Contents
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त कविता
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेती वर कविता ज्या तुम्हाला नक्की आवडतील. शेतकरी म्हणजे जगाचा पोशीनंदा असतो पण यावर कोणाच लक्षच नसत म्हणून आम्ही काही कविता शोधल्या ज्या शेतकाऱ्या विषयी जागृती करतात.
मित्रांनो जर तुम्ही पण अश्या काही कविता लिहीत असाल तर तुम्ही त्या कविता आम्हाला कमेन्ट किंवा ईमेल वर पाठऊ शकता. तसेच तुम्हाला कविता कश्या वाटल्या ते पण नक्की कळवा.
जगणे राहिले । शेतात राबता ।
नाही देता येत । वेळ मुलांसाठी ।
काय आहे जिणे । बघा जाऊनिया ।
हातावर फोड । भाळी घर्मधारा ।
तरीपण नाही । त्यांना जगी मान ।
त्यांच्याशी प्रेमाने । बोला कधीतरी ।
आधुनिक शेती
नांगराची जागा आता
ट्रॅक्टरने घेतली
ग्रामीण भागात
आधुनिकता आली
माझा शेतकरी दादा
तंत्र वापरू लागला
साधनांच्या सहाय्याने
शेती करू लागला
आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्रम आणि खर्चाला
बसू लागली कात्री
शासन मायबाप
आणतात नव्या योजना
मिटू लागली आता
शेतकऱ्यांची दैना
यंत्रतंत्राच्या मदतीने
शेती लागली फुलू
शेतकऱ्यांचे अच्छे
दिन झाले चालू
आधुनिकतेच्या युगात
शेतीला आला जीव
हिरवाईने नटू लागली
शेतीची शिव
संकटा
तू आणि मी सारखेच
जिद्दी निघालो…
तू घेरायचे अन् मी पेरायचे
कधीच सोडले नाही…
मिरग
बरसावा तोही हिरवा,
जो मिरग पेरला डोळ्यांत;
जी अंधारुन जळते वीज,
ती जाणीव सुख-सोहळ्यांत!
परतीचा पाऊस
तुझिया जगाची देवा, काय ही दशा झाली ?
परतीच्या पावसामुळे अशी का आपत्ती आली ?
पीक – रोपांची देवा, अशी का ही नासाडी झाली ?
शेत का उध्वस्त झाले ह्या पावसा खाली ?
गोर – गरीबांना मिळेल का ही दोन घासांची पोळी ?
कसा मी राहू सांग अशा ह्या संकटकाळी ?
गणराया तुम्ही लवकर यावे आज भूवरी.
हरूनी न्यावे संकट आता, करुनी कृपा आम्हावरी.
माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
करतो म्हणुनी कामकाज
खातो कांदा न भाकरी
राबराब राबतो शेतामध्ये
नाही मनी लाज
माझा बाप शेतकरी
गर्व आहे अमुच्या उरी नाही
वान पायामध्ये माझा बाप
शेतकरी पायात त्याच्या काटा
असतो रूतत आपल्याच मुलांसाठी
आटवतो रक्त करतो दुसऱ्यांची
चाकरी माझा बाप शेतकरी
नाही बघत उन वारा
काम करतो झरझरा
त्याची गोष्टच हो न्यारी
माझा बाप शेतकरी
मारत असतो नांगुरी
नाही पोटा- पाण्याचा विचार
झटत असतो लेकरासाठी
काढुनी चिमटा आपल्या पोटी
माझा बाप शेतकरी
फाटकी वस्त्रे अंगावरी
थकतो रात्रंदिवस भर
माझा बाप शेतकरी
भरतो पोट जगाची सारी
माझा बाप शेतकरी खातो कांदा न भाकरी
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शुभेच्छा संदेश
इडा पीडा टळो आणि
बळीचे राज्य येवो!
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा….
महाराष्ट्रातील
“शेतकरी राजाला”
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.
कडाक्याचे ऊन असो वा
सोसाट्याचा वारा किंवा बरसत
असो पावसाच्या ओल्याचिंब
धारा तरी राबतो आपला सर्जाराजा
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
साधी राहणी , मजबूत बांधा
तोच आहे शेतकरी राजा
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.
बळीराजा माझा लयं इमानी
कष्टाने पिकवितो पीक पाणी
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काळ्या मातीत जन्माला
काळ्या मातीशीच नातं
घाम गाळून कष्टाचा
भरतो तुमचं आमचं पोट.
करूनी कष्ट गाळूनी घाम
साऱ्या जगाला पुरवितो धान
असा आहे आपला शेतकरी महान.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शेतकरी आहे अन्नदाता
तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या आणि हरित क्रांतीचे प्रणेते
वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
तू कण ह्या मातीचा, हे धान तुझं लेकरू
आरे काय भ्या तुला वारा धूनाची
उभ्या आस्मंताचं तू पाखरू
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कृषी संस्कृतीने दिले जगण्याचे बीज
कष्टाने मोती पिकवणाऱ्या कोट्यवधी
शेतकऱ्यांना अभिवादन
Maharashtra Krushi Dinachya Hardik Shubhechha
महाराष्ट्र कृषी दिन
धरणी मातेची भरून ओटी
उपकार तुझे आम्हा युगे युगे
कोटी कोटी नेसूनी हिरवा शालू…
बीज रुजवून भरतो तुझी
आनंदानं ओटी…
धरणी मातेचा लेक मी
मला कशाची भीती…
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा
कष्ट करीतो शेतकरी
पिकवितो रान मोती
राब राब राबून घामात
ओली झाली काळी माती
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खाऊन भाकर पिऊनी पाणी
कष्ट करीतो शेतकरी
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतात घाम गाळून
सोनं पिकवणाऱ्या माझ्या
बळीराजाला कृषी दिनाच्या राज्यातील मनपूर्वक शुभेच्छा
इड पिडा टळो आणि
बळीराजाचे राज्य येवो
सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी जगाला तर तुम्ही
आम्ही आणि देश जगेल
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा
साऱ्या जगासी अन्न धान्य पुरवितो
अन् तो स्वतः मात्र उपाशीच मरतो
धण्यास सारा पैसा मिळतो
अन् आमचे शेत असूनही आम्ही
मात्र कर्जात बुडतो
कृषी प्रधान देशात
नाही खेळला सुखाशी
धाण्य पुरवी जगाला
स्वतः राहून उपाशी
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी आहे अन्नदाता तोच
आहे देशाचा खरा
भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा
अन्नासाठी दशदिशा भटकतो
त्यांस तुझा उंबरठा आधार
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
भागवितो भूक तिन्ही लोकांची
लक्ष लक्ष तुझे आभार
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा
करुनी आपल्या रक्ताचे पाणी
शेत पिकवी कास्तकरी
सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अन्नधान्य पिकवेल शेतकरी
तर देशात नांदेल सुख सम्रध्दी
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा
शेतकरी असता सक्षम
शेती पिकवेल भक्कम
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
शेतकरी टिकेल तर
शेत पिकेल
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जन जनात संदेश पोहचवूया
बळीराजाला
आत्महत्ये पासून रोखूया.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
नांगराला बैल जुंपून पहा
आपली पिकं बहरणारी शेती
मनात साठवून पहा
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शेतकऱ्यांचा करून सन्मान
यातचं खरा देशाचा अभिमान.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आधुनिकतेनं दिली
शेतीची खात्री
श्नम आणि खर्चाला
बसू लागली कात्री.
कृषी दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
घाम गाळून काळ्या
मातीत पिकवितो
मोती ,जगाचा पोशिंदा
स्वतःला म्हणवितो
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.
गाऊ आपण एकचं गाणी
पुसून टाकू शेतकऱ्यांच्या
डोळ्यातील पाणी
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
खाऊन भाकर पिऊनी पाणी
कष्ट करीतो शेतकरी
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र कृषी दिनाच्या
बळीराजाला खूप खूप
शुभेच्छा.
दिवस हक्काचा…
दिवस शेतकरी राजाचा
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
काजव्याचं रान सारं पायावरती
पेरलं दाटलेलं हसू गुलाबी
आभाळभर कोरलं
Maharashtra Krushi
Dinachya Hardik Shubhechha.
घाम गाळतो, सोनं उगवतो
शेतकरी राजा…
सुजलाम सुफलाम तेव्हाच
झाला महाराष्ट्र माझा…
Krushi Dinachya
Hardik Shubhechha.
शेतकरी आहे अन्नदाता तोच
आहे देशाचा खरा
भाग्यविधाता
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.
मंद मंद सरी त्यांना वादळाची
साथ जणू पाण्याच्या थेंबाला
ढगांची हाक
तहानलेली माती तिला पाण्याची कास
देव आता तरी पुर्ण होऊ दे
शेतकऱ्यांची आस
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
घामातून पिकवती मोती
एक सलाम
त्या शेतकऱ्यांसाठी
सर्व शेतकरी बांधवांना
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.