स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी | Swatantravir Savarkar Nibandh Marathi

Swatantravir Savarkar Nibandh Marathi – मित्रांनो आज “स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

सावरकर. होय, वीर सावरकर….. चाफेकर बंधूंच्या बलिदानानंतर घरातच दुर्गामातेसमोर “आजन्म शत्रूला मारता मारता मरेतो झुंजेन” अशी प्रतिज्ञा करणाऱ्या या भगुरपुत्राने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात उचावले नव्हे नव्हे.

Contents

Swatantravir Savarkar Nibandh Marathi

इंग्रजांना त्यांनी भर कोर्टात सगळ्या विश्वासमोर माफी मागायला भाग पाडलं. लहानपणापासूनच देशभक्तीच बाळकडू लाभलेल्या सावरकर कुटुंबान देशासाठी केलेला त्याग खूप मोठा आहे.

इंग्रजाना वठणीवर आणण्यासाठीची सशस्त्र क्रांतीची गरज ओळखून शस्त्रे गोळा करण्यापासून परदेशी जाऊन बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया शिकून घेऊन, तयार करून भारतात पाठवणे हे केवढे धाडसाचे कामा रशिया

जर्मनी यांसारख्या देशांची मदत घेऊन बाहेरून देशासाठी सशस्त्र पाठिंबा मिळवण्यासाठी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेसमवेत ध्येयप्राप्तीसाठी वाटचाल करणाऱ्या शत्रूची कमकुवत बाजू माहित असलेल्या तात्यारावांचा इंग्रज सरकारला किती धाक होता. ‘Swatantravir Savarkar Nibandh Marathi’

स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी

है वेगळं सांगायला नकोच, सक्रिय सहभागी नसलेल्या सावरकरांच्या नुसत्या भाषणाने वा लेखनाने परोक्षरीत्या इंग्रजांविरुद्ध सैन्यात भरती होणारा युवावर्ग असो वा त्यांनी लिहिलेल्या 1857 च्या स्वातंत्र्यसमराची तत्कालीन सतरा भाषातील भाषांतरे असोत,

सावरकरांचा श्वासनश्वास देशकार्यासाठी वाहिलेला होता, अदमानातही कोलू फिरवून तेल काढण्याची काळ्या पाण्याची कठोरतम शिक्षा भोगत देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या वाटाघाटींमध्ये सक्रिय राहत.

कैद्यांना साक्षरतेचा वसा देऊन हिंदूसंघटन करत, आसिंधुधूिपर्यंत अखंड हिंदुस्तानाचे स्वप्न प्रत्येकावर बिंबवणारे सावरकर शब्दांच्या पलीकडचे होते. त्यांची दूरदृष्टी छोट्या छोट्या गोष्टीमधून दिसून येत असे.

हिंदुस्तान अखंड राहावा म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आपल्या लेखणीतून त्यांनी केलेले समाजप्रबोधन आणि देशभक्तीकार्य, महाविद्यालयीन स्तरावर त्यांनी केलेले मुवावर्गाचे संघटन उल्लेखनीय आहे. “Swatantravir Savarkar Nibandh Marathi”

Swatantravir Savarkar Nibandh Marathi

फक्त स्वातंत्र्यसैनिक नव्हते, तर ते उत्तम साहित्यिकही होते. समग्र सावरकर वाङ्मय ज्यात काळे पाणी, माझी जन्मठेप, मोपल्यांचे बंड गोमांतक, हिंदुत्व, जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचा अनुवाद अशा अनेक पुस्तकांचा समावेश होतो, लिहिणार्या सावरकरांनी ‘कमला’ नावाचं महाकाव्यही लिहीतं.

त्यासोबतच विरोच्यासाही तितकंच प्रसिद्ध आहे. त्यांच्या 1857 चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचे तत्कालीन सतरा भाषामध्ये भाषातर करण्यात आले होते, इतकी या पुस्तकाची लोकप्रियता होती. सावरकरांनी वेगवेगळे वृत्त, छंद, फटका पांत कवने रचली. Swatantravir Savarkar Nibandh Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी

स्वराज्यनिर्मात्या जाणत्या राजा शिवछत्रपतींची आरतीही सावरकरांनीच लिहिली. त्यांनी आपल्या लेखनातून इंग्रज सरकारवर घणाघाती टीका केलीच, पण त्याचबरोबर त्यांनी भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी देशभक्तांनी तसेच देशवासियांनी करावयाच्या गोष्टी आद्यकर्तव्ये याबाबतही मार्गदर्शन केले.

इंग्रजांच्या साम-दाम-दंड भेदाने दुरावलेल्या समस्त भारतीयांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी लेखणीच्या माध्यमातून केलं. त्यांनी लेखन करून मराठी साहित्य समृद्ध केलंच, पण त्याचबरोबर मराठी भाषेत नवीन शब्दांची भर घालून तिला आणखी अलंकृत केलं.

या शब्दामध्ये नगरपालिका, महापालिका, महापौर, पविक्षक, विश्वस्त त्वर्य/ त्वरित, गणसंख्या, स्तंभ, मूल्य, शुल्क, हुतात्मा निर्बंध कायदा, शिरगणती, विशेषांक, सार्वमत, झरणी, नभोवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, ध्वनिक्षेपक, विधिमंडळ, अर्थसंकल्प क्रीडांगण, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक परीक्षक, शस्त्रसंधी, टपाल तारण, संचलन, गतिमाननेतृत्व, सेवानिवृत्त वेतन या शब्दाचा समावेश होतो. ‘Swatantravir Savarkar Nibandh Marathi

Swatantravir Savarkar Nibandh Marathi

समानतेची शिकवण देत “आपण एक राहू तर कोणी तुकडे पाडणार नाही ही धारणा आपल्यापर्यंत पोचवणाऱ्या महाकवीला मी शतशः वंदन करतो.

तर मित्रांना “Swatantravir Savarkar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “स्वातंत्र्यवीर सावरकर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

स्वातंत्रवीर सावरकर यांचा जन्म कधी झाला?

स्वातंत्रवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: