Site icon My Marathi Status

बेस्ट 11+ मकर संक्रांतीनिममित्त मराठी कविता

मित्रहो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांती बद्दल काही कविता, मित्रांनो जरी कवितांची संख्या कमी असली तरी त्यात भाव हे अमर्यादित आहेत जे तुम्हाला मकर संक्रांती बद्दल उत्सुकता वाढवतील. मकर संक्रांत हा सन महाराष्ट्रातला सगळ्यात प्रसिद्ध सन आहे.

या दिवशी कित्तेक कार्यक्रम साजरे केले जातात. या मकर संक्रांती बद्दल च्या कविता मी इंटर नेट वरुण शोधून आणल्या आहेत तरी या सर्व कवितांचे श्रेय त्यांच्या लेखकांना जात. मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या कविता आम्हाला पाठऊ शकता त्या कविता आम्ही अवश्य अपलोड करू.

जर तुम्हाला अश्याच कविता आम्हाला पाठवाव्या अस वाटत असेल तर तुम्ही कमेन्ट द्वारे किंवा आम्हाला ईमेल करू शकता आमचा ईमेल असा आहे. कविता पाठवायला संकोच करू नका.

मकरसंक्राती

ह्या थंडीच्या महिन्यात
गात्रनिगात्र गोठले
सृष्टीचा पालणहार
सुर्यदेव दूर गेले

भोग-रोग जीवनाचे
हळूवारपणे आले
हवी उर्जा दुरावण्या
रूक्षतेची पालेमुळे

तन-मन दुरावले
अबोलाचे निघे वारे
थंडथंड प्रवाहात
थिजले समस्त सारे

निसर्गही मदतीला
आला धावत घेऊन
अनेक भाज्यांचा संच
तिळ-बाजरी देऊन

भाजी-भाकरी खमंग
जोड त्या तिळ-गुळाला
मकरसंक्रातीला घ्या
‘तिळगुळ,गोड-गोड बोला..!’

मकरसंक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

!! नात्याची पतंग !!

नकोय मजला तीळ गुळ
नकोय दिखावाचा गोडवा
प्रेम वात्सल्य जिव्हाळाचा
नैवैद एकमेकांना भरावा. //१//

आयुष्याची इथे पतंग झाली
सुत आप्त परके सारे वाली
हात- साथ द्याव आधाराला
ठेवून ओढतांना हास्य गाली.//२//

बाळाने-आईशी नाळ जोडूनी
मिळवली नौमासाची शिदोरी
तसंच पांगळी सुताविन पतंग
कायमचं राहील पडून अधुरी.//३//

पतंग सुतानी जीवापाड जपावं
न विसरता दोघे तोल सावरावं
वादळ वाऱ्यात न खाचता उडावं
ऋणानुंबंधूचे नांत सदा टिकावं…//४//

का? भार गोड बोलण्याचा
नेहमीच द्यावा तीळगुळाला
स्वभावातही असावा गोडवा
मग जग जिंकता येत सर्वांला //५//

पतंग

वरती खालती
घेते ती गीरकी
मांज्यासवे निघे
फिरते फिरकी

रंगीबेरंगी ही
आकाशी विहरे
मानवही जसा
जीवनात फिरे

कापाकापी स्पर्धा
लढत चुरस
कधी गुल होते
कधी ती सरस

जीवन आपले
असेच असते
आयुष्याचा दोरा
विधात्याच्या हस्ते

जीवन पतंग
स्थिर ती असावी
स्मरणाची दोरी
नित्य आठवावी

श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल

Exit mobile version