राजमाता जिजाऊ मराठी चारोळी, कविता

Contents

Rajmata Jijai charoli, Kavita in Marathi with images

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे.तरी देखील आम्ही काही मराठी चारोळ्या घेऊन आलोय त्या तुम्हाला आवडतील…

कविता, चारोळी जर तुम्हाला आवडल्या अवश्य शेअर करा…

संस्कार तुझे थोर घडविले
शिवबाला रयतेला उध्दारिले तो
आदर्श राजा झाला ।।
पेच प्रसंग आला तरी, तुम्ही
डगमगल्या नाही संकटांचा सामना
केला, नुसती चिंता केली नाही ।।
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या
माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या राष्ट्रमाता, विश्वमाता,
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा ।।
स्वराज्याचा जिने घडविला
विधाता, धन्य ती स्वराज्य
जननी जिजामाता ॥
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात
साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान,
चातुर्यर्य, चारित्र्य, पराक्रम व संघटन अशा
सत्वगुणांचे बाळकडू देणा-या राजमाता जिजाऊ
यांना मानाचा मुजरा ।।

राजमाता जिजाऊ आऊसाहेब कविता

” इतिहासा ! तू वळूनी

पाहती पाठीमागे जरा,

झुकवूनी मस्तक करशील

त्यांना मानाचा मुजरा “

⚔️🚩🚩🚩⚔️

|जय जिजाऊ||

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते लढले मावळे…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते दिसले विजयाचे सोहळे…!

⚔️🚩🚩🚩⚔️

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला

घडविले तिने त्या शूर शिवबाला ! !

साक्षात होती ती आई भवानी

जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी ! !

मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा

तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा ! !

सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने

घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने! !

तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म

सर्व धर्म समभाव हे एकच तीचे कर्म ! !

तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा

धन्य धन्य जिजाऊ माता

धन्य धन्य शिवाजी राजा ! !

⚔️🚩🚩🚩⚔️

 

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,

जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,

तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;

नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥१॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,

तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;

तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,

कुठे दुःख कोणास काही नसू दे;

नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥

तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,

तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;

घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥४॥

जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ

⚔️🚩🚩🚩⚔️

आई

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म

जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास

स्वर्गात घेतला!

आई

हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण

आज अचानक झाली आईची आठवण….

⚔️🚩🚩🚩⚔️

 

जिजाऊंचे संस्कार..,

प्रेम, जिव्हाळा, ममता

आणि आपुलकी..,

आमच्या छत्रपती

शिवरायांची राजनीति,

मावळ्यांची माणुसकी..,

शंभूराजांचे शौर्य..,

न्याय-नीती,

माणुसकीला पोषक

असणाऱ्या रीती,

माणसाला माणसासारखे

वागवणारी संस्कृती..!!

धगधगती मशाल जिजाऊ

⚔️🚩🚩🚩⚔️

 

महाराष्ट्राचा साज तु,

मराठमोळा बाणा होता

रणरागिणीचे रुप जणू

आम्हांसाठी माउली तु,

अंधाललेल्या समाजासाठी

तेजस्वी किरण तु,

शिवबांच्या आगोदर

माता ह्रदयात आमच्या तु,

संस्कारांची खाण होतीस

पवित्र मातीतील तु,

विचारांनी लढलीस इथे

शौर्याची गाथा तु,

चरणी माथा तुझ्या

महाराष्ट्राची जिजाऊ तु…

⚔️🚩🚩🚩⚔️

ज्या माऊलीन स्वताची पूर्वा सोडुन

अवघा महाराष्ट्र वाचविला,

ज्या माऊलीन मराठी

मातीचा कळस उंच स्थानी

पोचविला, जिच्या पुण्याईन आज

आम्हाला मराठी मातीत जन्मल्याचा अभिमान आला,

जिच्यामुळे आम्हाला स्वराज्यनिष्ठ

शंभुराजा मिळाला,

ज्या मातेमुळे मराठी माणूस

जगासमोर आला,

ज्या मातेमुळे रयतेचा

राजा आम्हाला दिसला,

अशा श्रेष्ठ जिजाऊ माऊलीस

माझे कोटी कोटी

वंदन….

⚔️🚩🚩🚩⚔️

जननी मराठा साम्राज्याची,

सारूनी बाजूस राजघराणी.

जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,

लढा लढविली ही रणरागिणी

⚔️🚩🚩🚩⚔️

 

लाख लोटून जातील वर्षे

माँ साहेब तरीही तुमची सर

पुन्हा येणार नाही, जीवर ना येणार

जन्मास आपण पुन्हा तीवर

पुन्हा छत्रपतीही घडणे नाही…

माँ साहेब जिजाऊ यांना

मानाचा मुजरा……

जय जिजाऊ जय शिवराय…

⚔️🚩🚩🚩⚔️

रंग तिचा…

शोभे चंद्रकोर भाळी मुखी ठेवा

तेजाचा समरी खड्गाची

खेळी असा रंग तिचा शौर्याचा ।

रामराजाची देई शिकवण होऊन

बाप बाळाचा उराशी मायेची

साठवण असा रंग तिचा वात्सल्याचा ।

जरी आता इतिहास

जाहला राजमाता जिजाऊंचा मिळे

आजही आत्मविश्वास असा रंग तिचा कीर्तीचा।

⚔️🚩🚩🚩⚔️

 

जिजाऊ हि एक स्त्री होती….

स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती…

शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ….

जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती …

भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती….

आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती…

स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या…

जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा… अशा त्या आदर्श माता होत्या …

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा…

⚔️🚩🚩🚩⚔️

मुजरा माझा त्या माँ जिजाऊला घडविले तिने त्या शूर शिवबाला ! !

साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी ! !

मराठी मातीत ज्याने केला गनिमी कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा ! !

सांभाळीले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने! !

तिच्या मायेच्या छायेत नव्हता जाती धर्म सर्व धर्म समभाव हे एकच तीचे कर्म ! !

तिच्याच राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा ! !

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: