कबुतर बद्दल माहिती मराठीत – Pigeon Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला कबुतर बद्दल माहिती मराठीत – Pigeon Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

१. मराठी नाव : पारवा, जंगली कबूतर
२. इंग्रजी नाव : Blue Rock Pigeon (ब्ल्यू रॉक पिजन)
३. आकार : ३३ सें. मी.
४. वजन : ९०० ग्राम.

माहिती – Pigeon Information in Marathi

गुटर-गू, गुटर-गू असा घुमणारा आवाज करणारा हा पक्षी आपल्या घराच्या आसपास किंवा शेताजवळ तसंच उंच कड्या-कपारींमध्ये आढळतो. अडगळीच्या ठिकाणी, जुन्या इमारतीमध्ये बऱ्याच वेळा याचं घरटं दिसतं.

सुमारे फूटभर लांबीच्या या पक्ष्याच्या मानेवर हिरव्या, जांभळ्या, आमसुली रंगछटा झळाळतात. एकंदर रंग राखट करडा असतो. विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो.

वैशिष्ट्यच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पध्दत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पातळ स्त्राव भरवतात.

कबुतराची लहान पिल्लं आपल्या चोची त्यांच्या पालकांच्या चोचीमध्ये घालून खाद्य घेतात. अशा वेळी भरवणारा पक्षी त्याच्या पोटाची गदगदवल्यासारखी हालचाल करून लाळयुक्त धान्य पुन्हा चोचीत आणून पिल्लांना भरवतो. कबुतरं पाळणारे याला ‘गुळणी करणे’ असं म्हणतात.

पालक पक्ष्यांनी अर्धवट पचवलेल्या गुळणीमुळे ती पिल्लांना पचवायला सोपी जाते. हा पूर्णपणे शाकाहारी पक्षी आहे. काही जंगली कबुतरं अर्ध- रानटी अवस्थेत राहतात. ती शहरवस्त्यांमध्ये निवाऱ्याला येतात तर खेड्यापाड्यांमध्ये चायला जातात.

शुभ्र पांढरं, पाळीव कबूतर शांतीचं प्रतीक मानलं जातं. युद्धकाळात संदेशवहनासाठी कबुतरांचा उपयोग केला जात असे. कबुतरांमध्ये असलेला हा गुण घरपरती म्हणून ओळखला जातो.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला कबुतर बद्दल माहिती मराठीत – Pigeon Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: