पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना PM Garib Kalyan Anna Yojna Marathi
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा देशात आरंभ केला.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही भारत सरकारची एक योजना आहे.या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे गरीब ,निराधार,जनतेला मदत करणे,या योजनेमध्ये जे भ्रष्ट लोकांचे काळे धन जप्त केले जाते,ते गरीब लोकांच्या कल्याणासाठी विकासासाठी वापरले जाते.
खरतर ही योजना चालू करण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्या लोकांकडे अघोषित काळा पैसा आहे तो जनतेच्या कल्याणासाठी वापरणे.
या योजनेची सुरवात 2016 मध्ये करण्यात आली.या मुख्य योजनेअंतर्गत अनेक योजना केंद्र सरकारमार्फत गरीब लोकांच्या कल्याणासाठी राबवल्या गेल्या.
या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा प्रारंभ झाला.
जस की आपणा सर्वांनाच माहीत आहे की,2019 पासून आपल्या देशात किंबहुना संपूर्ण भारतात कोरोना महामारी नवं हाहाकार माजवला आहे,या महामारीत अनेक लोकांनी आपले जीव गमावले,अनेक लोकांनी आपली जवळची माणसं गमावली,अनेक मुले पोरकी झाली, आपले आईवडील गमावले,बऱ्याच जणांनी नोकऱ्या देखील गमावल्या,अनेक जणांची आर्थिक परिस्थिती खूपच खलावली, जशी आपल्या भारताने आपली आरोग्य यंत्रणा सज्ज केली तसेच गरीब जनतेला आपले पोट भरता यावे यासाठी आपल्या पंतप्रधानांनी गरीब कल्याण अन्न योजनेचा प्रारंभ केला.
या योजनेअंतर्गत मार्च 2020 पासून 80 करोड पेक्षा जास्त रेशनकार्ड धारकांना व प्रत्येक कुटुंबामध्ये रेशनकार्ड मध्ये जेवढ्या सदस्यांची नाव नोंदणी आहे,तेवढ्या सदस्यांच्या नावे प्रति व्यक्ती 5 किलो धान्य(म हे धान्य गहू किंवा तांदूळ यांपैकी एक किंवा 2.5 किलो गहू व 2.5 किलो तांदूळ असेही असू शकते).व प्रत्येक कुटुंबाला 5 किलो डाळ मोफत देण्याची घोषणा केलेली आहे.
आधी हु योजना 2020 मध्ये एप्रिल मे आणि जून महिन्यात राबवली जाईल असे सांगण्यात आले होते.नन्तर ही योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालवली जाईल असे पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते.
2020 मध्ये या योजनेसाठी किंवा या योजनेच्या विस्तारासाठी 90,000 करोड पेक्षा जास्त पैसे खर्च झाले असल्याचे देखील केंद्राकडून सांगण्यात आले होते.
मार्च 2020 मध्ये त्या लोकांसाठी ही धान्य देण्यात आले ज्या लोकांचे नाव राशनकार्ड मध्ये नव्हते,त्यांच्यासाठी देखील केंद्राने सांगितले की सध्या गव्हाची किंमत ही 27 रुपये किलो आहे,आणि या योजनेअंतर्गत हाच गहू राशन दुकानामार्फत 2 रुपये किलोने ने मिळेल, आणि तांदूळ हा साधारण 37 रुपये किलोने आहे,हाच तांदूळ राशन दुकानामार्फत 3 रुपये किलोने मिळेल.
जसही आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्र्रात किंबहुना संपूर्ण भारतात मार्च 2021 पासून कोरोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.
महराष्ट्रासह अनेक राज्यात कडक लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे.आधीच्या लाटेतून लोक थोडू कुठे सावरत होती तर लगेच दुसरे लॉकडाऊन लागले त्यामुळे उपासमारीमुळे लोकांचे हाल होऊ नये म्हणून मार्च 2021 मध्ये ही गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत संपूर्ण राशनकार्ड धारक कुटुंबांना मे आणि जून महिन्यात मोफत धान्य आधीप्रमानेच दिल जाणार आहे असे पंतप्रधानांनी देशाला संबोधित करताना सांगितले.
या योजनेबाबत अमित शाह म्हणाले की,’ या गंभीर काळात केंद्र सरकार देशवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 2021 मध्ये 26000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे, व दोन महिन्यांसाठी मोफत धान्य देशवासियांना दिले जाणार आहे,याबाबत पंतप्रधान मोदींचे आभार मानतो