हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिन माहिती, इतिहास मराठी | 15 August Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – बंगालमधील दुर्गापूजा
स्वातंत्र्य दिन मराठी | 15 August Information in Marathi
पंधरा ऑगस्ट हा आपल्या प्रियतम भारताचा स्वातंत्र्यदिन. शेकडो वर्षे भारत पारतंत्र्यात होता. प्रथम येथे मोगलांची सत्ता होती. नंतर व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी येथे राज्य केले. भारत इंग्रजांचा गलाम झाला. स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीयावर अतोनात अत्याचार झाले. अनेक देशभक्तांनी तुरुंगवास सोसला. अनेकांनी आपले प्राण गमावले. कित्येक तरुण देशभक्त फासावर गेले. शेवटी अनेकांच्या खडतर प्रयत्नांनी आपला देश स्वतंत्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यावेळचे भारताचे नियोजित पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे मध्यरात्री बारा वाजता सगळे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केले.
दीडशे वर्षांच्या ब्रिटिशांच्या गलामगिरीत असलेल्या भारतमातेच्या पायांतील पारंतत्र्याच्या शृंखला तुटून पडल्या. भारताच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा जयजयकार झाला. १८५७ साली भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला सुरुवात झाली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक यांनी स्वातंत्र्ययुद्धाची ज्योत तेवत ठेवली. त्यातून हजारो क्रांतिकारक निर्माण झाले. स्वातंत्र्यासाठा त्यांनी आत्मबलिदान स्वीकारले. ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ अशी गर्जना करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती सुरू केली.
लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’ अशी सिंहगर्जना केला. १९४२मध्ये महात्मा गांधींनी चले जाव चळवळ सरू केली. सभाषचंद्रांनी आझाद हिंद सेना उभारून ब्रिटिशांना जेरीस आणले. या सगळ्याचा परिणाम म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत स्वतंत्र झाला. १५० वर्षे भारतावर फडकणारा इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरविला व अशोकचक्रांकित भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकू लागला. भारत स्वतंत्र झाला खरा; परंतु मुस्लिम नेत्यांच्या हटवादीपणामुळे भारताची फाळणी झाली. भारताचे दोन तकडे झाले.
पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण झाले, ही अत्यंत दुःखदायक घटना घडली. त्यामुळे या आनंदाच्या दिवशी भारतीयांच्या एका डोळ्यांत हसू व दुसऱ्या डोळ्यात आस होते. त्या वेळी योगी अरविंदांनी इशारा दिलाः भारतमातेचे मंदिर भंगलेले आहे. ते एकसंध केल्याशिवाय भारताचे भवितव्य ठीक नाही. असे असले तरी १५ ऑगस्ट हा दिवस भारतीयांच्या जीवनातील अपूर्व दिवस, सोनियाचा दिन म्हणावा लागेल. फार मोठा टप्पा भारताने गाठला.
आपली मान अधिक उन्नत झाली. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसाला-जन्मदिनाला महत्त्व असते तसे ते राष्ट्राच्या वाढदिवसाला जन्मदिनालाही असते. वाढदिवसाच्या दिवशी आपण भूतकाळातील यशापयशाचा विचार करतो व भविष्यकाळासाठी काही नवीन संकल्प करतो. आपले आप्तेष्ट आपणास दीर्घायुष्य, आरोग्य, सुख- समृद्धी मिळावी अशा शुभेच्छा देतात. त्याप्रमाणे आपणसुद्धा १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अशाच भावना व्यक्त केल्या पाहिजेत व तसे प्रयत्नही केले पाहिजेत.
पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. या दिवशी भारताच्या राजधानीत- दिल्लीत फार मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा साजरा केला जातो. लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. ३१ तोफांची मानवंदना दिली जाते. त्याचप्रमाणे तिन्ही संरक्षण दले, एन.सी.सी.चे विद्यार्थी पंतप्रधानांना मानवंदना देतात. पंतप्रधानांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या कार्यक्रमाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सेनाध्यक्ष, मंत्रिगण, लोकनेते, पुढारी, सर्व देशांचे राजदूत, स्त्री-पुरुष नागरिक उपस्थित असतात. राष्ट्रगीत म्हटले जाते.
याशिवाय कितीतरी कार्यक्रम दिवसभर चालू असतात. भारतातील सर्व राज्यांतही शासकीय पातळीवर हा समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्व शासकीय इमारतींवर, कार्यालयांवर तिरंगा ध्वज लावला जातो. प्रभातफेरी काढली जाते. स्थानिक परिस्थितीनुसार दिवसभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. हा दिवस आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्यदिन आहे हे लक्षात घेऊन अत्यंत आनंदाने, उत्साहाने, पूर्ण जबाबदारीने साजरा करावयास हवा.
या दिवशी प्रत्येक भारतीयाने राष्ट्रध्वजाला प्रणाम केलाच पाहिजे. अनेक विद्यार्थी या दिवशी शाळा-कॉलजेकडे फिरकतही नाहीत. हे अत्यंत अयोग्य आहे. आपली नैतिक जबाबदारी समजून ध्वजवंदनाला गेले पाहिजे. आपल्याला हे स्वातंत्र्य कसे मिळाले, या देशाचा एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे याचा प्रत्येकाने स्वतःशी विचार केला पाहिजे.
काय शिकलात?
आज आपण स्वातंत्र्य दिन माहिती, इतिहास मराठी | 15 August Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.