गोदावरी नदी बद्दल माहिती मराठीत – Godavari River Information in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला गोदावरी नदी बद्दल माहिती मराठीत – Godavari River Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – भीमा नदी
गोदावरी नदी – Godavari River Information in Marathi
महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश आहे. उगमस्थान – नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो.
गोदावरी नदीच्या उपनद्या – मांजरा, प्राणहिता, प्रवरा, सिंदफणा, दुधना, दारणा, कादवा, पूर्णा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या गोदावरी नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.
गोदावरी नदीचे खोरे – गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नाशिक, नगर, औरंगाबाद, नांदेड इत्यादी जिल्हे येतात. इतर माहिती – गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील एक पवित्र आणि प्रमुख नदी आहे.
ही नदी नाशिक परिसरातून व मराठवाड्यातून वाहत पुढे आंध्र प्रदेशात जाते. महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी ६६८ किलोमीटर आहे.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावणारी गोदावरी नदी नाशिकच्या पंचटीला वळसा घालून पुढे जाते. नंतर नगर जिल्ह्यातून पुढे ती दक्षिणवाहिनी बनते.
गोदावरी नदीच्या काठी अनेक गावात शंकराची मंदिरे बांधलेली आहत. पुढे गोदावरी नदी नांदेडकडे वाहत जाते. उगमाजवळ गोदावरी नदीचे पात्र खूप अरुंद आहे.
पण नंतर तिला तिच्या उपनद्या जशा जशा येऊन मिळतात तसतसे तिचे पात्र खूप रुंद बनत गेले आहे. गोदावरीच्या काठी नाशिक, पैठण यांसारखी तीर्थक्षेत्रे आहेत. त्याचप्रमाणे नाशिक येथे गोदावरी नदीवर अनेक घाट व मंदिरे आहेत.
नांदेड शहरही गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. गोदावरी नदीला नांदूर – मधमेश्वर येथे कादवा नदी येऊन मिळते. तेथे पक्ष्यांसाठी अभयारण्य निर्माण केले आहे.
गोदावरी नदीवर पैठणजवळ जायकवाडी हे मोठे धरण बांधले आहे. या धरणापासून कालवे काढून मराठवाड्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो तसेच नाशिक, नगर, नांदेड, औरंगाबाद, बीड, परभणी या भागात या धरणातील पाणी पिण्यासाठी पुरवले जाते.
गोदावरी नदीच्या खोऱ्यातील जमीन अतिशय सुपीक आहे. त्यामुळे या खोऱ्यात पिकांबरोबरच डाळींब, द्राक्षे इ. विविध प्रकारची फळफळावळ तसेच बागायती उत्पन्न घेतले जाते.
गोदावरी ही महाराष्ट्राची वरदायिनी नदी आहे. त्याचप्रमाणे गोदावरीस दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात. धरणे गोदावरी नदीवर गंगापूर, दारणा, भंडारदरा, येलदरी, सिद्धेश्वर, मन्याड, जायकवाडी इत्यादी धरणे बांधलेली आहेत.
काय शिकलात?
आज आपण गोदावरी नदी बद्दल माहिती मराठीत – Godavari River Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.