व्हॉलीबॉल बद्दल माहिती मराठीत – Volleyball Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला Volleyball Information in Marathi – व्हॉलीबॉल बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

माहिती – Volleyball Information in Marathi

व्हॉलीबॉल हा खेळ फार पूर्वीपासून भारतात खेळला जातो. खेडेगावातून तसेच शहरातून मोठ्या मैदानात खेळला जातो. हा खेळ फारसा खर्चीक नाही.

या खेळामुळे मोकळ्या हवेत चांगला व्यायाम होतो. या खेळात जखमी होणे किंवा भांडणे यासारखे प्रकार घडत नाहीत. हा मैदानी खेळ आहे.

खेळाचे मैदान – या खेळाचे मैदान १८ मी. लांब व ९ मी. रुंद असते. हा खेळ खेळल्या जाणाऱ्या मैदानाला ‘कोर्ट’ म्हणतात. याच्या कडेच्या रेषा ५ सें.मी. जाडीच्या असतात.

मैदानाच्या मध्यभागी एक रेषा असते. तिला मध्यरेषा म्हणतात. या मैदानाच्या मध्यभागी ९.५० मी. लांब व १ मी. रुंदीची जाळी असते.

या जाळीतील चौकोन १० सें.मी.चे असतात. व्हॉलीबॉल खेळण्यासाठी जी जाळी असते, ती बांधण्यासाठी दोन लाकडी किंवा लोखंडी खांब असतात.

खेळाचे साहित्य – या खेळासाठी चेंडूगोल व मोठा असतो.

पोशाख – टी शर्ट, हॉफ पँट, पायात बूट असा हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचा पोख असतो.

खेळाडूंची संख्या – हा खेळ दोन संघात खेळला जातो. त्यातील प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. त्यातील सहा खेळाडू प्रत्यक्ष खेळतात व बाकीचे राखीव असतात.

खेळाचे नियम – एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर दुसरा खेळाडू मैदानात खेळू शकतो. या खेळात एकूण पाच सेटस् खेळले जातात. त्यातील तीन सेटस् कोणत्यातरी संघाला जिंकावे लागतात.

तो संघ विजयी म्हणून घोषित होतो. एखादा खेळाडू जखमी झाला, तर तीस मिनिटे खेळ थांबवला जातो. संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षक यांना पंचाकडे विश्रांतीसाठी वेळ मागण्याचा अधिकार असतो.

इतर माहिती – या खेळात एक पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक हे अधिकारी असतात. पंचांनी शिटी वाजवल्यानंतर पाच सेकंदांच्या आत सर्व्हिस करावी लागते.

प्रत्येक संघ विरोधी संघाच्या क्षेत्रात चेंड पोहोचवण्यासाठी तीन वेळा चेंडू मारू शकतो, परंतु व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय अंतिम असतो. हा निर्णय पंचाच्या सल्ल्याने घेतला जातो.

या खेळाच्या नियमांचा भंग करणाऱ्या खेळाडूला दंडात्मक शिक्षा होते. या खेळाचे सामने राज्यस्तरीय पातळीवर खेळले जातात. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.

भारतीय व्हॉलीबॉल खेळाडू – Indian Volleyball Players

  • जिमी जेवर्गे
  • बलवंत सिंग
  • नवीन राजा जाकोब
  • टॉम जोसेफ
  • गुरिंदर सिंग

काय शिकलात?

आज आपण Volleyball Information in Marathi – व्हॉलीबॉल बद्दल माहिती मराठीत पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: