मराठी कोडी🧠💯? आणि त्यांची उत्तरे | Marathi Kode ani uttre

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत मराठी कोडी जी तुम्हाला विचारात पाडतील तसेच काही कोडी तुम्हाला लहान पणीची आठवण देखील करून देतील. आम्ही लहान असताना देखील आम्हाला असली कोडी खूप आवडायची आम्हाला कोडी सोडवताना खूप मज्जा यायची. आम्ही जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीला मामा च्या गावी जायचो तेव्हा रोज रात्री महफिल भरायची मग मामा तसेच आजोबा आम्हाला कोडी विचारायचे आणि मग आम्ही सगळे मिळून ती सोडवायचो काही कोडी खूप सोप्पी तर काही खूप अवघड.

त्यातलीच काही कोडी मी घेऊन आलोय आणि तसेच थोडा शोध घेऊन नवीन कोडी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही कोडी कशी वाटली ते नक्की कमेन्ट मध्ये सांगा. तर चला मग सुरू करू.

मला एक कोड सांगा

आहे मला मुख,परंतु खात नाही,

दिसते मी झोपलेली,पण असते पळतही,

माझ्याशिवाय तुमचे,जगणेच शक्य नाही

वहा तुम्ही माझी,थोडीशी कळजीही,

मी कोण काढा शोधुन,नाहीतर बें म्हणा मागून 🤔

उत्तर: नदी [या कोड्याचे उत्तर नदी आहे ]

 

ओळखा पाहू मी कोण प्रश्नावली

गळा आहे पण डोकं नाही खांदा आहे पण हात नाही मी कोण

शर्ट [याच उत्तर शर्ट आहे कारण त्याला गळा असतो पण डोक नाही आणि खांदा असतो पण हात नसतात.]तुम्हाला काय वाटतय याच उत्तर आम्हाला नक्की कळवा.

आटंगण पटंगण

लाल लाल रान,

अन् बत्तीस पिंपळांना

एकच पान

उत्तर: तोंड(दात आणि जीभ)या कोड्या मध्ये लाल लाल रान म्हणजे जीभ आणि बत्तीस दातांना बत्तीस पिंपळची पाने म्हंटलं आहे.

मराठी कोडी आणि उत्तरे

कुट कुट काडी पोटात नाडी,

राम जन्मला हातजोडी

कृष्ण जन्मला हात जोडी🤔

उत्तर: देवर्यातील घण्टी / टाळ. [घंटीच्या मधल्या खिळ्याला पोटातली नाडी म्हंटल आहे.]

कोकणातनं आला भट ,

धर की आपट 🤔

उत्तर: नारळ [याच उत्तर नारळ आहे कारण आपल्याला नारळाचे खोबरे काढायचे असेल तर त्याला आपटावच लागत]

चार खंडांचा एक शहर,

चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी

आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी.!!🤔

उत्तर: कॅरम बोर्ड गेम [कॅरम मध्ये बघा 4 छिद्रे असतात आणि आठ सोंगठ्या असतात ज्या आपल्याला शिपाई म्हणजेच stricker च्या मदतीने यात लावायचा असतो.]

कोकणातनं आली सखी,

तिच्या मानंवर दिली बुक्की ,

तिच्या घरभरलेकी

उत्तर: लसूण🤔

कोकणातनं आली नार,

तिचा पदर हिरवागार,

तिच्या­ काखेला प्वार🤔

उत्तर: काजू (फळासकट)

कोकणातनं आला रंगूकोळी,

त्यानं आणली भिंगू चोळी,

शिंपीण म्हणते शिवू कशी,

परटीण म्हणते धुवू कशी,

अन् राणी म्हणते घालू कशी 🤔

उत्तर: कागद


लहान मुलांसाठी कोडी व उत्तरे

हजार येती हजार जाती

हजार बसती पारावर,

अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर 🤔

उत्तर: बस /ट्रेन.

सुपभर लाह्या त्यात एक रुपया🤔

उत्तर: चंद्र आणि चांदण्या

लाल आहे पण रंग नाही,

कृष्ण आहे पण देव नाही,

आड आहेपण पाणी नाही,

वाणी आहे पण दुकान नाही 🤔

उत्तर: लालकृष्ण आडवाणी

तीन पायांची तिपाई, वर बसला शिपाई 🤔

उत्तर: चूल आणि तवा

थई थकड धा..

