अशाच महान व्यक्ति च्या काही कविता आम्ही घेऊन आलोय त्या तुम्हाला नक्की आवडतील. माझ्या मते तर ते कविता जगतातले एक महान व्यक्ति होते त्यांच्या बद्दल काही कवींनी कविता लिहल्या होत्या त्या शोधून मी या पोस्ट मध्ये लिहल्या आहेत.
जयोऽस्तु ते
जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची
स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी
स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतन्त्रते भगवती तूंच जी विलसतसे लाली
तुं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहिं तूंचि
स्वतन्त्रते भगवती अन्यथा ग्रहणनष्टतेची
मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं
स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतन्त्रते भगवती सर्व तव सहकारी होती
हे अधमरक्तरञ्जिते सुजनपूजिते श्री स्वतन्त्रते
तुजसाठि मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल-चराचर-शरण चराचर-शरण-विनायक दामोदर सावरकर
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकरि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाजी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
स्वातंत्र्यवीर सावरकर
क्रांतीच्या त्या ज्वाला
जेव्हा भडकल्या
त्यांच्याच कारणे
त्यांना शिक्षा झाल्याअनेक तुरूंग
त्यांनी भोगलेले
काळ्या पाण्याच्याही
शिक्षेत गेलेलेथोर क्रांतीवीर
महान लेखक
समाज जागृते
लिहिली नाटकज्वलंत विचार
धगधगणारे
अग्नीकुंडातील
जळते निखारेदेशभक्ती गीत
आठवे सर्वाला
त्याच्या ऐकण्याने
स्पर्शते मनाला“न्हे मज परत
त्या मातृभूमीला,
सागरा प्राण हा
रे तळमळला..!”श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेलश्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल