धनुरासन बद्दल माहिती मराठीत । Dhanurasana Information in Marathi
हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला धनुरासन बद्दल माहिती मराठीत । Dhanurasana Information in Marathi देणार आहे, तर चला बघुयात.
लक्ष द्या – योगासने कारण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ
धनुरासन बद्दल माहिती मराठीत । Dhanurasana Information in Marathi
शरीराचा आकार ताणलेल्या धनुष्यासारखा होतो, म्हणून याला धनुरासन म्हटले जाते.
ध्यान : मणिपूर चक्रात.
श्वास : सोडताना रेचक व घेताना पूरक.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यांतून वाकवा. दोन्ही हात मागे नेऊन दोन्ही पायांचे घोटे पकडा.
रेचक करून हातांनी पकडलेल्या पायांना खेचत हळूहळू वर उचला. शक्य होईल तितके (धनुरासन) डोके मागच्या बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. दृष्टी वर आणि मागच्या बाजूला असावी.
संपूर्ण शरीराचा भार केवळ पोटावर (नाभीवर) रहावा. कंबरेपासून वरचा भाग तसेच कंबरेखालचा भाग वरच्या बाजूला वाकविलेल्या स्थितीत रहावा. कुंभक करून याच स्थितीत टिकून रहा. त्यानंतर हात सोडून पाय व डोके मूळस्थितीत घेऊन जा आणि पूरक करा.
प्रारंभी हे आसन पाच सेकंद करा. नंतर हळूहळू वेळ वाढवित तीन मिनिटे किंवा त्याहून जास्त वेळ या आसनाचा सराव करा. तीन-चार वेळा हे आसन केले पाहिजे.
लाभ : धनुरासनाच्या सरावाने पोटाची चरबी कमी होते. वातविकार दूर होतो. पोटाचे विकार नाहीसे होतात. मलावरोध दूर होतो. भूक वाढते. छातीचे दुखणे बंद होते.
हृदयाची धडधड बंद होऊन हृदय मजबूत होते. घशाचे सर्व आजार दूर होऊन आवाज मधुर होतो. श्वसनक्रिया सुरळीत चालते. मुखाकृती सुंदर बनते, नेत्रदृष्टी वाढते आणि नेत्रविकार दूर होतात.
हाता-पायांचे कंपन बंद होते. शरीरसौष्ठव वाढते. पोटाच्या स्नायूंवर ताण पडल्याने पोटावर चांगला प्रभाव पडतो. आतड्यांवर खूप दाब पडल्याने पोटातील अवयवांवरही दबाव पडतो. त्यामुळे आतड्यांमध्ये पाचकरसाचे प्रमाण वाढते व जठराग्नी प्रदीप्त होतो. पचनशक्ती वाढते. वायुरोग नष्ट होतो.
पोटाला रक्तपुरवठा अधिक प्रमाणात होतो. धनुरासनात भुजंगासन व शलभासनाचा समावेश होत असल्यामुळे या दोन्ही आसनांचा लाभ या आसनाने होतो. स्त्रियांसाठी हे आसन खूपच लाभदायी आहे. यामुळे मासिक पाळीचे सर्व विकार तसेच गर्भाशयाचे सर्व आजार दूर होतात.
आणखी वाचा – Padmasana Information in Marathi
काय शिकलात?
आज आपण धनुरासन बद्दल माहिती मराठीत । Dhanurasana Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.