पिंगला आख्यान
‘अवंति’ नगरात मदन नांवाचा एक ब्राह्मण राहत होता. तो आपल्या पत्नीला सोडून ‘पिंगला’ नावाच्या एका वेश्येच्या नादी लागला होता. तो नेहमी तिच्याकडेच राही. अभक्ष्य भक्षण करी आणि यथेच्छ उपभोग घेई. एकदा ‘ऋषभ’ नावाचा महान योगी पिंगलेच्या घरापाशी आला. त्या योग्याला पाहून पिंगलेने व त्या ब्राह्मणाने त्याचे स्वागत केले. त्या योग्याची रात्रभर उत्तम सेवा केली. पण सूर्योदय होताच तो योगी तेथल्यातेथेच गुप्त झाला.
दोघांना याचे आश्चर्य वाटले. पण साक्षात शिवानेच आपली सेवा घेतली, असे मनोमन समजून त्या दोघांनी स्वत:चे समाधान करून घेतले. पुढे ‘पिंगला’ व ‘मदन’ कालांतराने मरण पावले. पूर्वजन्मी शिवपूजन केल्यामुळे त्यांचे जन्म उच्चकुळात झाले. मदन राजा ‘वज्रबाहू’ची पट्टराणी ‘सुमती’ हिचा मुलगा म्हणून जन्माला आला. तर पिंगलेचा जन्म ‘सीमंतिनीची कन्या’ म्हणून झाला. पिंगलेचे नाव ‘कीर्तिमालिनी’ ठेवण्यात आले.
मदन पट्टराणीच्या गर्भात असताना तिच्या सवतींनी राणीच्या अन्नात विष घातले. उठले व त्यातून रक्त व पू वाहू लागले. तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाच्यासुद्धा अंगावर क्षते पडून त्यातून ‘पू’ गळू लागला. राजाने राजवैद्यांना बोलावून खूप उपाय केले. पण रोग बरा होईना. शेवटी राजा त्या दोघांना कंटाळला. त्याने पट्टराणी व त्या मुलाला रथात बसवून दूर अरण्यात सोडून दिले. रानात ‘सुमती’ची अवस्था फारच कठीण झाली.
तिला अन्नपाणी मिळेना. बाळ दुधासाठी रडायचा. शेवटी ती दिनवाणेपणाने शंकराचा धावा करू लागली. “हे शिवशंकरा, मला वाचव. माझी या जन्ममरणातून सुटका कर.” ती राणी शंकराचा धावा करीत असतानाच तिला अगदी जवळून सिंहगर्जना ऐक आली. त्यामुळे घाबरून ती मूर्छा येऊन जमिनीवर पडली. तिच्याच शेजारी तिचे बाळ होते. रानातल्या पक्ष्यांनी चोचीतून पाणी आणून बाळाला पाजले.
थोड्याच वेळात राणी शुद्धीवर आली. त्याचवेळी योगायोगाने एक वाणी आपल्या नोकरांबरोबर त्या अरण्यातून आपल्या गावी चालला होता. त्याच्याबरोबर बैलांचा तांडा होता. त्याचे तिच्याकडे लक्ष गेले. त्याला तिची दया आली. त्याने तिला व बाळाला आपल्याबरोबर घेतले व वाणी लोकांचीच घरे असलेल्या त्याच्या गावी तो गेला. ‘पद्माकरशेठ’ हा त्या गावाचा मुख्य होता. तो उदार होता. त्याने ‘सुमती’ला आसरा दिला. राणीनेही आपली हकिकत पद्माकरला सांगितली. तिची हकिकत ऐकून पद्माकरला वाईट वाटले. तो म्हणाला, “महाराणी, नशीब मोठे विचित्र असते. पण मी तुला माझी कन्या मानतो.
मी जवळच एक घर तुला राहण्यास देतो तेथे तू राहा.” त्यानंतर पद्माकरने अनेक वैद्य बोलावून तिच्यावर अनेक उपाय केले. पण रोग बरा झाला नाही. त्याच रात्री तिचा मुलगाही मरण पावला. सर्वजण हळहळत होते. पण तिचे सांत्वन कोण करणार? दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा अचानक ‘ऋषभ’ नावाचे एक ऋषी तेथे आले. पद्माकराने आदराने त्या योग्याचे स्वागत केले. तो योगी ‘सुमती’ला म्हणाला, “व्यर्थ शोक कशाला करते? तू हा मुलगा कोठून आणलास आणि मृत्यूनंतर तो कोठे गेला, हे कोणाला माहीत आहे? सगळे लोक मेल्यावर कुठे जातात? आत्मा हाच शाश्वत आहे.
शिव आहे. क्षणभंगुर आहे. ही सगळी माया आहे. तेव्हा सावध हो. शिवाची भक्ती कर.” त्या योग्याने तिला शिवाचा मृत्युंजय मंत्र सांगितला व त्या मंत्राने तयार झालेले भस्म सर्वांगाला लावण्यास सांगितले. ते भस्म लावताच तिचा रोग नष्ट होऊन ती तेजस्वी व सुंदर दिसू लागली. तिने तिच्या मुलाच्या शरीरालाही भस्म लावले आणि काय आश्चर्य तो मुलगा जिवंत झाला. सुमती ‘ऋषभ’ ऋषींच्या पाया पडली.
शिवयोगी ‘ऋषभ’ म्हणाले, “तुझा पुत्र दीर्घायुषी होईल. राजा होईल. याचे नांव मी ‘भद्रायू’ ठेवतो. हा मोठा होईपर्यंत शिवाच्या ‘मृत्युंजय’ मंत्राचा जप करीत जा. हा राजपत्र आहे ही गोष्ट गप्त ठेव.” इतके बोलन ऋषभ ऋषी अंतर्धान पावले. पद्माकरलाही एक मुलगा होता. त्याचे नाव होते ‘सुनय’. पण पद्माकरला ‘सुनय पेक्षा ‘भद्रायू’च आवडत असे. पद्माकराने दोघांची मुंज केली. काही काळाने शिवयोगी पुन्हा एकदा प्रगट झाला. त्याने ‘भद्रायूला श्रुति-स्मृति पुराणे शिकवली.
शंकराची सेवा व स्मरण हेच मोठे तप आहे, हे सांगितले. शिवयोग्याने अशा प्रकारे उपदेश करून भद्रायूला शिवकवच शिकवले व मृत्युंजय मंत्र दिला. गुरू व शिवशंकर यांच्यात उमाशंकराचे निवासस्थान कैलास’ पर्वतच होय. या सातव्या अध्यायाचे पारायण तीच शिवाभोवती घातलेली प्रदक्षिणा होय. हा अध्याय इथे संपत आहे.