलाबद्दल माहिती मराठीत – Aboli Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: