संस्कृत मध्ये एक श्लोक आहे ‘शं करोती इति शंङ्कर:’ म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय.या दिवशी शंकराला पूजून त्यांची आराधना केली जाते .मग चल तर या पावन दिवसाच्या शुभ सकाळ संदेश सर्वाना पाठऊ .
हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा,
आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची
बेलाच्या पानाची…. हे भोळा शंकरा.
शुभ सोमवार
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतातएकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
#शुभ सोमवार मराठी संदेश
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
#शुभ सोमवार शायरी
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
#शुभ सोमवार वीडियो
सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
#शुभ सोमवार सुविचार
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर
चाली रचत राहाव्या लागतील.
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.