Marathi poems for kid’s || लहान मुलांसाठी मराठी चारोळी,कविता ||#300
1.
[झुक झुक झुक गाडी]
गाड़ी आली, गाडी आली, झुक झुक झुक /
शिट्टी कशी वाजे बघा, कुक कुक कुक //१//
इंजिनाचा धुर निघे भक भक भक ।
चाके पाहू तपासूनी, ठक ठक ठक //२//
गाडीमध्ये बसा चला, पट पट पट ।
सामानही ठेवा सारे, चट चट चट//३//
तिकिटाचे पैसे काढा, छन छन छन ।
गाडीची ही घंटा वाजे, घण घण घण ||४||
जायाचे का तुम्ही कुठे, भूर भूर भूर ।
कोठेही जा, नेई तुम्ही, दूर दूर दूर //५/
नका बघू डोकावून, शुक शुक शुक /
गाडी आता निघालीच, झुक झुक झुक //६//
(..वि म कुलकर्णी )
2.
[चिमणीचं लग्न]
चिमणा चिमणीचे ठरलं लग्नतयारीत झाले सगळेच मग्न
कावळ्याने आणला बँड बाजाखायला सगळ्यांना गोड खाजा
कोकिळेने धरली सुरेल तानवाघोबा आबांचा खूपच मान
कोल्हेदादाने आणला आचारीभाजी चिरण्यात गेली रात्र सारी
लग्नाच्या दिवशी उडाली धांदलआनंदात होते प्राणी मंडळ
सासरी जाताना चिमणीला फुटले रडूचिमणा म्हणाला, आती डोळे पूस बघू.
3.
ग्गोबाई.. ढग्गोबाई..]
अग्गोबाई.. ढग्गोबाई .. लागली कळ ढगाला
उन्हाची केवढी झळ ! थोडी न थोडकी ,
लागली फार ! डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ॥
वारा वारा गरागरा सो सो सूम…
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम…
वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छड़ी !! ॥१॥
खोल खोल जमिनीचे उघडुन दार
बुड बुड बेडकाची बडबड फार ! डुंबायला
डबक्याचा करू या तलाव साबु-बिबु नको..
थोडा चिखल लगाव!! ॥२॥
(संदीप खरे)
4.
[गोरि गोरि पान]
गोरि गोरि पान, फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ।।
गोऱ्या गोऱ्या वहिनीला, अंधाराची साडी
अंधाराच्या साडीला, चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या खडीला, बिजलीचा वाण ।।
वहिनीला आणायला, चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला, हरणांची जोडी
हरणांची जोडी तुडवी, गुलाबाचे रान ।।
वहिनीशी गट्टी होता, तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांशी खेळताना, दोघे आम्ही सान ।।
5.
[आई मला दे ना !]
आई मला छोटीशी बंदूक दे ना ! बंदूक घेईन ।
शिपाई होईन । ऐटीत चालीन । एक दोन तीन ॥ १॥
आई मला छोटीशी मोटार दे ना ! मोटार घेईन ।
ड्रायव्हर होईन । गावाला जाईन । पों पों पों ॥ २॥
आई मला छोटेसे विमान दे ना ! विमान घेईन ।
पायलट होईन । आकाशी जाईन । भर भर भर ॥ ३॥
आई मला छोटीशी बहुली दे ना ! बाहुली घेईन ।
तिजला मी सजवेन । ती संगे नाचेन । छुम छुम छुम ॥ ४ ॥
6.
[मुंगी उडाली आकाशीं।]
मुंगी उडाली आकाशीं। तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जांला। वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय। शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली। देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥
7.
[आला पाऊस आला]
पाऊस पडतो, सर सर सर घरी चला रे, भर भर भर!
पाऊस बाजे, बडा धूम धावा, धावा टोका धूम!
धावता, धावता गाटले घर पर रे पावसा दिवसभर!
पडरे पावसा, चिडून चिडून आईच्या कुशीत, बसलो दडून!
8.
[पोलिस ]
मातीत पडलेल्या गोळीसाठी बंड्याने काढला गळा
पोलिस म्हणतो काय झालं रडायला रे तुला बाळा॥१॥
डोळे बंडया म्हणे पुसून वाट माझी आधी सोडा
जातो आता घरी मी तुम्हालाच घाबरलो थोडा ।।२।।
मोठयाने हसत पोलिस म्हणे हुषार आहेस हं मुला
छाती काढून बंडया म्हणे खेळातला पोलिसच करतात मला
9.
[चकचक चकली]
चक चक चकली काट्यांनी माखलीतुकडा मोडताच खमंग लागली
कड कड कडबोळे कुडकुडीत झाले
एकच खाताना दात दुखू लागले
गोरीपान करंजी नावे सारखी दिसते
पोटातले खाताच आणखी हवी वाटते
केवढा मोठा लाडू हातात सुद्धा मावत नाही
थोडा थोडा खाताना केव्हा संपला कळत नाही
तिखट जाळ चिवडा आम्हाला नको बुवा
दाणे खोबरे वेधून लाडूच्या बदली दादांना द्या
झाला एकदाचा फराळ सगळ्यांना द्या
चहा दूध पिऊन आम्ही किल्ल्याकडे निघालो पहा
10.
[ससा]
एक होता ससा
सांगा पाहू कसा ?
पांढरा पांढरा रंग
अन् मऊ मऊ अंग.
मोठे मोठे कान
लाल-लाल डोळे छान
काय बरे खातो? लट्ठ मात्र दिसतो.
असा हा ससा धीट नाही तसा.
चाहूल लागता पळतो.
झाडा-झुडुपात लपतो.
तुरु-तुरु ह्याची चाल
पहाल तर थल्ल व्याल. असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा.