हलासन बद्दल माहिती मराठीत – Halasana Information in Marathi

लो वाचकांनो.. आज मी तुम्हाला हलासन बद्दल माहिती मराठीत – Halasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

लक्ष द्या – योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ

हलासन या आसनात शरीराचा आकार नांगरासारखा (हिंदी – हल) बनतो, म्हणून याला हलासन असे म्हणतात.

ध्यान : विशुद्धाख्य चक्रात.

श्वास : रेचक आणि नंतर दीर्घ.

कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर सरळ पहुडा. दोन्ही हात शरीराला लागलेले असावेत. आता रेचक करून श्वास बाहेर सोडून द्या.

दोन्ही पाय एकाच वेळी हळूहळू वर उचला. पाय अगदी सरळ, ताठ ठेवून मागे डोक्याकडे घेऊन जा. पायांची बोटे जमिनीस लागू द्या. हनुवटी छातीशी लागलेली असावी. चित्तवृत्ती विशुद्धाख्य चक्रात स्थिर करा. २-३ मिनिटांपासून २० मिनिटांपर्यंत आसनाचा वेळ वाढवू शकता.

लाभ : हलासनाच्या नियमित सरावाने अजीर्ण, अपचन, मूळव्याध, थायरॉईडचा अल्प विकास, अंगविकार, अकाली वृद्धत्व, दमा, कफ, रक्तविकार इ. रोग दूर होतात. या आसनाने यकृत मजबूत होते.

छातीचा विकास होतो. श्वसनक्रिया जलद होऊन ऑक्सिजनने रक्त शुद्ध होते. घशाचे रोग, पोटाचे विकार, संधिवात इ. रोग दूर होतात. पोटाची चरबी कमी होते. डोकेदुखी दूर होते. वीर्यविकारांचे निर्मूलन होते.

वाईट विचार बंद होतात. नाडीतंत्र शुद्ध होते. शरीर बलवान आणि तेजस्वी बनते. गरोदर स्त्रियांशिवाय प्रत्येकाने हे आसन केले पाहिजे. पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होणे हे वृद्धावस्थेचे लक्षण आहे.

हलासनाने पाठीचा कणा लवचीक बनतो. यामुळे युवावस्थेतील शक्ती, स्फूर्ती, स्वास्थ्य व उत्साह कायम राहतो. पाठीच्या कण्याशी संबंधित नाड्यांचे स्वास्थ्य सुरक्षित होऊन वृद्धावस्थेची लक्षणे लवकर दिसत नाहीत.

जठरातील नसनाड्यांना शक्ती मिळते. जठराच्या मांसपेशी तसेच पचनक्रियेतील नसनाड्यांच्या दुर्बळतेमुळे मंदाग्नी आणि अपचन होत असेल तर हलासनाने दूर होते. कंबर, पाठ व मानेचे रोग बरे होतात.

यकृत किंवा प्लीहेची वृद्धी झाली असेल तर हलासनाने सामान्य अवस्थेत येतात. जननेंद्रियांची (कामकेंद्र) शक्ती वाढते. अपानशक्तीचे उत्थान होऊन, उदानरूपी अग्नीचा योग झाल्याने वीर्यशक्ती ऊर्ध्वगामी होते.

हलासनाने वीर्य स्थिर होते. या आसनाने अंडकोषाची वृद्धी, पेन्क्रियास, अपेंडीक्स वगैरे आजार बरे होतात. थायरॉईड ग्रंथीची क्रियाशीलता वाढते. ध्यान केल्याने विशुद्धाख्य चक्र जागृत होते.

काय शिकलात?

आज आपण हलासन बद्दल माहिती मराठीत – Halasana Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: