Emoji Meaning In Marathi – ईमोजी म्हणजे काय ?

Emoji meaning in marathi – नमस्कार मित्रांनो! तुम्ही whatsapp, facebook, insta सारख्या सोशल मीडिया नेटवर्क वर मित्र – मैत्रिणींसोबत किंवा फॅमिली सोबत गप्पा मारताना emoji चा वापर केला असेलच, यात काही शंका नाही !

पण तुम्हाला या ईमोजी बद्दल पूर्ण माहिती आहे का 😉 ?  ईमोजी म्हणजे काय emoji meaning in marathi , emoji चा इतिहास आणि ईमोजी कधी व कोणता वापरायचा?

कारण तुम्हाला माहीतच असेल की आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप च्या कीबोर्ड मध्ये हजारों ईमोजी आहेत आणि प्रत्येक इमोजीचा अर्थ हा वेगवेगळा आहे. त्यामुळे कोणत्या प्रसंगी कोणता emoji वापरावा हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.

तर चला मग आजच्या या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया emoji म्हणजे काय emoji meaning in marathi, whatsapp emoji meaning in marathi आणि ईमोजीचा इतिहास history of emoji

Emoji म्हणजे काय – Emoji meaning in marathi

Emoji हे सोशल मीडियावर गप्पा मारताना वापरले जाणारे छोटे चिन्ह आहेत जे की मानवी भावनांचे आणि क्रियांचे वर्णन करतात.

उदाहरणात आपल्याला हसायची क्रिया दर्शावयची असेल तर आपण smiley emoji 🙂 चा वापर करू शकतो, दुखीपणा दाखवायचा असेल तर sad emoji 🙁 आणि रडण्यासाठी cry emoji 😥 आपण वापरू शकतो.

त्याच प्रमाणे आपल्याला जर “i love you” लिहायचे असेल तर आपल्याकडे love emoji आहेत. त्यामुळे आपल्याला हा पूर्ण शब्द लिहायची गरज नाही आपण एक love emoji वापरून देखील भावना व्यक्त करू शकतो.

whatsapp emoji meaning in marathi

अशाप्रकारे whatsapp emoji, facebook emoji हे मानवी भावनांचे आणि क्रियांचे वर्णन करतात आणि वापरण्यास सोपे असल्या कारणाने आपला वेळही वाचवतात. इमोजिमुळे सोशल मीडियावरील निर्जीव गप्पांमध्ये भावनांचा समावेश झाला आहे.

ईमोजी चे प्रकार – Types of emoji in marathi

emoji चे बरेचसे प्रकार आहेत जसे की smile emoji, sad emoji, love emoji, इत्यादी. त्यातील काही ईमोजी चे मुख्य प्रकार खाली दिले आहेत.

स्मायली आणि भावना 😄😂🤣😭🤔😜😋🙄🥺🤭😰😩😱😤🤬🥱😇
People (लोक) 🙋🤷🤦🏇🤹🎅👨‍🚒👪👩‍❤️‍👩👣💃
प्राणी आणि निसर्ग 💐🌼🌴🌺🔥⛄🌤️🌦️⛈️🌈🪐🙈🙉🙊🦄🦕🐑🦦🐬🐌
खाद्यपदार्थ आणि पेय 🍉🍇🥝🍞🍌🍔🥘🍰🍿🍭🍺🥂🍾🌮🍟
प्रवास आणि ठिकाणे 🚆🚛🛺🚦🚧⛽🚑🚃⛵🛫🏥🎢🏖️
अक्टिविटी आणि इव्हेंट 🎂🎊🎁🪔🎃🏆🎸📻🏐🏀🎯🖌️
वस्तू 📱💻💵🏧💰🧸👔👒🔧🧲✂️📝📚🕠📅
चिन्हे ❤️🟧♊♓❌🚫❓🚯🚭📵🎦▶️⏬🔊♻️🕉️↩️
ध्वज 🇮🇳🇦🇺🇦🇬🇦🇩🇧🇹🇩🇬🇩🇿🇰🇳🇱🇰🇱🇷🇳🇪🇵🇫🇸🇽🇻🇮🏴󠁧󠁢󠁷󠁬󠁳󠁿

Emoji चा इतिहास – history of emoji in marathi

मित्रांनो! इंटरनेट मुळे आपल्या पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या संवादात आजपर्यंत अनेक बदल झाले आहेत. सोशल मीडिया आल्यापासून तर संवादाची व्याख्याच बदलली की काय असे मला वाटते !

कारण पूर्वी आपण परिवारातील सर्व सदस्य एकत्र येऊन जेवण करायचो आणि जेवण झाल्यानंतर खूप गप्पा टप्पा मारायचो. उन्हाळ्याच्या दिवसात गच्चीवर जोपण्याची तर मज्जाच वेगळी होती. कारण गच्चीवर आज्जी – आजोबांकडून छान छान गोष्टी ऐकायला मिळायच्या, परिवारातील वरिष्ठ लोकांचे अनुभव एकायला मिळायचे आणि विशेष म्हणजे पूर्वीचा संवाद हा थेट असायचा सामोरा समोर. त्यामुळे शरीराच्या हालचाली व हावभावाणुळे तो प्रसंग मनात आणखीनच खोलवर रूजायचा.

पण सोशल मीडिया आल्यापासून थेट सवांदच जवळपास संपला आहे, आजकाल एकत्र येऊन गप्पा मारताना कुणी दिसत नाही. जो तो मोबाईलमध्ये व्यस्त असतो. आजकाल लोक गप्पा या केवळ सोशल मीडियावर च मारताना दिसत आहेत.

पण ऑनलाईन गप्पा मारताना आपले हावभाव लोकांना कसे समजतील? या गोष्टीची उणीव मोठ्या प्रमाणावर भरून काडली ती म्हणजे emoji ने . आज मानवी हावभावंचे वर्णन करणारे हजारो emoji उपलब्ध आहेत. या सर्व इमोजीचे श्रेय जाते जपान मधील शिगीतका कुरिका यांना कारण त्यांनी १९९९ मध्ये जपान मधे पहिल्यांदा ईमोजी तयार करून एक emoji ची नवीन डिजिटल भाषा सुरू केली.

पहिला emoji कधी तयार झाला ?

१९९९ मध्ये जपानी कलाकार शिगितका कुरिता या व्यक्तीने जगातील सर्वात पहिला ईमोजी (emoji) तयार केला.शिगितका कुरिता यांनी जपानमधील मुख्य मोबाईल कंपनी docomo च्या ‘i-mod’ नावाच्या प्रारंभिक इंटरनेट प्लॅटफॉर्मवर डेव्हलपर म्हणून काम केले आहे.

त्यांना माहिती सोप्या आणि संक्षिप्त रुपात व्यक्त करण्यासाठी एक आकर्षक प्लॅटफॉर्म हवा होता. ते अशा एखाद्या मार्गाच्या शोधात होते की जेणेकरून माहितीला अगदी सोप्या पद्धतीने संक्षिप्त रुपात मांडता यावे. यामुळे वेळ ही वाचेल आणि आवश्यक माहितीही लोकांपर्यंत पोचली जाईल.

त्यामुळे त्यांना emoji हा मार्ग प्रभावी वाटला. त्यांनी सर्वप्रथम १९९९ मध्ये smiley emoji तयार केला होता आणि माहिती संक्षिप्त रूपात मांडण्याचा हा मार्ग जपानी लोकांना फारच आवडला. कुरिताने १२ × १२ pixels चा ईमोजीचे रेखाटन केले होते जे की ‘ आय- मोड ‘ च्या इंटर्फेस वर अगदी सहजपणे वापरले जाऊ शकेल. आज त्यांनी तयार केलेले अनेक emoji आपण सोशल मीडियावर गप्पा मारताना वापरतो.

जागतिक ईमोजी दिवस (World emoji day) कधी साजरा केला जातो ?

मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती देखील नसेल की जगभरामध्ये जागतिक ईमोजी दिवस (world emoji day) देखील साजरा केला जातो. हा दिवस १७ जुलै रोजी साजरा केला जातो.

व्हॉट्सअँप हे एक संवाद साधण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअँप वर भावना व्यक्त करण्यासाठी शब्दाऐवजी emoji हे सर्रास वापरले जातात. आजकाल ईमोजी चा क्रेझ फारच वाढला आहे. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की भारतात smiley emoji आणि flying kiss emoji हे सर्वात जास्त वापरले जातात. Emoji च्या वाढत्या वापरामुळे जगभरात १७ जुलै ला world emoji day साजरा केला जातो. या दिवशी जास्तीत जास्त ईमोजी वापरून हा जागतिक ईमोजी दिवस साजरा केला जातो.

निष्कर्ष: emoji meaning in marathi

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ईमोजी बद्दल पूर्ण माहिती घेतली जसे की emoji म्हणजे काय emoji meaning in marathiwhatsapp emoji meaning in marathi, emoji चा इतिहास, आणि ईमोजी जागतिक दिवस (world emoji day), इत्यादी

मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. अशीच नवीन नवीन उपयुक्त माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट देत रहा, धन्यवाद…!!

Marathi Sangrah

Marathi Status Wishes Quotes Poems

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: