Top 3 dahanu beach for vacation | डहाणू मधील 3 निसर्गरम्य समुद्रकिनारे

मी आज तुम्हाला पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील Top 3 dahanu beach बद्दल सांगणार आहे अपेक्षा करतो कि तुम्हाला ही पोस्ट आवडेल.

आता उन्ह्याळ्याचे दिवस चालू होतील आणि मग ह्या उन्ह्याच्या उकड्या पासून सुटका मिळवण्यासाठी बीच किंवा समुद्रकिनारा हि नक्कीच सर्व लोकांची पसंत असणारे असते. Dahanu beach हे मुंबईपासूनजवळपास 120 किमी अंतरावर आहे.
तर पालघर पासून जवळपास 43 किमी अंतरावर आहे.

त्यामुळे येथील dahanu beach चे हे अंतर फारसे दूर नाही

Dahanu Beach | डहाणू बीच

Dahanu beach सुट्टीचे दिवस घालवण्यासाठी डहाणू मधील सर्वोत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण मुंबई व पालघर पासून दूर नाही त्यामुळे त्यांच्यासाठी हा dahanu beach हा तुम्ही कमी खर्चात पाहून येऊ शकता, येथील स्थानिक लोक सहकारी आहेत. खूपच शांत व सुंदर असणाऱ्या ह्या समुद्रकिर्यावर पूर्ण दिवस कसा निघून जाईल हे आपल्याला कळणार देखील नाही. त्यामुळे तुमचा बहुतांश वेळ समुद्रकिनाऱ्यावर जाईल.

समुद्राकाठचे शिंपले गोळा करणे, मऊ वाळूवर बिना अनवाणी पायाने चालणे,वाहणाऱ्या लाटांचा व त्यांच्या आवजाचा आनंद घेणे व त्या लाटांसोबत येणारी गारगार हवा आणि समुद्रकिनारी असलेल्या झाडांची सावली याचा आनंद आपल्याला घेता येतो.तसेच येथे तुम्हाला उंट आणि घोडा गाडीच्या सवारीचा आनंद घेता येईल.
उन्हाळ्यात हा समुद्र किनारा तुम्हाला गारवा प्रदान करेल , शांत व गार वारा संपूर्ण समुद्रकिनारा थंड करतो.

भूक लागल्यास खाण्यासाठी समुद्राच्या किनारपट्टीवर काही हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथे विकेंडला सहसा जास्तच गर्दी असते. हा डहाणू समुद्रकिनारा आकाराने थोडा लहान आहे पण खूपच स्वच्छ नेटका आणि व्यवस्थित आहे.

Chinchani Beach | चिंचणी बीच

शहरी जीवनाच्या गडबडीपासून दूर असणाऱ्या चिंचणी बीचला निसर्गाची एक अद्भुत देणगी लाभली आहे. हा डोळ्यांना शांतता देणारा समुद्रकिनारा पालघर जिल्ह्यात असून मुंबई पासून 130 km अंतरावर स्थित आहे तर पालघर पासून हेच अंतर जवळपास 26 km आहे.

शांत वातावरण असलेला chinchani beach dahanu हा समुद्र किनारा आपल्या शांततेसाठी व कमी गर्दी साठी देखील लोकप्रिय आहे. तुम्हाला जर कमी गर्दीच्या ठिकाणी फिरायाला आवडत असेल तर हा समुद्रकिनारा नक्कीच तुम्हाला आवडेल. कारण हा समुद्र किनारा माझाही सर्वात आवडता आहे.

Chinchni beach जवळच एक शाळा आणि महाविद्यालय आहे, तसेच येथे समुद्रकिनाऱ्यावर खाद्यपदार्थाचे आणि इतर स्टॉल्स आहेत. मुलांची शाळा सुटली की येथे थोडा वेळ येतात. येथील वाळू मुख्यतः पांढरी आहे काही ठिकाणी त्यामुळे येथील किनाऱ्याच्या वाळूवर फिरायचा आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे chinchni beach च्या समुद्रकिनाऱ्यावर खूप लांब चालणे, किंवा शांत समुद्रात पोहणे तसेच संध्याकाळी अस्त होणाऱ्या सूर्याचा आनंद घेणे हे सर्व आपल्याला ह्या बीच वर करता येईल.

हा अजूनही खूप लोकांना जास्त माहिती नसल्यामुळे येथे जास्त गर्दी नसते त्यामुळे येथे तुम्हाला मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट पाहायला मिळणार नाहीत फक्त छोटे स्टॉल्स ज्यामधे पाणीपुरी, शेवपुरी, बर्फाचा गोळा, वडापाव, ज्यूस, आइस्क्रीम, नारळपाणी इत्यादी पदार्थांची चव घेता येईल.

समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे. तुम्ही या समुद्रकिनाऱ्यांवर स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी चालवण्याचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्हाला तुमची गाडी chinchni beach वरच पार्क करता येईल.

तुम्हीही माझ्यासारखेच बीच प्रेमी असाल तर एकट्यात वेळ घालवण्यासाठी हा बीच म्हणजे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला मनोरंजनासाठी समुद्राच्या पाण्यात पोहू शकता तसेच येथे हॉर्स रायडिंग आणि उंट राइड उपलब्ध आहे, कधीकधी Atv राइड देखील उपलब्ध असतात.

समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी सनसेट बघताना खूप मज्जा येते, ऊन्हाळी सिझन मध्ये दुपारच्या वेळी ते अधिक गरम होते. त्यावेळेस किनाऱ्यावर फिरताना आपल्याला गारव्याची अनुभूती होईल.

जर तुम्हाला एकांतात विश्रांती आणि सोबत निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच आपल्याला पसंत पडेल. माझाही पर्सनल फेवरेट बीच असल्याने मी या बीचची शिफारस करीन की तुम्ही एकदा तरी या chinchni beach ला भेट देऊन बघावी.

dahanu bordi beach | बोर्डी बीच

Dahanu beach आणि bordi beach dahanu हे मुंबईच्या मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाताना जवळजवळ असणारे दोन समुद्रकिनारे आहेत आहेत. वाळू आणि कमी भरती सह जोडलेले किनारे आहेत. एक दिवसाच्या सहलीसाठी बोर्डी बीच हा उत्तम पर्याय आहे. स्वच्छ सुंदर किनारपट्टी आणि झाडांच्या छतामुळे हा बीच म्हणजे शांततेचा जणू आदर्शच आहे

Bordi beach हा जवळच्या डहाणू रोड रेल्वे स्टेशनपासून 16 किमी अंतरावर आहे. तेथे पोहोचण्यासाठी तुम्हाला सुमारे 20 मिनिटे लागतील.
तसेच पालघर पासून हे अंतर 57 किमी आहे.

त्याचप्रमाणे बोर्डी बीच जवळच्या घोलवड रेल्वे स्थानकापासून जवळपास 2.1 किमी अंतरावर आहे आणि बोर्डी रेल्वे स्थानकाद्वारे देखील पोहोचता येते.
मुंबई शहरापासून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर आहे.
शांत आणि सुंदर डहाणू बोर्डी समुद्रकिनाऱ्याला भेट देताना आपण आनंदी होऊन जातो.

येथील समुद्रकिनाऱ्याचा प्रवाह आणि पाण्याची पातळी कमी असते त्यामुळे भरतीमुळे आपल्याला पाणी खूप आत आहे असे वाटते. पाणी किनाऱ्यांपासून दूर असले तरी पिकनिक ग्रुप बराच वेळ झाडांच्या छतांखाली घालवतात.

हा किनारा सुरूची झाडे, आणि नारळाच्या झाडांखाली आराम करण्यासाठी आणि वाळूवर खेळण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
शहराच्या गोंधळापासून दूर राहणे ही आणखी एक मजा आहे.
समुद्री किनारी विविध प्रकारचे शंख आणि शिंपले गोळा करणे हा खूप जणाचा छंद असतो तो छंद आपल्याला येथे जोपासता येईल.

बोर्डी हे एक छोटेसे गाव असल्याने समुद्रकिनाऱ्याशिवाय पाहण्यासारखी जास्त आकर्षण ठिकाणे नाहीत. जेव्हा तुम्ही येथे जाण्याचे नियोजन करता तेव्हा आपल्यासोबत पुरेसे अन्न, पाणी आणि इतर आवश्यक गोष्टी ठेऊ शकता.
तुम्हाला येथे छोटे मोठे स्टॉल मिळतील जेथे तुम्ही प्रत्येक beach वर फेमस असणारी पाणीपुरी व शेवपुरी, कोल्ड्रिक्स, आइस्क्रीम, बर्फाचा गोळा यांचा आस्वाद घेऊ शकता.

या समुद्रकिनार्याला एकेकाळी dahanu beach पैकी सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून बघितले जात होते, मात्र आता थोडा फार कचरा इकडे पसरलेला दिसेल. मात्र हा कचरा आपणच पसरवत असल्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

Dahanu Beach resort

1) treat resort gholvad

Bordi beach dahanu च्या अगदी जवळ असलेल्या treat beach resort & spa येथे तुम्हाला एका मोठा swimming pool सह स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थांसोबत मनोरंजनाच्या अनेक सोयी व सुविधा तुम्हाला मिळतील.

