Robert Boyle Information in Marathi – रॉबर्ट बॉयल बद्दल माहिती मराठीत

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Robert Boyle Information in Marathi – रॉबर्ट बॉयल बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – ब्लेझ पास्कल

माहिती – Robert Boyle Information in Marathi

रॉबर्ट बॉइलचा जन्म २५ जानेवारी, १६२७ रोजी आयर्लंडमध्ये झाला. त्याचे वडील रिचर्ड बॉइल मोठे जमीनदार होते. रॉबर्ट बॉइलने लहानपणीच लॅटिन, ग्रीक आणि फ्रेंच भाषा आत्मसात केल्या.

त्याची आई तो नऊ वर्षांचा असतानाच मृत्यू पावली. त्यानंतर पुढील शिक्षण त्याने इंग्लंड व इटली येथे घेतले. सन १६४३ मध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांनी रॉबर्टसाठी मोठी इस्टेट मागे ठेवली होती.

रॉबर्टने स्वत:ला शास्त्रीय संशोधनात वाहून घ्यायचे ठरविले. त्याने हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करून अनेक प्रयोग केले. ‘स्थिर तापमानात वायूचे आकारमान व दाब हे व्यस्त अनुपाती असतात.

याचे त्याने प्रतिपादन केले. हाच, पुढे बॉइलचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध झाला. ध्वनीच्या संक्रमणातील हवेचा सहभाग, गोठणाऱ्या पाण्याचे प्रसरणात्मक बल, विशिष्ट गुरुत्व, अपवर्तन इत्यादी भौतिकशास्त्रातील अनेक गोष्टींबद्दल जरी रॉबर्टने संशोधन केले असले तरी रसायनशास्त्रात त्याला विशेष रस होता.

संयुगे आणि मिश्रणामधील फरक, त्यांचे पृथक्करण, ज्वलनक्रिया आणि श्वसनक्रिया यांचा त्याने अभ्यास केला होता. जीवशास्त्रात प्राण्यांचे विच्छेदन वगैरे करावे लागे, म्हणून त्याचा जीव जीवशास्त्रात मात्र कधीच रमला नाही.

बॉइल वृत्तीने फार धार्मिक होता. त्रयस्थपणे आर्थिक लिखाण करता यावे म्हणून त्याने अतिशय प्रतिष्ठित समजले जाणाऱ्या एपॅन कॉलेजमधील नोकरी नाकारली.

त्याने बायबलचे अनेक भाषांमध्ये भाषांतर केले व ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचे काम केले. असा हा शास्त्रज्ञ, धर्मज्ञ आणि तत्त्वज्ञ ३० डिसेंबर, १६९१ रोजी मरण पावला.

काय शिकलात?

आज आपण Robert Boyle Information in Marathi – रॉबर्ट बॉयल बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: