+५७ तुळशी विवाह शुभेच्छा संदेश, कविता आणि चारोळी २०२१ मराठी मध्ये
तुळशीच वरंदावान ज्याच्या असे घरी |
तुळशीच वरंदावान ज्याच्या असे घरी |
त्याला बगुणी यम ही दूर पळी ||
तर कशी वाटली मग चारोळी चला याचा अर्थ समजून घेऊ. या चारोळी तुन लेखकाला अस सांगायच आहे की प्रतेकाच्या दारा समोर तुळशी च वरंदावान असाव ते जर असेल तर यम देखील घरी यायला घाबरेल. हे १००% खर आहे अस मला वाटत तुमच की मत आहे बर.
तुळस ही आपल्या आयुरवेदामध्ये खूप महत्वाची भूमिका निभवते. तुळसिला आपल्या धर्मात खूप पवित्र मानले जाते.अशी मान्यता आहे की जेव्हा मंथनातून अमृत बाहेर अल होत त्यावेळेस त्यातील काही थेंब पृथ्वीवर पडले होते आणि त्या पासून तुलसीची निर्मिती झाली.
तुळशीच लग्न हे दिवाळी नंतर १०-१२ दिवसा नंतर केल जात. बरेच लोक खूप थाटात लग्न लाऊन देतात तोरण बांधून सनई वाले बोलाऊन,लाइटीनग करून लग्न लावतात. दर वर्षी तुळशीच लग्न खूप थाटात केल जात पण या वेळेस ते कस होईल हे संगत येत नाही. ते चांगले होण्यासाठी मी काही कविता ,शायरी घेऊन आलोय चला तर मग पाहू…
जर तुम्हाला काही कविता जमत असतील तर आम्हाला जरूर पाठवा आम्ही त्या जरूर नमूद करू.
धन्यवाद..!!
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
आज आनंदी आनंद झालातुळशी विवाहाचा दिनहा जवळ आलातुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आनंदाचे , मांगल्याचे , पावनपर्व तुळशी विवाहाचे !!तुळशी विवाह निमित्तसर्वांना मंगलमय शुभेच्छा.
असावे दारी तुळसी वृदावन(‘गीत’काव्यप्रकार)
पापाचे करी समूल नाशन
असावे दारी तुळसी वृंदावन//धृ//
आजच्या घडीला बिघडते पर्यावरण
त्यावर उपाय तुळसी रोपन
अनेक रोगांवर तुळस बहूगुण
चांगल्या आरोग्यास हिला मान
असावे दारी तुळसी वृंदावन//1//
सकाळ-संध्याकाळ हिचे पूजन
मनाला करी अति प्रसन्न
वाईट स्पंदनापासून करी रक्षण
पर्यावरणात वाढवी ऑक्सीजन
असावे दारी तुळसी वृंदावन//2//
श्रीकृष्णाला प्यारे हिचे गुणगान
करावे तिला नित्य नमन
आणि मनोभावे करता पूजन
संसारबाग फुलवी ही छान
असावे दारी तुळसी वृंदावन//3//
होण्या समृध्द धरा व तन-मन
व्हावे हिचे मनापासून जतन
प्रारंभ ते अंतापर्यंत ही पावन
म्हणून अंतिम यात्रेत हिचे मुख गमन
असावे दारी तुळसी वृंदावन//4//
श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
दिवा लावू चैतन्याचा
सारे विकार मिटवू ।
दिस सुखाचे पाहण्या
आधी दीनांना हसवू ।।
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
आनंदाचे , मांगल्याचे , पावन पर्व तुळशी विवाहाचे !!
तुळशी विवाह निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा…
पवित्र तुळशी विवाहाचा उत्सव…
एक आनंददायी क्षण…
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुळशीविना ज्याचे घर
ते तव जाणावे अघोर
तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला, आज आहे फक्त आनंदी आनंद
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
tulsi vivah wishes in marathi
चला चला रे आता होऊया
सोहळ्यात रे मग्न
वाद्ये वाजवू नाचू गाऊ
असे हे तुळशीचे लग्न
सोहळ्यात रे मग्न
वाद्ये वाजवू नाचू गाऊ
असे हे तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
तुळशी विवाह कविता मराठी
नको भेद कहाचाही
मनी ठेवू प्रेमभाव ।
दीप लावू आनंदाने
एक होऊ रंक, राव ।।
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तुलसी विवाहाचा दिवस हा आला
आनंदाचा क्षण आला
तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
आज सजली तुळस शालु हिरवा नेसून,
कृष्ण भेटीसाठी तिचं मोहरला पान पान..
अंगणात उभारला आज विवाह मंडप,
ऊस झेंडूच्या फुलांची त्यात सजली आरास..
मुळे सजवली तिची आज चिंच आवळ्यांनी,
आणि रांगोळी घातली गुलाबाच्या पाकळ्यांनी..
आहे साताचा मुहूर्त करू नका हो उशीर,
पण येताना जरूर तुम्ही आणावा आहेर…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा..!!
अन्न शुद्ध होई तुझा स्पर्श होता
प्राणवायू सदा देसी जीवांसी
अंगणी वृंदावनी स्थापिती तुजला
करिती तुझिया पूजनासी
प्राणवायू सदा देसी जीवांसी
अंगणी वृंदावनी स्थापिती तुजला
करिती तुझिया पूजनासी
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
जालंधर रूप घेऊनी श्रीहरी
नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी
दैत्य संहारी हरी वदे वृंदे
होशील तू पृथ्वीवरी तुळशी
नष्ट करी तिच्या पातिव्रत्यासी
दैत्य संहारी हरी वदे वृंदे
होशील तू पृथ्वीवरी तुळशी
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
अंगणात तुळस, आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी नात्यात
जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
आयुर्वेदामध्ये अग्रस्थान तुझे
तुलसी सेवने रोग नष्ट होती
देसी आरोग्य ‘वैभव’ मानवा
‘तुलसी विवाह’ साजरा करिती
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तुळसीचे पान. एक त्रैलोक्य समान |
उठोनिया प्रातःकाळी, वंदी तुळसी माऊली |
नाही आणिक साधन, एक पूजन तुळसीचे
न लगे तीर्थाधना जाणे, नित्य पूजने तुळसीसी
योगायोग न लगे काही, तुळसीवाचुनी देव नाही”
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,
तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,
तुम्हीही व्हा लग्न सोहळ्यात सामील
मोठया जल्लोषात साजरा करुया तुळशी विवाह
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!