Site icon My Marathi Status

योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना

  1. जेवणानंतर सहा तासानी, दूध प्यायल्यानंतर दोन तासांनी किंवा अगदीच अनशापोटी आसने करावीत.
  2. शौच-स्नानादीतून निवृत्त झाल्यावरच आसने करावीत.
  3. आसने करताना श्वास तोंडाने न घेता नाकानेच घ्यावा.
  4. जमिनीवर काहीही न अंथरता कधीही आसने करू नये. गरम ब्लँकेट, घोंगडे, गोणपाट किंवा एखादे विद्युतरोधक आसन अंथरून त्यावरच आसने करावीत, जेणेकरून शरीरात निर्माण झालेली विद्युतशक्ती नष्ट होणार नाही.
  5. आसन करताना शरीरासोबत जबरदस्ती करू नये. आसन म्हणजे कसरत नव्हे. म्हणून आसने धैर्यपूर्वक करावीत.
  6. आसने केल्यानंतर थंडीत किंवा जोराचा वारा वाहत असताना बाहेर जाऊ नये. स्नान करायचे असल्यास थोड्या वेळाने करावे.
  7. आसने करताना अंगावर कमीतकमी व सैल कपडे असावेत.
  8. आसने करताना अधूनमधून व शेवटी शवासन करून शिथिलीकरणाद्वारे शरीराच्या ताठरलेल्या स्नायूंना आराम द्यावा.
  9. आसने झाल्यावर लघुशंकेला अवश्य जावे, जेणेकरून एकत्रित झालेली दूषित तत्त्वे लघवीवाटे बाहेर निघून जातील.
  10. आसने करताना त्या-त्या आसनांच्या कृतीत सांगितलेल्या चक्रावर ध्यान केल्याने व मानसिक जप केल्याने अधिक लाभ होतो.
  11. आसनानंतर थोडे ताजे पाणी पिणे लाभदायक आहे. ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्यात विभाजित होऊन संधिस्थानाच्या भागातून मल बाहेर काढण्यासाठी पाणी खूप आवश्यक असते.
  12. स्त्रियांनी गरोदरपणात आणि मासिक पाळीत कोणतेही आसन कधीही करू नये.
  13. आरोग्याच्या इच्छुक प्रत्येक व्यक्तीने सकाळी तुळशीची ५-६ पाने खाऊन वरून पाणी प्यावे. यामुळे स्मरणशक्ती वाढते तसेच आम्लपित्त व इतर व्याधींतही लाभ होतो.

आसनाच्या कृतीत येणाऱ्या काही अवघड शब्दांचे अर्थ –

Exit mobile version