मी झाड झालो तर निबंध मराठी | Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi – मित्रांनो आज “मी झाड झालो तर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
निसर्गातून मिळणाऱ्या सर्व गोष्टी या आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूप महत्वाच्या आणि जीवन आवश्यक ठरतात. त्यातल्या त्यात निसर्गातील झाडे ही तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून ठेवण्यासाठी खूपच गरजेचे आहेत.
Contents
Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल. निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढवण्याचे महत्त्वाचं काम माझ्याकडे असेल पृथ्वीवर गुण्यागोविंदाने रहात असलेले सजीव सृष्टी ही केवळ झाडांमुळे शक्य झाली आहे.
कारण मनुष्यांना जीवन आवश्यक असलेला प्राणवायू हा केवळ झाडांचा पासूनच आपल्याला उपलब्ध होतो. मनुष्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारा प्राणवायू ऑक्सिजन देण्यासाठी झाडेझुडपे अत्यंत महत्त्वाचे आहेत. Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
ऑक्सीजन शिवाय जीवन अशक्य आहे. झाडे वातावरणातील कार्बन डायॉक्साईड आपल्या आत खेचून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन संपूर्ण मानव जातीला देतात.
मी झाड झालो तर निबंध मराठी
झाडे ही फक्त मनुष्यासाठीच नव्हे तर प्राणी, पक्षी आणि पृथ्वीवर असणाऱ्या लहानात लहान जीवजंतू साठी महत्वपूर्ण आहे. कडकडत्या उन्हाळ्यात जेव्हा चारही बाजूंना पृथ्वी तप्त असते तेव्हा रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना थंडगार हवा आणि शीतल छाया वृक्ष प्रदान करतात. मनुष्य जातीवर झाडांचे फार उपकार आहेत.
जर मी झाड राहिलो असतो तर मला याचा खूप अभिमान झाला असता आणि दुसर्याच्या कामी येण्याचे सौभाग्य ते मला प्राप्त झाले असते. माझ्या लाकडाच्या उपयोगाने लोकांनी आपल्या घराचे फर्निचर बनवले असते. Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
माझ्या लाकडाचा उपयोग करून स्त्रियांनी अन्न शिजवले असते. मी किती उपयोगी येतोय हे पाहून मला खूप आनंद झाला असता. जर मी झाड झालो तर हे पाहून खूप आनंदी होईल की रंगीबेरंगी सुंदर पक्षी माझ्यावर आपले घरटे बनवित आहेत.
Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
पक्ष्यांची लहान लहान पिल्ले माझ्यावर सुखरूप राहिली असती. माझ्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर बसून त्यांनी उडणे शिकले असते. मी पक्षी, प्राणी आणि मनुष्याला गोड गोड फळे दिली असती.
माझ्यावर फुलणाऱ्या सुंदर फुलांनी तुमच्या बागेची शोभा वाढवली असती. याशिवाय आज आपली पृथ्वी अनेक संकटे, प्रदूषण, महामारी इत्यादीनी त्रस्त झालेली आहे.
शास्त्रज्ञांनी लोकांमध्ये पर्यावरणाविषयी ची जागृती निर्माण करण्यासाठी कार्य सुरू केले आहे. मी झाड झालो तर पूर्ण शक्तीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी कार्य केले असते.
मी झाड झालो तर निबंध मराठी
मी झाड आलो तर मला मनुष्याच्या कामी येण्याचा अत्यंत आनंद होईल परंतु दुसरीकडे या गोष्टीचे भय देखील राहील की एखाद्या दिवशी आपल्या स्वार्थासाठी मनुष्य मला तोडून तर नाही टाकणार? कारण आज आपल्या देशात आधुनिकीकरण व लोकसंख्या वाढ इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कटाई सुरू आहे. Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
मी झाड झालो तर माझी एकच प्रार्थना राहील की मनुष्याने मला कापायला नको. त्याला आवश्यक असणारे लाकूड तो माझ्या वरून तोडून घेऊ शकतो. परंतु मला पूर्णपणे नष्ट करून टाकण्यात कुठलाही शहाणपणा नाही.
Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi
मी जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत मनुष्यासाठी आणि चांगल्या पर्यावरणासाठी कार्य करीत राहील. तर अशा पद्धतीने मी वृक्ष झालो तर संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करील वातावरण स्वच्छ करण्यासोबतच मी मनुष्याला अनेक जीवनावश्यक गोष्टी देखील मोफत उपलब्ध करून देईल. म्हणून मी झाड झालो तर या पद्धतीने सर्वांची मनोभावे सेवा करेल आणि मला यातून खूप आनंद देखील मिळेल.
तर मित्रांना “Mi Zad Zalo Tar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “मी झाड झालो तर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
झाडे ही कोणा कोणा साठी महत्त्वपूर्ण आहेत?
झाडे ही मनुष्या बरोबर प्राणी, पक्षी आणि पृथ्वीवर असणाऱ्या लहानात लहान जीवजंतू साठी महत्त्वपूर्ण आहे