मोहरम माहिती, इतिहास मराठी | Muharram Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला मोहरम माहिती, इतिहास मराठी | Muharram Information in Marathi मराठीत देणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – बकरी ईद

Contents

मोहरम माहिती, इतिहास मराठी | Muharram Information in Marathi

मोहरम हा मुसलमानी वर्षाचा पहिला महिना. या महिन्यातील पहिल्या दहा दिवसांत मोहरम हा सण साजरा केला जातो. मुहर्रम याचा अर्थ पवित्र. पवित्र कुराणात सांगितल्याप्रमाणे चार पवित्र महिन्यांपैकी मुहर्रम किंवा मोहरम हा एक पवित्र महिना आहे. पहिल्या तारखेपासून दहा दिवस हा सण चालू असतो. दहाव्या दिवसाला ‘आशुरा’ म्हणतात. शिया पंथाचे मुसलमान लोक सुतकाचे दिवस म्हणून हे दिवस पाळतात. महंमद पैगबरांच्या फातमा नावाच्या मुलीला हसन आणि हुसेन असे दोन मुलगे होते. आपापसातील वैर, भांडण चांगले नाही. त्यामुळे आपले फार मोठे नुकसान होते.

प्रगती थांबते. म्हणून आपण एकत्र येऊया. तुम्ही आमच्याकडे या, असा निरोप यजीद घराण्यातील लोकांनी हसन आणि हुसेन यांना पाठविला. हसन-हुसेन यांना आनंद झाला. ते दोघे कुफा नावाच्या गावी गेले. परंतु यजीद लोकांचा हेतू चांगला नव्हता. त्यांनी दगाबाजी करून त्या दोघांना ठार मारण्याचे ठरविले. सात दिवस भयंकर लढाई झाली. ही लढाई बगदादमधील करबला मैदानावर झाली. यजीद लोकांनी हसन व हुसेन यांना कपटाने पकडले व त्यांना काहीही खायला-प्यायला दिले नाही. नवव्या दिवशी हसन-हुसेन नमाज पढण्यासाठी खाली वाकले असता त्यांची हत्या करण्यात आली.

हुतात्मे झालेल्या हसन-हुसेन यांची दुःखद स्मृती म्हणून ताजिये (ताबूत) बसवितात व दहाव्या दिवशी त्यांचे जलाशयात विसर्जन करतात. हजरत हसन-हुसेन यांच्या हौतात्म्यास इस्लामी इतिहासात फार महत्त्व आहे. आशुरा मुहर्रमचा पवित्र दहावा दिवस म्हणून व मुहर्रम हा सृष्टिउत्पत्तीचा महिना म्हणून सुन्नी मुसलमानांना पवित्र वाटतो. महंमद पैगंबरांनी आपल्या अनुयायांना आशुरा या दिवशी उपवास करण्यास व प्रार्थना (नमाज) करण्यास सांगितले आहे.

सात दिवस चाललेल्या लढाईत हसन-हुसेन यांना अत्र व पाणीसुद्धा दिले नाही म्हणून मोहरमच्या दिवशी सर्वांना सरबत वाटले जाते. गोरगरिबांना अत्रदान केले जाते. या दिवशी मुसलमान बांधव स्वच्छ स्नान करून चांगले कपडे घालतात. डोळ्यांत सुर्मा घालतात. सुगंधी अत्तर लावतात. कारण तशी धर्माची आज्ञाच आहे. या दिवशी शत्रूशी शांततेने तह करावा, सत्संग करावा, अनाथांना आश्रय द्यावा, दानधर्म करावा, अशाही आज्ञा केल्या आहेत.

काय शिकलात?

आज आपण मोहरम माहिती, इतिहास मराठी | Muharram Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: