100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार देणार आहे तर चला बघुयात 100 Suvichar in Marathi. आणखी वाचा – 50+ नवीन छोटे मराठी सुविचार
100 Suvichar in Marathi
१] सुंदर सकाळ पाहण्यासाठी आधी काळोखाची रात्र जावी लागते.
२] मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.
३] जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही व ज्याला वाचताच येत नाही, ह्या दोघांत काही फरक नाही.
४] स्वतः तुम्ही उशिरा उठला म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.
५] शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.
६] अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
७] एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.
८] भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.
९] स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, हुतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
१०] सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग, पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.
११] वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच.
१२] शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज.
१३] तुमच्या कार्यावर प्रेम करा, कार्यातील तुमच्यावर नको.
१४] आपल्यामधील एकही दोष लक्षात न येणे, हाच सर्वात मोठा दोष आहे.
१५] घडावे असे वाटते पण घडत नाही, ते घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते.
१६] चुका करीत नाही, जो काहीच करत नाही
१७] युद्धात निर्धार, औदार्य व शांततेत सदिच्छा हवी
१८] हृदयाने हृदयाला ओळखणे, हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.
१९] कोणत्याही गोष्टीपूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे.
२०] आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्म-सुधारणा ही तीन गुण ज्याच्यापाशी आहेत त्यानं जग जिंकलं असं समजावं.
२१] विज्ञानात आत्मज्ञान आले तर सर्वोदय होईल.
२२] जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो शिक्षकांकडूनच होईल.
२३] अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला.
२४] संदेहाने सत्याचे दर्शन होते.
२५] माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरुन सिद्ध होते.
२६] ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो.
२७] दीर्घकाळ धुमसत राहण्यापेक्षा क्षणभरच का होईना प्रज्वलित होणं.
२८] एखाद्या गोष्टीची गप्प अवस्था म्हणजे तिच्या नाशाची सुरुवात.
२९] अंधाराची चिंता सोडा आणि प्रकाश उजळा.
३०] विनोद हे दोषदर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे.
३१] सभ्य माणसाचं लक्षण हे की तो दुसऱ्याला दुखवीत नसतो.
३२] सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्यात.
३३] मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
३४] मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे.
३५] प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सामर्थ्य असतेच.
३६] माणसाला सुख हवं असतं पण सुख देणारे पदार्थ नको असतात. दुःख देणारे पदार्थ हवे असतात पण दुःख नको असतं.
३७] वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश.
३८] साधु-संत मानवांइतकेच वृक्षाशीही हितगुज करणे श्रेयस्कर समजतात.
३९] विचार केल्याशिवाय लिहिता येत नाही.
४०] बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता येणं ही जीवनकला आहे.
४१] ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकानं मौन पाळलं पाहिजे.
४२] छटाकभर प्रेम शेरभर ज्ञानापेक्षा वरचढ असतं.
४३] जो जिभेच्या अंकित आहे आणि झोपेच्या अधीन आहे तो अध्यात्माचा केव्हाही अधिकारी होऊ शकणार नाही.
४४] आत्मचिंतन करीत राहणं हा महान शिक्षक होण्याचा मार्ग आहे.
४५] अपयश हेच दर्शविते की आणखी साधनेची आवश्यकता आहे.
४६] पशुंना द्रव्याची इच्छा नसते पण तीच इच्छा मनुष्याला पशू बनवते.
४७] आत्मा जिंकला की सर्व काही जिंकले.
४८] मुंगीपाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा.
४९] विश्वासामुळे माणसाला बळ येते.
५०] सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
५१] विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो.
५२] ज्याच्याजवळ पुस्तक आहे तो एकटा नाही.
५३] मनात ध्येयाची ऊर्मी असेल तर पायात धावण्याची गती येते.
५४] तुम्ही जितके चांगलेपणाने वागाल तितका अधिक चांगुलपणा तुम्हाला प्राप्त होईल.
५५] यशस्वी वाटचालीसाठी प्रथम ‘वाट’ शोधा आणि मग ‘चाल
५६] सवय ही एक तर एकनिष्ठ सेवक बनू शकते किंवा निष्ठूर मालक बनते.
५७] कर्तव्याची प्रीती ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय.
५८] व्यवहारात आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी.
५९] जहाज पाण्यात चालते पण जहाजात पाणी चालत नाही.
६०] प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक आहे.
६१] झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याचप्रमाणे ज्ञानोपासकाची दृष्टी हवी.
६२] जर कोणावर उपकार केलात, तर तो स्मरणात ठेवू नका, आणि जर कोणाचा उपकार तुमच्यावर झाला, तर तो विसरू नका.
६३] कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात.
६४] कृती हे ज्ञानाचे सुंदर फळ आहे.
६५] हात उगारण्यासाठी नसतात उभारण्यासाठी असतात.
६६] अकारण काळजी करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे.
६७] सामर्थ्य हेच जीवन; दुर्बलता म्हणजे मृत्यू होय.
६८] मी तुम्हाला एक शस्त्र दिले आहे, ते म्हणजे विवेकशक्ती.
६९] विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.
७०] आपले जीवन हे आपणास मिळालेले एक दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच त्याचे मोल वाढते.
७१] देशसेवा ही केवळ बुद्धीवर अवलंबून नसून दीर्घोद्योगावर व स्वार्थत्यागावर अवलंबून आहे.
७२] प्रबोधन, संघटन आणि संघर्ष ही परिवर्तनाची वाट आहे.
७३] एका पुरुषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते.
७४] तोडायला वेळ लागत नाही पण जोडायला मात्र लागतो.
७५] ज्याच्याजवळ धैर्यरूपी धन नाही तो खरा निर्धन असतो.
७६] राई एवढा दोष लपविल्याने पर्वताएवढा मोठा होतो.
७७] मोठी माणसे मोठेपणाच्या मागे नसतात.
७८] जे जे आपणास ठावे । ते दुसऱ्यांशी शिकवावे ।
७९] आनंदाचा गुणाकार करावा. दुःखाचा भागाकार करावा.
८०] फुलांचे सौंदर्य बघायला फुलांचे डोळे हवेत.
८१] आई म्हणजे मुलांची पहिला शाळा असते.
८२] सुख व कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
८३] शिक्षणं म्हणजे सतत विकसित होणं.
८४] जी सुधारणा घडवून आणते, ती खरी टीका.
८५] नराचा वानर किंवा नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य मनात आहे.
८६] नित्यनेम मोजकेच असावेत पण ते प्राणापलीकडे जपावेत.
८७] ठेच दोन कारणांनी लागते-मुळीच न पाहिल्यामुळे किंवा फार दूरवर पाहिल्यामुळं.
८८] ग्रंथाइतका प्रांजळ व निष्कपटी गुरू नाही.
८९] व्यवहार म्हणजे आपल्या व दुसऱ्यांच्या विचारांची बेरीज-वजाबाकी.
९०] बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका.
९१] जग भित्र्याला भिवविते आणि भिवविणाऱ्याला भिते.
९२] परमेश्वराची अत्युच्च देणगी म्हणजे वेळ , ती वाया घालवू नका.
९३] संस्कृती म्हणजे प्रकृती आणि विकृती यांना दिलेली योग्य आकृती.
९४] उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते.
९५] क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
९६] शांततेच्या काळात जितका जास्त घाम गाळाल, तितके कमी रक्त युद्धकाळात तुम्हाला सांडावे लागेल.
९७] अपयशाची भीती ही सर्वांत मोठी भीती होय.
९८] मनुष्याचे मन हे पॅरॅशूटसारखे आहे, ते उघडे केले तरच कार्य प्रवण होते.
९९] दया ही अशी भाषा आहे की जी बहिऱ्याला ऐकू येते आणि मुक्यालाही समजू शकते.
१००] माणसाची निम्मी अधिक शक्ती त्याच्या आनंदी वृत्तीतच सामावली आहे.
काय शिकलात?
आज आपण 100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.