Site icon My Marathi Status

कोजागिरी पौर्णिमा माहिती, मराठी शुभेच्छा संदेश आणि कविता

नमस्कार मित्रांनो,

आज आपण पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल थोडीशी माहिती.

कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

कोजागिरी पौर्णिमा ही हिंदू धर्मात तसेच बुद्ध धर्मात देखील महत्वाची मानली जाते. याच वेळेस शेतकऱ्यांची शेतातील कामे झालेली असतं यामुळे हा दिवस शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाचा असतो आणि याच जोशाने शेतकरी देखी कोजागिरी साजरी करतात. तर टाळा टाळ करणारी लहान मुले देखील कोजागिरी च्या निमित्ताने दूध पिण्यास हट्ट करतात.

कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी केली जाते.

कोजागिरी पौर्णिमा ही मुख्यता सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्या महिन्यात अश्विन पौर्णिमीला येते. या वेळेस ही 19 ऑक्टोबर 2021 या तारखेला आली आहे.

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि आपल्या प्रकाशने पूर्ण महाराष्ट्रात ,भारतात परक्ष पसरवत असतो. याच दिवशी रात्री चंद्राच्या शुभ्र प्रकाशात दूध आठवन्याची प्रक्रिया केली जाते या दुधा मद्धे काजू, बदाम, केसर अश्या प्रकारची अनेक पौस्टिक सामग्री टाकली जाते. मग आठवलेल्या दुधाचा भोग देवाला चढवला जातो.

कोजागिरीला मसाले दूध बनवा रेसीपी

कोजागिरीला एकदम चविष्ट आणि पौष्टिक मसाले दूध कसे बनवावे या साठी एक विडियो देतो तो नक्की पहा आणि कोजागिरी साजरी करा.

कोजागिरी पौर्णिमेवर एक कविता

चंद्राच्या साक्षीने मिळाली

बासुंदीची मेजवानी..

कोजागिरीच्या रात्रीने लिहाली

जगरणाची कहाणी..

तुझ्यात स्वतःला चंद्राने

निरखून एकदा पाहिले,

विरघळली ती रात्र आता

प्रतिबिंब तुझ्यात राहिले.

 

तुला पाहत पाहत चंद्र

रात्री सोबत जागला,

चंद्र म्हणवता म्हणवता स्वतःला

दिव्या सारखा वागला.

 

तुझ्यात स्वतःला चंद्राने

निरखून एकदा पाहिले,

विरघळली ती रात्र आता

प्रतिबिंब तुझ्यात राहिले.

 

कविता आवडली तर नक्की कळवा आणि आपल्या मित्र मैत्रिणीला पाठवा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा द्या.

 

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश

आता काही whatsapp साठी मराठी कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश पाहू जे तुम्ही कोणालाही पाठवू शकता.

विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे…
कोजागिरी पोर्णिमेच्या शुभेच्छा
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ..
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोड स्वाद दुधाचा,
विश्वास वाढु द्या नात्याचा,
त्यात असु दे गोडवा साखरेचा,
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
Kojagiri Pornimechya Hardik Shubhechha!

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,

प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या

आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

साखरेचा  गोडवा केशरी दुधात,

विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,

रेंगाळत राहो अंतर्मनात,

स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात,

चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात,

मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीच्या  साक्षीने,चंद्रही उजळून निघाला

आकाशातकोरोनाचे संकट मिटून,

आपणही बहरू शीतल प्रकाशात…

कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात,

दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात…

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात

सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य

घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना…

कोजागिरी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Exit mobile version