रोहित पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Flamingo Bird Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला रोहित पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Flamingo Bird Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

१. मराठी नाव : रोहित, पांडव, अग्निपंख, समुद्रपक्षी.
२. इंग्रजी नाव : Flamingo (फ्लेमिंगो)
३. आकार : १४० सें. मी.
४. वजन : २ – ४ किलो ग्राम.

माहिती – Flamingo Bird Information in Marathi

पाणपक्ष्यांमधली परी म्हणजे रोहित पक्षी. हा पक्षी पाण्यात पोहताना हंसासारखा दिसतो म्हणून त्याला हिंदीत राज हंस किंवा बोग हंस असं म्हणतात.

महाराष्ट्रात जायकवाडी (औरंगाबाद), उजनी जलाशय (पुणे जिल्हा) आणि हरिश्चंद्रगड परिसरात पावसाच्या पाण्यानं भरून वाहणाऱ्या खाचरांमध्ये रोहित पक्षी दिसतो. या जागांशिवाय तो अनेक लहान-मोठ्या तळ्यावर महाराष्ट्रभर दिसतो.

रोहित हा एक लांब मान, लांब पाय असलेला गुलबस पांढऱ्या रंगाचा पक्षी असून त्याची गुलाबी चोच वैशिष्ट्यपूर्ण असते. एखादी काडी मधोमध वाकवावी तशी या पक्ष्याची चोच मध्यावर ‘मोडलेली’ दिसते. या चोचीचा उपयोग करून पक्षी गाळातलं खाद्य गोळा करतो.

असं करताना त्याला त्याच्या मांसल जिभेचा आणि सरीदार चोचीचा उपयोग होतो. सरीदार कंगव्यासारखे दाते असलेली चोच. गंमत बघा.

गिधाडाहून दीडपट मोठा असून सुद्धा हा पक्षी सूक्ष्म जीव-जीवाणू, अळ्या, पाणकिड्यांची पिल्लं, पाणवनस्पतींच्या बिया, सेंद्रीय गाळ आणि शैवालांसारख्या वनस्पतींवर आपली गुजराण करतो. आपलं नशीब जोरावर असेल, तर रोहित पक्ष्याचा धाकटा भाऊ (Lesser Flamingo) सुद्धा क्वचित एखाद्या तळ्यावर दिसू शकतो.

परंतु धाकटा रोहित हा काही महाराष्ट्रात नियमितपणे दिसणारा पक्षी नाही. भरकटणारा आणि क्वचित दिसणारा अशी त्याची नोंद केली जाते. रोहित पक्षी नेहमी लहान-मोठ्या थव्यांनी राहतात. त्यामुळे त्यांची शक्ती वाढते.

भक्षकांच्या तावडीत सापडण्याची शक्यता कमी होते. या पक्ष्याला माणसांची वर्दळ, गर्दी, त्रास सहन होत नाही. माणसापासून तो चार हात दूरच राहतो. आपण जर याच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर थव्यातला म्होरक्या “हाँक!’ असा नाकातून आल्यासारखा आवाज काढून खाणं थांबवतो.

त्याच्या जवळपास थांबून खाद्य शोधणाऱ्या पक्ष्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव होते. हळुहळू सर्व पक्षी माना वर करून, संभाव्य धोक्यावर डोळा ठेवून एकेक पाऊल टाकत पाण्यातून चालायला लागतात. वेग वाढवतात. पाण्यातून उचल घेतात. पंख पसरतात.

पाण्याच्या पृष्ठभागावर पाय मारत वेग घेतात आणि हवेवर स्वार होतात. पंखांची लयबद्ध उघडझाप करत उडू लागतात. रोहित जेव्हा उडू लागतो तेव्हा त्याचे काळ्या किनारी असलेले गडद शेंदरी रंगांचे पंख उलगडतात. ते दृश्य पाहताना आपण स्वप्न तर पहात नाही ना असं वाटतं.

काय शिकलात?

आज आपण रोहित पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Flamingo Bird Information in Marathi माहिती पहिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: