लोकमान्य टिळक जयंती निमित्त भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Lokmanya Tilak Speech in Marathi – लोकमान्य टिळक जयंती निमित्त भाषण मराठीत सांगणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – Lokmanya Tilak Information in Marathi
लोकमान्य टिळक | Lokmanya Tilak Speech in Marathi
लोकमान्य टिळक आपल्या या आदरणीय टिळकांच्या कार्यक्रमानिमित्त लाभलेले अध्यक्ष महोदय. शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच माझे गुरूजन व गावातील आमंत्रित पाहुणे व पालकवर्ग.
तर मित्रांनो आज आपण या शाळेच्या प्रागणात कशाकरिता बसलो आहोत ते तर तुम्हाला माहितच आहे. तर आज मी तुम्हाला विद्यार्थी या नात्यानं लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर थोडक्यात पण महत्वाचे काही वाक्य बोलाणार आहे.
कृपया आपण सर्व शांतपणे ऐकून, ध्यावे अशी विनंती करते. विद्यार्थी मित्रांनो आपण बरेच मालिक बघतो. नाटकाच्या माध्यमातून किंवा पुस्तक ग्रंथात वाचत असतो की जेव्हा जेव्हा अन्याय व अत्याचार वाढत जातो तेव्हा त्याला दूर करायला एक ना एक महामानव या पृथ्वीवर अवश्य जन्म घेतो.
असाच एक क्रांतीसूर्याचा जन्म महाराष्ट्राच्या रत्नगिरी जिल्ह्यात चिखलगांवमध्ये गंगाधर पंतांच्या घरात बाळ म्हणूनच जनमाला आले. लोकमान्य टिळक हे १८७२ व्या वर्षी दहावीची परीक्षा पास झाले व पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला.
याच कॉलेजात बी.ए.व एल.एल.बी. झाले. परंतू मित्रांनो आपला भारत देश इंग्रजांच्या तावडीतून कधी सुटेल हे त्यांच्या मनाला सतत भेडसावत होते म्हणून त्यांनी स्वतंत्र चळवळीत भाग घेतला.
२४ जून १९०८ रोजी टिळकांवर देशद्रोहाचा खटला भरला व त्यांना ६ वर्षे मंडलेच्या समाजसुधारणा करण्यासाठी ‘केसरी’ नावाचे मराठी भाषेत ४ तुरूंगात कारावास भोगावा लागला.
मित्रांनो तरी न डगमगता त्यांनी जानेवारी १८८९ रोजी वृत्तपत्रे सुरू केले. भारतीय नागरिकांनी एकत्रित याचे व एकीनं काम करावे म्हणून त्यांनी प्रथम श्री गणेशाची प्रतिस्थापना सुरू केली.
विद्यार्थी मित्रांनो इग्रंज सरकारच्या पक्षपाती धोरणाला दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या केसरी वर्तमान पत्राद्वारे सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा सवाल त्यांनी केला होता.
यासाठी त्यांना पुन्हा कारावासही भोगावा लागला हे सत्य आहे. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्म सिध्द हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली.
गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. आपल्या भारतातील सर्वसामाच्य जनतेला राजकीयदृष्टया जागृत करून परकीय सत्तेच्या विरोधात उभे करणे हे आत्यंत कठीण काम त्यांनी केले म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी मिळाली.
हळूहळू त्यांची प्रकृति बिघडत चालली व त्यांना मधुमेह. हिवताप या आजाराने पछाडले. ९ ऑगस्ट १९२० ला दुपारी दीड बाजता या भारताच्या वीरपुत्राला या जगातून निरोप ध्यावा लागला.
मित्रांनो त्यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण मुंबईभर पसरली. लोकांनी आपले व्यवसाय, काम बंद ठेवून या महान आत्म्याला श्रध्दांजली देण्यास दादर चौपाटीवर एकच गर्दी केली. या महान क्रांतीकारी नेत्याला मी कोटी कोटी प्रणाम सादर करतो व आजच्या प्रसंगी एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.
काय शिकलात?
आज आपण Lokmanya Tilak Speech in Marathi – लोकमान्य टिळक जयंती निमित्त भाषण मराठीत पाहिलं आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.