तसेच येथे तुम्हाला खूपच चांगली स्पा सुविधा अनुभवायला मिळेल, मुक्काम करण्यासाठी खूपच चांगले ठिकाण आहे . तेथून bordi beach dahanu जवळपास 2 किमी अंतरावर आहे. त्यामुळे येथे राहून तुम्हाला येथील beach चा सुद्धा आनंद घेता येईल. Treat resort gholvad दिवस मजेत आणि आनंदात घालवण्यासाठी योग्य ठिकाण आहे.

2) sea crest beach resort dahanu

sea crest beach resort dahanu हे रिसॉर्ट नारळ आणि चिकूच्या झाडांच्या सहवासात डहाणू समुद्रालगतचे रिसॉर्ट आहे.

तुम्हाला एका रिसॉर्ट मध्ये हव्या असलेल्या सर्व प्रकारच्या सुविधा येथे मिळतील. तुम्हाला येथे चविष्ट समुद्री fish, crabs, Shrimp इत्यादी अतिशय छान recipe मध्ये बनवलेले अन्न मिळेल.

sea crest beach resort dahanu मध्ये तुम्हाला स्विमींग पुल ची सुविधा सुद्धा मिळेल तसेच टीव्ही आणि इतर सेवाही येथे उपलब्ध आहेत

3) pink lake resort dahanu

pink lake resort dahanu तुम्हाला विविध प्रकारच्या सुविधा मिळवून देते. बाग आहे. हे हॉटेल एक 3-स्टार हॉटेल आहे. तसेच तुम्हाला येथे मोफत high-speed वायफाय फ्री mdhe मिळेल तसेच प्रत्येक रिसॉर्ट ची खासियत असलेले outdoor swimming pool मिळेल.

पार्किंग करण्यासाठी मात्र तुम्हाला येथे अतिरिक्त शुल्क मोजावे लागेल. मॉडर्न प्रसाधनानी सुसज्ज असलेले हे रिसॉर्ट आहे. तसेच खोल्यांमध्ये फ्लॅट-स्क्रीन टीव्ही आणि एअर कंडिशनिंग आहे. Pink lake resort dahanu madhe खेळाचे एक मैदान आहे जेथे लहान मुले विविध प्रकारचे खेळ खेळू शकतात.

4) pearline beach resort dahanu

pearline resort dahanu हे resort dahanu beach समुद्रकिनाऱ्याच्या समोर वसलेले आहे. रिसॉर्टमध्ये तुम्हाला जुन्या आणि नवीन आधुनिक सोयी अश्या दोन्ही प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देत लोकांमध्ये आपले आकर्षण टिकवून ठेवले आहे.

येथे तुम्हाला स्वच्छ खोल्या मिळतील ज्यामध्ये मुख्यतः डिलक्स आणि सुपर डिलक्स रूम आहेत. म्हणजेच एसी आणि नॉन एसी खोल्या. रिसॉर्टमध्ये तुम्हाला कॉर्पोरेट मीटिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक वस्तू आहेत तसेच फर्निचरसह एक मोठा एसी कॉन्फरन्स रूमदेखील आहे.

तसेच तुम्हाला जवळपास 100 व्यक्तींची क्षमता असलेला हॉल सुद्धा मिळेल ज्याचा वापर विवाहसोहळा, पार्टी तसेच इतर प्रसंगी करता येईल. येथे तुम्हाला swimming pool चाही आनंद घेण्यास मिळेल. तसच लहान मुलांसाठी तिथे एक लहान मुलांचे एंटरटेनमेंट पार्क आहे. जेथे लहान मुलांना आनंद देण्यासाठी विविध प्रकरचे खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आणि येथे एक सुंदर बाग सुद्धा बनवली आहे.

Conclusion

तसे बघायला गेले तर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांच प्रमाण हे खूप आहे मात्र या समुद्रकिाऱ्यामधील डहाणू मधील हे समुद्र किनारे हे पण खूप सुंदर आहेत.

त्यामुळे डहाणू मधील हे समुद्रकिनारे लवकरच मोठी पर्यटन स्थळे म्हणून उदयास येथील अस बोलण्यास काहीच हरकत नाही.

आपले vacation Trip हे dahanu beach आपल्याला नक्कीच एन्जॉय करायला भाग पाडतील कारण येथील समुद्रकिनारे आणि इतर नैसर्गीक सुंदरता बघील्यावर आपण त्याच्या मोहात पडल्यावाचून पाहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: