9 Marathi Poem on Mother – आई वर ९ मराठी कविता

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला 9 Marathi Poem on Mother आई वर ९ मराठी कविता देणार आहे. तर चला बघुयात ९+ मराठी कविता आई वर. आणखी वाचा – शालेय प्रार्थना आणि परिपाठ

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. आई म्हणजे –
मंदिराचा उंच कळस, अंगणातील तुळस.
नदिकाठचा तीर, शेतातील विहीर.
वासराची गाय, दुधावरची साय.
ममतेचा पाझर, पाण्याचा ओझर.
शिक्षणाची पाटी, जीवनाची काठी.
वाऱ्याची झलक, संस्काराचा फलक.
पाण्यातील होडी, साखरेतील गोडी.
झाडाखालची सावली, लेकराची माऊली.
थंडीतली शाल, घराची ढाल.
चेहऱ्यावरील नूर, गीतांतील सूर.
मायेचा सागर, लेखणीचा कागर.
आरतीतील टाळी,वेदनेनंतरची आरोळी.
क्षमेची मूर्ती, उत्साहाची स्फूर्ती.
जीवनाचा प्रकाश, निरंतर आकाश.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. जिने मी जन्माला यायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम केलं.
जिने मला हे जग दाखवलं.
चालायला बोलायला शिकवलं.
संस्कारांची शिदोरी दिली.
प्रामाणिक पणे कष्ट करून यशस्वी होण्याचा मंत्र दिला.
माझा आत्मविश्वास वाढवला, धाडसी बनवले.
मी चुकीचे वागल्यावर शिक्षा दिली.
आणि चांगलं काम केल्यावर कौतुकही केलं.
जेव्हा जेव्हा मला अपयश आले तेव्हा तेव्हा मला धीर दिला प्रोत्साहन दिले.
माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
माझं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी खुप कष्ट घेतलं.
मला कधी कशाची कमी पडू दिली नाही.
जिच देवाकडे फक्त एकच मागणं माझ्या मुलांचं सगळं चांगले होऊ दे.
ती व्यक्ती म्हणजे माझी आई.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. करुणेचं सागर आई.
स्नेहांचा धबधबा आई.
प्रेमाचा वर्षांव आई.
ममतेचा तलाव आई.
संस्काराची शिजोरी आई.
देवा घरची तिजोरी आई.
आई शब्द लहान, पण माया आभाळाऐवढ़ी महान आई.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. आईचं प्रेम हे सकाळच्या दवासारखं असतं,
थंड्गार स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं.
आईचं प्रेम हे झाडासारखं आसतं,
कड्कडीत उनहत सुद्धा सावली देत असतं.
आईचं प्रेम हे घरासारखं असतं,
छोटं असो व मोठंराहण्यासाठी आश्रय देतचं असतं
आईचं प्रेम हे आभाळासारखं असतं,
उंच, मोकळं, स्वच्छ, जनू आपल्याला हवं हवसच वाटतं.
आईचं प्रेम हे एका बाहुली सारखं असतं,
ते फ़क्त आपल्याला मिळावं एवढंच वाटतं.
आई अपलं प्रेम कधीच दाखवून देत नाही,
पण बाळाला काही झालं तर तिला राहवत नाही.
जसं आपल्या आईनं आपल्याला समजुन घेतलं,
तसं आपण पण तिला समजुन घ्यावं.
वाटतं की देवाकडे एवढच मागावं,
तिचं हे प्रेम मला आयुष्यभर मिळावं.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. जीवनातील सर्वात मोठे सुख आहे ती.
माझे स्वर्गही आहे ती.
हे जग दाखवणारी पण ती.
जगण्याच कारण ही ती.
आमच्यासाठी लढणारी पण ती.
आम्हाला लढणंल शिकवणारी पण ती.
चुकलं तर रागवणारी पण ती.
आणि रुसणारी पण ती.
आम्हाला समजणारी पण ती.
चुक होऊ नये म्हणून समजवणारी पण ती.
एकटे चालणं शिकवणारी पण ती.
पण प्रत्येक क्षणाला पाठीशी असनारीही ती.
प्रेमळ, आम्हाला लाडवणारी अशी ती.
शब्दांत वर्णन सामावणार नाही अशी ती.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. कुठे न सोडून जाई,
वात्सल्याचीतु गं पुण्याई.

जन्मदाती तु गं माई,
तुच माझी आई.

जरी दोन शब्द आहेत आई,
तरी विश्वात ते न समाई.

अखंड ब्रह्मांड हि संपत जाई,
तरी सदैव कायम ऊरत राही.

तुझे नांव आई,
तुझे नांव आई…!

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. कलमातील कागदावर उतरवावी ती शाई,
कधीतरी प्रेमाने लिहावा शब्द तो आई.

जग जिच्यामुळे पाहतोय ती म्हणजे आपुली आई,
मऊ,मखमली जशी पांढर्याशार दुधावरील साई.

किती सांगु तिच्या मी कथा,
जे ना जाती कधी ही व्यथा.

महान व्यक्तीमहत्वच जणु आई,
जी सांभाळते पिल्लांना होऊन बाबा साई.

वेदनेवर मारी फुंकर, तिचे नाव आई.
माया करीते एैसी, जैसा पाठीराखा साई.

दया, क्षमा, शांतीची, ती साक्षात रुक्माई.
शांत निजे विठूमाई, ती गाते जेव्हा अंगाई.

विघ्नहर्ता माई माझी, जैसा ममतेचा सागर.
सदैव असे भाळी, तिच्या मायेचा पदर.

माई सारखा जगात, ना दुजा कुणी गुरु,
म्हातारपणात तिला, नका हो दूर सारू.

निरंतर तिच्या काळजात, असे प्रेमाचा पाझर.
कर्तव्यात नसते तिच्या, किंचित पण कसर.

आई म्हणजे पृथ्वीचा, खरा स्वर्ग सुंदर.
पहिलं वंदन तिला, बाकी काम नंतर.

जीवनाचे स्वर्ग सुख, आहे तिच्या कुशीत.
तिच्याच चरणात आहे, यशाचे खरे गणित.

माईला सुखी ठेवा हो, काही पडत नाही कमी.
आई विना जीवनात, नाहीच सुखाची हमी.

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. बाळाची आई असते जगत माऊली,
जशी ज्योत दिव्याला लावली.
आईचे असते बाळावर प्रेम खूप ,
साक्षात आई आहे देवतेचे रूप.
आई आपल्या बाळावर संस्कार घडवते,
जेवणाच्या वेळी भाताचा घास भरवते.
गाय आपल्या वासराला प्रेमाने चाटते,
चिमणी पिल्लांच्या तोंडात दाणा टाकते.
आई आहे की नाही मोलाची,
मग आईची काळजी का नाही घ्यायची..?

आई मराठी कविता – Marathi Poem on Mother

. आई म्हणजे जणू दुधावरची मऊ साय,
म्हणूनी रोज तिचे धरावे आपण पाय.

आपल्या साठी आई करते काबाडकष्ट,
सगळे जेवल्यानंतर खाते उशटपाशट.

मुलांसाठी ती सगळं सहन करते,
खुशी देण्यासाठी ती दिवस-रात्र झडते.

तिनेच दिला आपल्या जीवनाला आकार,
त्यामुळे आपले जीवन झाले आहे साकार.

झाडांची पडत असते जशी छाया,
तशी लेकरांवर असते आईची माया.

आपल्या यशाच्या मागे आहे तिचा हात,
कारणं तिनेच शिकवली संकटावरची मात.

आई आहे एक प्रेमळ अमृताचा झरा,
तिच्यामुळे जगण्याला अर्थ आला खरा.

आईचे प्रेम आपल्यावर आहे फार,
त्यामुळे कळाला जीवनाचा खरा सार.

देवाच्या रूपात आहे आपली आई,
तिच्या सारखे कुणी या जगात नाही.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला 9 Marathi Poem on Mother दिल्या आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: