वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी | Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi – मित्रांनो आज “वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

नमस्कार, मी वृत्तपत्र बोलतोय. तुमच्या दिवसाची खरी सुरवात कुणामुळे होत असेल तर ती माझ्यामुळेच होते. दिवसातील पहिला चहा तुम्ही कुणाला वाचत पित असाल तर, तो मला वाचत पिता.

“मूर्ती लहान पण किर्ती महान” असा मी समाजाच्या सगळया स्तरात मुक्त संचार करतो. मी एक साध्या कागद स्वरूपात दिसत असलो तरी समाजात अनेक चांगल्या घडामोडी घडवून आणण्याची ताकद माझ्यात आहे

Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

आपल्या समाजात घडणा-या चांगल्या-वाईट घटना या माझ्यामुळेच तुम्हाला समजतात. एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील म्हणजेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा अशा अनेक क्षेत्रातील माहिती मी माझ्या माध्यमातूनच तुमच्या पर्यंत पोचवितो.

पण आज एक विचार मनात आला की मी माझे मनोगत माझ्याच माध्यमातून लोकांपर्यंत पोचवू शकेन का? हाच तो माझा प्रयत्न. माझ्या जीवनाचा प्रवास वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. दैनिके, साप्ताहिके, मासिके अशा अनेक प्रकारांमध्ये मी प्रकाशित झालो आहे.

माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती विचाराल तर तो संपादक. समाजात घडलेल्या घडामोडींचा योग्यरीतीने अभ्यास करून त्याविषयी संपूर्ण माहिती मिळवून ती माहिती योग्य शब्दात मांडण्याची जबाबदारी ही संपादकाची असते. ‘Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी

ही संपूर्ण जबाबदारी पार पाडून एक उत्तम लेख माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविण्याचे काम काम संपादक करतो. त्यामुळेच माझे संपादकाशी एक सुंदर नाते तयार झाले आहे. संपूर्ण घटनांचे लेख तयार झाले की ते छापखान्यात छपाईसाठी पाठविले जातात.

हा देखील निबंध वाचा »  होळी निबंध मराठी | Holi Nibandh in Marathi

लेख-बातम्यांचे सुटसुटीत विलगीकरण झाले की, माझी छपाई होऊन वृत्तपत्रात रूपांतर होते. वेगवेगळया ठिकाणी, वेगवेगळया भाषांमधून मी समाजाचे मनोगत व्यक्त करतो. छपाई झाल्यानंतर मला वेगवेगळया भागात पाठविले जाते आणि विविध माध्यामांतून माझी घरपोच सेवा केली जाते.

समाजात घडणा-या घटनांबद्दल लोकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी मी माझे माध्यम खुले केले आहे. माझ्याच माध्यमातून लोक आपले विचार मांडूण इतर लोकांशी संवाद साधू शकतात. Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

अगदी सर्वसामान्य माणूस आपले मनोगत वृत्तपत्रांतून व्यक्त करून सरकारवर अंकूश ठेवू शकतो. म्हणून माझे समाजातील स्थान फार महत्वाचे आहे.

समाजात घडणा-या बातम्यांसोबतच मी अनेक यशस्वी लोकांचे लेख, शब्दकोडी, गंमती-जमती, स्त्रीयांसाठी रेसीपीज, लहान मुलांसाठी अभ्यासातील कोडी, राशी-भविष्य, विज्ञान-तंत्रज्ञानातील माहिती, अशा अनेक माहितीचा संग्रह घेऊन येत असतो.

त्यामुळेच घरातील लहानांपासून ते वृध्दापर्यंत मी सगळयांचा जवळचा आहे. शाळा, कॉलेज, दवाखाना, बँक या सर्व ठिकाणी तसेच बस-रेल्वेतून प्रवास करतानासुध्दा लोक मला वाचताना दिसतात. घराघरांमध्ये मी एक महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. हेतु, उदीष्ट वेगवेगळे असले तरी माझी वाट सर्वजण तेवढयाच उत्कटतेने पाहत असतात. “Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi”

घराघरांमध्ये पोचण्यासाठी मला मैलो न मैल प्रवास करावा लागतो. मलाच नव्हे तर माझ्या विक्रेत्यांना तसेच संपादकापासून ते छपाई करणा-यापर्यंत सर्वांनाच सुट्टीची गरज असते. म्हणून सरकारने वर्षभरातील ठराविक दिवस आम्हाला सुट्टी मंजूर केली आहे. त्यादिवशी आम्ही थोडी विश्रांती घेतो.

हा देखील निबंध वाचा »  पुस्तक आपला खरा मित्र निबंध | Pustak Aapla Khara Mitra in Marathi

वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी

सुट्टीचा पूरेपूर आस्वाद घेतो. दुस-या दिवसापासून पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागतो. आजच्या एकविसाव्या शतकातही मी समाजाचा आरसा बनलो आहे. आजही मी लोकांची एक अनिवार्य गरज बनलो आहे.

दुरचित्रवाणी येऊन पस्तीस वर्षे होऊन गेली तरीही समाजात माझे स्थान कमी झालेले नाही. छोटया झोपडी पासून ते महाल आणि मोठया फ्लॅटमध्ये राहणा-या व्यक्तीला मी हवाच असतो. परंतु येणा-या पुढच्या पिढीला माझे महत्व समजेल की नाही, या गोष्टीची मला खंत वाटते. आजच्या वाढत्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात लोक मोबाईल-इंटरनेट यांवर अवलंबून आहेत. Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

लोक मोबाईलमध्ये इतके गुंतून गेले आहेत की लोकांशी लोकांचा संवाद हरवत चालला आहे. लोकांना कमी वेळेत जास्ती जास्ती फायदा करून घेण्याची सवय लागली आहे. लोकांचा संयम कमी होत चालला आहे. लोकांची वाचनाची सवय, वाचनाची आवड कमी होत आहे.

Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi

मी तुम्हाला एकच विनंती करतो की, माझा वर्षानुवर्षे चालत आलेला हा प्रवास मला असाच पुढे न्ह्यायचा आहे. समाजात घडणा-या घटनांची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. तसेच तुमचा हरवत चाललेला हा वाचनाचा छंद मला पुन्हा निर्माण करायचा आहे.

जेणेकरून येणा-या पुढच्या पिढीला माझे महत्व समजेल. त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. वृत्तपत्राच वाचनातून त्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल आणि याचाच उपयोग आपल्याला आपला देश प्रगत करण्यासाठी होईल.

तर मित्रांना “Vruttapatra Che Manogat Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हा देखील निबंध वाचा »  मकर संक्रांति निबंध मराठी | Makar Sankranti Nibandh Marathi

मित्रांनो, तुमच्याकडे “वृत्तपत्राचे मनोगत निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: