Homi Bhabha Information in Marathi – होमी भाभा बद्दल माहिती मराठीत
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Homi Bhabha Information in Marathi – होमी भाभा बद्दल माहिती मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा –
माहिती – Homi Bhabha Information in Marathi
होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील नामांकित वकील होते. लहानपणापासूनच होमी अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते.
पंधराव्या वर्षीच त्यांनी अल्बर्ट आइनस्टाइनचे सापेक्षतावादावरील पुस्तक वाचून काढले होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले.
गणित आणि भौतिकशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय; परंतु वडिलांच्या आग्रहाखातर होमी अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी केंब्रिजला रवाना झाले. १९३०मध्ये प्रथम श्रेणीत त्यांनी अभियांत्रिकीतील पदवी संपादन केली.
त्यानंतर मात्र त्यांनी आपले सर्व लक्ष भौतिकशास्त्रातील संशोधनावर केंद्रित केले. केंब्रिज येथे असताना त्यांचा रुदरफोर्ड व नील्स बोर या प्रख्यात शास्त्रज्ञांशी परिचय झाला.
त्यांचा भाभा यांच्या आयुष्यावर व संशोधनावरही फार मोठा प्रभाव पडला. ‘भाभा-हिटलर कॅस्केड थिअरी व कॅस्केड थिअरी ऑफ इलेक्ट्रॉन शॉवर्स’ हे त्यांचे वैश्विक किरणांवरील संशोधन जगप्रसिद्ध झाले.
अणूंच्या मूलभूत कलांवर त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांना कलांमध्येही १९४० रोजी भाभा भारतीय विज्ञान संस्थेत दाखल झाले. १९४१ मध्ये म्हणजेच वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी त्याला रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळाले.
हा सन्मान मिळवणारे हे सर्वांत तरुण शास्त्रज्ञ होते. ते रॉयल सोसायटीत प्राध्यापक म्हणून रुजू झाले. केंब्रिज युनिव्हर्सिटीने अॅडम्स पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला.
बंगलोर येथे आधुनिक भौतिकशास्त्र विषयावरील त्यांचे व्याख्यान ऐकून प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण हे अतिशय प्रभावित झाले. भाभांची विद्वत्ता पाहून श्रोतेही मंत्रमुग्ध झाले.
दरम्यान त्यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून प्राध्यापकाचे पद स्वीकारण्यासाठी आमंत्रण आले; परंतु त्यांनी ते नाकारले. त्यांना भारतात संशोधन करण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट संस्था स्थापन करावयाची होती.
आधुनिक भारताचे त्यांनी पाहिलेले स्वप्न त्यांना साकार करायचे होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पाठिंब्याने त्यांनी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’आणि भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर’ या संस्था स्थापन केल्या.
विद्युत चुंबकत्व व वैश्विक किरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. भारताच्या प्रगतीसाठी त्याला विज्ञानाचा वापर करावाच लागेल असे त्यांनी प्रतिपादन केले.
ऊर्जेसाठी इतरांवर अवलंबून न राहता भारताने स्वत:च वीज निर्मितीसाठी अणु-ऊर्जेचा वापर करायला पाहिजे, या स्वाभिमानी विचारातून त्यांची दूरदृष्टी आणि तळमळ दिसून येते.
भाभांच्या अथक प्रयत्नांतून १९६३ मध्ये तारापोर येथे पहिल्या अणुऊर्जा केंद्र निर्मितीला सुरुवात झाली. १९७४ मध्ये पोखरण येथे शांततेसाठी अणुस्फोट घडवून भारताने मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळविले.
त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अनेक नामांकित संस्थांचे सदस्यत्व मिळाले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण किताब देऊन गौरविले. भारताला स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या या महान अणुशास्त्रज्ञाचा २४ जानेवारी, १९६६रोजी अपघाती मृत्यू झाला.
काय शिकलात?
आज आपण Homi Bhabha Information in Marathi – होमी भाभा बद्दल माहिती मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.