तीन डोकी पाय धा 🤔

उत्तर: दोन बैल, नांगर आणि एक माणूस (शेत नांगरणारा

पाटिल बुवा राम राम, दाढी मिशालांब लांब 🤔

उत्तर: कणीस

पाणी नाही, पाऊस नाही,

तरी रान कसं हिरवं ,

कात नाही,चुना नाही,

तरी तोंड कसं रंगल🤔

मराठी कोडी whatsapp with Answer

उत्तर: पोपट

एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?

ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव ! दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव

तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव

व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव

सांगा पाहु ते नाव काय?🤔

उत्तर : सीताराम

मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर- वांगे

 

चार बोटे आणि एक अंगठा
तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही
सर्वजण बेजार म्हणतात मला
तरी नेहमी उपयोगी मी राही
सांगा पाहू मी कोण

उत्तर- हातमोजे

गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?

उत्तर -ताट

पाच अक्षराचा एक पदार्थ

पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव

पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज

पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर

सांगा पाहू मी कोण?

उत्तर – गुलाबजाम

दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?

उत्तर -काजवा

बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले
तुला तहान लागली तर ती खा
तुला भूक लागली तर ती खा
तुला थंडी वाजली तर ती जाळ
ओळखा पाहू ती वस्तू कोणती

उत्तर-नारळ

वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव

उत्तर- चश्मा

उंच वाढतो मी रंग आहे हिरवा
तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा
प्रदूषण करतो मी कमी
निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी
सांगा पाहू मी कोण

उत्तर- झाड

वस्तू आहे मी अशी
छिद्रे असतानाही असतानाही
पाणी भरून मी घेते

उत्तर- स्पंज

हिरवा आहे परंतु पाने नाही
नक्कल करतो मी परंतु माकड नाही
ओळखा पाहू मी कोण

उत्तर- पोपट

लाईट गेली माझी आठवण झाली
असो मी लहान किंवा मोठी
माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
सांग मी आहे तरी कोण

उत्तर- मेणबत्ती

रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत
घरे आहेत परंतु माणसे नाहीत
जंगल आहे पण तू प्राणी नाहीत
ओळखा पाहू मी कोण

उत्तर- नकाशा

पांढरे माझे पातेले
त्यात ठेवला पिवळा भात
ओळखेल मला जो कोणी
त्याच्या कमरेत घाला लाथ

उत्तर- उकडलेले अंडे

आम्ही दोघे जुळे भाऊ
एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे
सोबत असता खुप कामाचे
एक हरविता नाही काम दुसऱ्याचे

उत्तर- चप्पल

पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण

उत्तर- पेन

एक लाल गाई
नुसती लाकूड खाई
जर पाणी पिले
तर मरून ति जाई
ओळखा पाहू मी कोण

उत्तर- आग

बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण

उत्तर- घड्याळ

एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल
एक मेला एक विकला
आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?

उत्तर -एक किंवा शून्य

नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर -कांदा

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता
अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली
व संपूर्ण भिजून गेला
तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही
असे कसे झाले

उत्तर- कारण तो माणूस टकला होता

एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते
परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते
पहिल्या खोलीत भयानक आग असते
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत
दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

उत्तर- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही

मराठी कोडी व उत्तरे pdf

तीन अक्षरांचे माझे नाव

वाचा उलटे किंवा वाचा सरळ

मी आहे प्रवासाचे साधन

सांगा पाहू माझे नाव

उत्तर- जहाज

पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते
हात नसूनही मी तुमच्याशी भांडते
सांगा पाहू मी कोण

उत्तर- पतंग

दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
सांगा पाहू मी कोण

उत्तर- मिशा

एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील

उत्तर- नारळाच्या झाडावर केळी नसतात

तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात
तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता
तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण

उत्तर- तुम्ही

हिरव्या घरात लपले एक लाल घर

लाल घरात आहेत खूप लहान मुले

ओळखा पाहू मी कोण

उत्तर- कलिंगड

एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला
तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे

उत्तर- तो पहिल्याच पायरीवर होता

एका काळ्याकुट्ट राजाची
अद्भुत मी राणी
हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण

उत्तर- दिवा

Matathi Charoli

आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेत स्टेटस कोट्स आणि शेरो शायरी आणत आहोत, तुम्ही आमच्यासोबत सामील होऊ शकता आणि तुमच्या मित्रांसह आणि तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करू शकता आणि आयुष्यातील खूप वेगळे आनंदाचे क्षण व्यक्त करू शकता- तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स वाचू शकता आणि त्या डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: