प्रजासत्ताक दिन माहिती, इतिहास मराठी | 26 January Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिन माहिती, इतिहास मराठी | 26 January Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – नाताळ

Contents

प्रजासत्ताक दिन मराठी | 26 January Information in Marathi

सब्बीस जानेवारी हा आपल्या स्वतंत्र भारताचा प्रजासत्ताक दिन, भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यदिनाप्रमाणेच हा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा आहे, २० जानेवारी या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कारण २६ जानेवारी १९२९ रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर येथे रावी नदीच्या तीरावर ब्रिटिश सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली, अर्थात ब्रिटिश सरकारने त्याची दखल घेतली नाही. तेव्हा २० जानेवारी १९३० रोजी सगळे भारतीय संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय ध्वजाखाली आले. मोर्चे काढले.

सभा झाल्या. ठराव संमत केले. ब्रिटिशांनी पाशवी बळाचा वापर करून स्वातंत्र्याचा लढा दडपण्याचा प्रयत्न केला, शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताने २६ जानेवारी १९५० रोजी भारतात प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना केली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ या लोकमान्यांच्या घोषणेची या दिवशी खऱ्या अर्थाने पूर्तता झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची घटना तयार केली. भारताच्या घटना समितीने ती मंजूर केली आणि २६ जानेवारी १९५०पासून ती अमलात आली. या घटनेनुसार भारत संपूर्ण सार्वभौम लोकतंत्रात्मक गणराज्य बनला.

या दिवशी भारताच्या राजधानीत – दिल्लीत अभूतपूर्व समारंभ झाला. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी भारत संपूर्ण स्वतंत्र व प्रजासत्ताक गणराज्य झाल्याचे घोषित केले. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली. त्या वेळी राजेंद्रबाबू म्हणाले – स्वतंत्र भारताच्या संपूर्ण प्रभुत्वसंपन्न जनतंत्रात्मक गणराज्याच्या प्रस्थापनेच्या सूर्योदयाचा हा दिवस संपूर्ण भारताच्या इतिहासात अपूर्व असाच आहे. त्या वेळी पं. नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे हा दिवस भारत आणि भारतीय जनता यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

आज मिळालेली दौलत ही मोठ्या जबाबदारीची आहे. तिला आपण सत्कृत्यांच्या द्वारे डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. कारण आपले प्रयत्न मंदावल्यास किंवा आपण मार्ग चुकल्यास ती आपल्या हातून निसटण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनाप्रमाणे या दिवशी भारताच्या राजधानीत – दिल्लीत कार्यक्रमांची धमाल असते. सगळीकडे उत्साह, आनंद ओसंडून वाहत असतो. राष्ट्रपतींचे सहा घोड्यांच्या गाडीतून-बग्गीतून आगमन, तिन्ही संरक्षण दलांची मानवंदना – मिरवणूक, तिन्ही सैन्यदलांचे संचलन, विविध प्रांतांची वैशिष्ट्ये दाखवणारी लोकनृत्ये, चित्ररथ, वायुदलाच्या विमानांच्या आकाशातील विलोभनीय कसरती, रात्रीच्या वेळी विद्युत दिव्यांची अत्यंत आकर्षक रोषणाई, कविसंमेलने इत्यादी अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात.

दिल्लीप्रमाणे प्रत्येक राज्याच्या राजधानीतही अशाच प्रकारचे कार्यक्रम होतात. या दिवशी शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी ठराविक वेळेला ध्वजवंदनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांत सर्व मुलामुलींनी, नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला पाहिजे. राष्टध्वजाला वंदन केले पाहिजे. पर्वजांचे स्मरण करून या देशात सराज्य आणण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवले पाहिजे की भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.

भारतीय घटनेने सर्व भारतीय नागरिक समान मानले असून धर्म, जात, वर्ण, आणि स्त्रीपुरुष असले भेद मानलेले नाहीत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे आहेत. बंकिमचंद्रांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण म्हणूया – “राष्ट्रमातेलाच आम्ही आई म्हणून ओळखतो. जन्मभूमीचे महत्त्व आम्ही स्वर्गाहून अधिक श्रेष्ठ मानतो. मला आईबाप, भाऊबहीण कुणी नाही. घरदारसुद्धा नाही. सुजला, सुफला सस्यश्यामल भारतमाता हीच आमची माता. वंदे मातरम् ।”

काय शिकलात?

आज आपण प्रजासत्ताक दिन माहिती, इतिहास मराठी | 26 January Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: