हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला पवनमुक्तासन बद्दल माहिती मराठीत – Pawanmuktasana Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.
लक्ष द्या – योगासने करण्याआधीच्या आवश्यक सूचना आणि अवघड शब्दांचे अर्थ
पवनमुक्तासन हे आसन केल्याने शरीरातील पवन अर्थात् वायू मुक्त होतो, म्हणून याला पवनमुक्तासन असे म्हणतात.
ध्यान : मणिपूर चक्रात.
श्वास : अगोदर पूरक, नंतर कुंभक आणि रेचक.
कृती : जमिनीवर अंथरलेल्या आसनावर सरळ पहुडा. पूरक करून फुप्फुसांत श्वास भरा. आता कोणताही एक पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जुळवून वाकविलेल्या गुडघ्याला पोटाशी धरून ठेवा.
नंतर डोके उचलून वाकविलेल्या गुडघ्याला नाक लावा. दुसरा पाय जमिनीवर सरळ ताठ ठेवावा. ही क्रिया चालू असताना श्वास थांबवून कुंभक चालू ठेवा.
डोके आणि वाकविलेला पाय जमिनीवर पूर्ववत् ठेवल्यावरच रेचक करा. दोन्ही पाय क्रमाक्रमाने वाकवून हीच क्रिया करा, दोन्ही पाय एकाच वेळी वाकवूनही हे आसन करू शकता.
लाभ : पवनमुक्तासनाच्या नियमित सरावाने पोटाची चरबी कमी होते. पोटातील वायू नष्ट होऊन पोट विकाररहित होते. अपचन दूर होते. पोटफुगी होत असेल तर या आसनाने लाभ होतो.
पहाटे शौचक्रिया ठीक होत नसेल तर थोडे पाणी पिऊन हे आसन १५-२० वेळा या आसनाने स्मरणशक्ती वाढते. बौद्धिक कार्य करणारे डॉक्टर, २० केल्याने शौचास साफ होते.
वकील, साहित्यकार, विद्यार्थी तसेच बसून काम करणारे मुनीम, व्यापारी इ. लोकांनी नियमितपणे पवनमुक्तासन केले पाहिजे.
काय शिकलात?
आज आपण पवनमुक्तासन बद्दल माहिती मराठीत – Pawanmuktasana Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.