मत्स्यासन बद्दल माहिती मराठीत – Matsyasana Information in Marathi
हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला मत्स्यासन बद्दल माहिती मराठीत – Matsyasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.
लक्ष द्या – योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ
मत्स्यासन मत्स्य म्हणजे मासा. या आसनात शरीराचा आकार माशासारखा बनतो म्हणून याला मत्स्यासन असे म्हणतात. प्लाविनी प्राणायामासहित या आसनाच्या स्थितीत खूप वेळपर्यंत पाण्यात पोहता येते.
ध्यान : विशुद्धाख्य चक्रात.
श्वास : अगोदर रेचक, बहिर्कुभक, नंतर पूरक आणि रेचक.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पद्मासनात.ताठ बसा. नंतर पाय पद्मासनाच्याच स्थितीत ठेवून हातांच्या आधारे सावधपणे मागे झोपा. रेचक करून कंबर वर उचला.
गुडघे, नितंब आणि डोके (जेथे शेंडी असते तो भाग) जमिनीला टेकवा. डोक्याखाली एखाद्या मऊ कापडाची घडी अवश्य ठेवा. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा.
दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवून ठेवा. कुंभकाच्या स्थितीत राहून दृष्टी वरच्या बाजूला डोक्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. दात एकमेकांवर दाबलेले व तोंड बंद ठेवा. एक मिनिटापासून पाच मिनिटांपर्यंत अभ्यास वाढवा.
नंतर हात सोडून, कंबर जमिनीवर टेकवून, डोके वर उचलून स्वस्थ बसा. पूरक करून रेचक करा. अगोदर जमिनीवर पहुडून नंतर पद्मासन करूनही मत्स्यासन करता येते.
लाभ : मत्स्यासनाने शरीर मजबूत होते. गळा, छाती व पोटाचे सर्व विकार दूर होतात. नेत्रदृष्टी वाढते. गळा साफ राहतो. श्वसनक्रिया सुरळीत चालते. खांद्यांचे स्नायू मागच्या बाजूला वळल्याने छाती व फुप्फुसांचा विकास होतो.
पोट साफ राहते. आतड्यांतील मल दूर होतो. रक्ताभिसरणाची गती वाढते. परिणामी त्वचेचे विकार होत नाहीत. दमा आणि खोकला दूर होतो. छाती रुंद होते. पोटाची चरबी कमी होते.
या आसनाने अपानवायूची गती खालच्या बाजूने होत असल्याने मलावरोध दूर होतो. थोडे पाणी पिऊन हे आसन केल्याने शौचास साफ होते. मत्स्यासनाने स्त्रियांच्या मासिक पाळीसंबंधी सर्व रोग दूर होतात, मासिकस्राव नियमित होतो.
काय शिकलात?
आज आपण मत्स्यासन बद्दल माहिती मराठीत – Matsyasana Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.