अगदी सोप्या पद्धतीने blog कसा तयार करावा – blog meaning in marathi

 नमस्कार मित्रांनो! मराठी युक्ती ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज या लेखामध्ये आपण शिकणार आहोत की blog meaning in marathi आणि ब्लॉग कसा तयार करावा. आपण आज मराठी मध्ये blog तयार करायला शिकणार आहोत कारण यापूर्वीच्या लेखामध्ये आपण माहिती करून घेतली की ब्लॉग काय असतो.

मित्रानो आपल्या सर्वांना तर माहीतच असेल की यापूर्वी google adsense मध्ये मराठी ब्लॉग ला मान्यता नव्हती त्यामुळे कित्येक मराठी भाषिकांना ब्लॉग बनवायला व त्या द्वारे पैसे कमवायला अडचणी येत होत्या. परंतु मराठी भाषिकांची गूगल वर मराठीतून माहिती मिळवण्याची वाढती गरज लक्षात घेऊन गूगल ने 2020 मध्ये मराठी ब्लॉग ला adsense मध्ये मान्यता दिली.

ही गोष्ट मराठी भाषिक लोकांसाठी व marathi blog आणि marathi bloggers साठी खूपच आनंदाची आहे. आता कोणीही मराठीतून ब्लॉग लिहून पैसे कमावू शकतो. तर चला मग शिकूया blog कसा तयार करावा आणि blogspot blog कसा तयार करावा मराठी मध्ये

ब्लॉग म्हणजे आहे (blog meaning in marathi)

मित्रांनो मी अगोदर तुम्हाला ब्लॉग काय असतो या बद्दल थोडी माहिती देतो म्हणजे तुम्हाला blog बनवताना कुटलीही अडचण येणार नाही.

ब्लॉग एक प्रकारची वेबसाईट च असते ज्यामध्ये आपण माहिती, ज्ञान, मनोरंजनाच्या गोष्टी जसे की ऑडियो गाणी व्हिडिओ गाणी, फोटो, सिनेमा आदी लोकांपर्यंत पहुचाऊ शकतो व तसेच आपले अनुभव लोकांसोबत शेअर करू शकतो.

ब्लॉग अनुभव सांगण्याचा व लोकांपर्यंत माहिती व ज्ञान पोहचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ज्याप्रमाणे आपण निबंध, लेख लिहितो त्याचसारखे लेख आपल्याला लिहून ब्लॉग मध्ये publish करायचे असतात.

जेंव्हा आपल्याला एखाद्या विषया बद्दल किंवा एकाद्या लोकपरीचीत व्यक्ती बद्दल माहिती हवी असते तर आपण काय करतो त्या विषया संबंधित शब्द टाईप करून आपण गूगल मध्ये शोधतो. Google आपल्याला त्यासंबंधी लाखो परिणाम (results) दाखवतो. थोडक्यात गूगल ने दाखवलेल्या त्या results लाच आपण ब्लॉग म्हणू शकतो.

थोडक्यात ब्लॉग आणि वेबसाईट सारखेच असतात त्यांमध्ये फरक एवढाच आहे की ब्लॉग बनवण्यासाठी आपण मुफ्त टेम्प्लेट चा वापर करतो त्यासाठी आपल्याला web designing च ज्ञान असणं गरजेचं नाही. परंतु वेबसाईट बनवायला html, css, javascript सारख्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा येणं आवश्यक आहे.

ब्लॉग तयार करायला कोण कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?

मित्रांनो आपण जर ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असाल तर आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल की blog तयार करायला मला कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता पडेल? काहीजण तर विचार करत असतील ब्लॉग बनवन म्हणजे खुप अवघड काम आहे. त्यासाठी आपल्याला html, css, javascript सारख्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा येण्याची आवश्यकता असेल.

परंतु असं मुळीच नाही ब्लॉग कुणीही बनवू शकतो, blog बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रतेची अट नाही किंवा coding येण्याची देखील गरज नाही. आपल्याला जर खरच आवड असेल लेख लिहिण्याची तर आपण देखील blogging करू शकता, आपले विचार जगभरातील लेकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवू शकता. एवढच नव्हे तर आपण आपल्या ब्लॉग वर google च्या जाहिराती लाऊन लाखों पैसे देखील कमावू शकता.

आज जगभरामध्ये असे अगणित लोक आहेत जे blogging करून महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत. आपण ही कमावू शकता! आपण जर मराठी भाषेमध्ये blog बनवण्याचा विचार करत असाल तर आपल्या साठी सुवर्ण संधी आहे.कारण येवढे वर्ष google adsense वर मराठी ब्लॉग ला मान्यता नव्हती आता 2020 मध्ये मान्यता मिळाली आहे त्यामुळे अगदी मोजकेच मराठी ब्लॉग गूगल वर उपलब्ध आहेत. आपण पण लवकरात लवकर ब्लॉग बनवा आपला ब्लॉग अगदी कमी वेळात rank करू शकतो.

ब्लॉग बनवायला लागणाऱ्या गोष्टी:

  1. Domain name
  2. Hosting
  3. लॅपटॉप / मोबाईल

मिञांनो ब्लॉग बनवायला तुम्हाला या तीन च गोष्टींची आवश्यकता पडेल. सर्वात पहिली म्हणजे domain name म्हणजे .com , .net , .in सारखे domain extension सोबत असलेलं ब्लॉग चा address. उदाहरणात माझा दुसरा एक हिंदी ब्लॉग आहे ज्याच आहे ज्या वर मी हिंदीमध्ये लेख लिहितो.

त्यानंतर आपल्याला आवश्यकता असेल hosting ची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक android mobile किवा लॅपटॉप ची ज्याद्वारे आपण लेख लिहिणार.

ब्लॉग कसा तयार करावा (how to create blog and meaning of blog in marathi)

मित्रांनो जर तुम्हाला blog तयार करायचा असेल तर एक domain आणि hosting ची आवश्यकता पडेल. आपण हे domain आणि hosting विकत घेऊ शकतो.परंतु जरी आपल्याकडे ते घेण्यासाठी पैसे नसतील तरी पण काही हरकत नाही आपण blogger च्या मदतीने फ्री ब्लॉग बनवू शकतो.

कारण blogger हे एक google च उत्पादन आहे त्यामुळे blogger कडून आपल्याला फ्री मध्ये blogspot domain आणि hosting मिळते. तर चला मग शिकूया blog कसा तयार करावा, blogspot blog कसा तयार करावा, free blog कसा तयार करावा.

मित्रांनो ब्लॉग तयार करण्यासाठी गूगल वर अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसे की blogger, wordpress, wix, tumblr, medium, आदी. यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्म च्या मदतीने ब्लॉग बनवू शकाल परंतु blogger आणि wordpress हे दोन प्लॅटफॉर्म सर्वाधिक प्रचलित आहेत आणि ते सर्वात जास्त blog बनवण्यासाठी वापरले जातात.

WordPress ब्लॉग ची निर्मिती करण्यासाठी बेस्ट आहे परंतु त्यावर आपल्याला फ्री ब्लॉग बनवता येणार नाही. आपल्याला जर wordpress वर blog बनवायचा असेल तर आपल्याला domain आणि hosting विकत घ्यावी लागेल.आपण जर blogger वर ब्लॉग बनवला तर आपल्याला फ्री मध्ये ब्लॉग बनवता येईल. म्हणून आपण blogging मध्ये नवीन असाल तर blogger वरच ब्लॉग तयार करा.

Blogger वर फ्री ब्लॉग कसा तयार करावा

मित्रांनो मी आपल्याला फ्री ब्लॉग कसा तयार करावा याबद्दल सविस्तर step by step माहिती देतो आपल्याला फक्त त्या स्टेप च लक्ष्य देऊन अनुसरण करायचं आहे. आपण देखील अगदी सहज ब्लॉग बनवू शकाल.

Step #१: आपल्याला google वर जाऊन blogger टाईप करून सर्च करायचं आहे.

Step #२: Google आपल्याला blogger संबंधित अनेक परिणाम दाखवेल आपल्याला त्यातील blogger च्या ऑफिसियाल वेबसाईट blogger.com ला भेट द्यायची आहे.

Step #३: त्यानंतर जर आपल blogger वर अकाउंट नसेल तर email id ने blogger वर log in करायचं आहे.

Step #४: नंतर आपल्या ला create a new blog वर क्लिक करायचं आहे.

Step #५: आता तुमच्या समोर तीन ऑप्शन येतील title, address आणि theme यामध्ये आपल्याला आवश्यक माहिती भरायची आहे.

Title: Title हे तुमच्या ब्लॉग च नाव असेल. आता तुम्हाला तुमच्या ब्लॉग च नाव ठेवायचं आहे. नाव ठेवताना थोडा विचार करून च ठेवा. कारण आपल्या ब्लॉग च नाव जर attractive असेल तर त्याला जास्तीत जास्त लोक भेट देतील. त्यामुळे ब्लॉग च नाव attractive कसा होईल याचा विचार करा.

Address: यानंतर आता आपल्याला blog address लिहायचा आहे. जे ब्लॉग च नाव आहे त्यावरूनच ब्लॉग चा blog address देखील ठेवा. जसे या माझ्या ब्लॉग च नाव आहे मराठी युक्ती आणि blog चा address आहे marathiyukti.blogspot.com. याप्रमाणे तुम्हाला पण तुमच्या ब्लॉग चा address ठरवायचा आहे.

जर आपण टाईप केलेला blog address जर अगोदरच कुणी वापरत असेल तर तिथे this blog address is not available असं लिहून येईल. अशी सूचना आल्यानंतर तुम्हाला ब्लॉगच्या address मध्ये काही बदल करावे लागतील. ब्लॉग चा address लिहिल्यानंतर जर this blog address is available अशी सूचना लिहून आली तर मग आपण हा address आपल्या ब्लॉग ला ठेऊ शकतो.

Blog address थोडा सोपा ठेवा जेणे करून इतरांना लक्षात ठेवायला अडचण नाही येणार आणि हाच blog address तुमच्या ब्लॉग चा url असेल.

Theme: आता तुम्हाला तुमच्या blog साठी एक theme निवडायची जेणे करून तुमचा ब्लॉग सुंदर दिसेल. Blogger मध्ये तुम्हाला अनेक theme मिळतील त्यातील कोणतीही एक तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जर दुसरी एकादी premium blogger theme तुमच्या ब्लॉग ला ठेवायची असेल तर तुम्ही ठेऊ शकता. Premium theme ब्लॉग मध्ये कशी install करायची हे मी तुम्हाला पुढच्या लेखामध्ये सांगतो.

Step #६: एवढी सर्व माहिती भरल्यानंतर आता आपल्याला save वर क्लिक करायचं आहे.

आभिनंदन आपण यशस्वीरीत्या blog तयार केला.मला आशा आहे की तुम्हाला blog कसा तयार करायचा समजले असेल. मी free blogspot blog कसा बनवायचा या बद्दल सविस्तर माहिती मराठी मध्ये देऊन आपल्याला सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

निष्कर्ष: blog कसा तयार करावा

मित्रांनो आज आपण फ्री blog कसा तयार करावाblog कसा तयार करावाblogspot blog कसा तयार करावा, blog meaning in marathi या सर्व गोष्टींची माहिती मराठी भाषेत घेतली. मला आशा आहे की तुम्हाला ही “meaning of blog in marathi”

माहिती खुप आवडेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली काही सोशल मीडिया बटण आहेत facebook, whatsapp, twitter त्यावर क्लिक करून ही माहिती आपल्या मित्रांना send करायला विसरू नका.

मित्रहो तुम्हाला जर blog तयार करायला काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या काही blogging बद्दल शंका असतील तर आम्हाला comment मध्ये विचारा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांना नक्की उत्तर देऊ, धन्यवाद…!!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: